उझबेकिस्तानमध्ये सिरप प्यायल्याने ‘इतक्या’ मुलांचा मृत्यू

भारतीय कंपनी संशयाच्या भोवऱ्यात

उझबेकिस्तानमध्ये सिरप प्यायल्याने ‘इतक्या’ मुलांचा मृत्यू

झांबियानंतर उझबेकिस्तानमध्ये सिरप प्यायल्याने १८ मुलांचा मृत्यू झाला आहे. हे सिरप भारतीय औषध कंपनीचे आहे. या कंपनीच्या सिरपमुळे १८ मुलांचा मृत्यू झाला असल्याचा दावा उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे. या आरोपानंतर सिरपचा पुरवठा करणारी भारतीय औषध कंपनी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

उझबेकिस्तान सरकारने मेरियन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा उल्लेख केला आहे. या कंपनीने उझबेकिस्तानमध्ये २०१२ मध्ये व्यवसायासाठी नोंदणी केली होती. मृत्यू झालेल्या मुलांनी भारतातील नोएडा येथील मेरियन बायोटेक कंपनीच्या डॉक-१मॅक्स सिरपचे सेवन केले होते. मृत मुलांनी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी दोन ते सात दिवस दिवसातून तीन ते चार वेळा हे सिरप सेवन केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे असे उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे
हे सिरप मुलांसाठी औषधाच्या प्रमाणित डोसपेक्षा जास्त आहे.  निवेदनात औषधामध्ये कोणताही गैरप्रकार झाल्याचा थेट आरोप करण्यात आलेला नाही. औषधात प्रामुख्याने पॅरासिटामॉल असल्याने पालकांनी त्याचा वापर केला किंवा त्यांनी ते थेट मेडिकलमधून विकत घेतले किंवा सर्दीवर उपाय म्हणून वापरले असे निवेदनात म्हटले आहे.

डॉक-१ मॅक्स सिरपच्या या मालिकेत इथिलीन ग्लायकॉल आहे . या रसायनाचा संदर्भ देत मंत्रालयाने सांगितले की, इथिलीन ग्लायकोल हा विषारी पदार्थ आहे. या पदार्थाचे सेवन केल्याने उलट्या होणे, बेशुद्ध पडणे, आकुंचन येणे, हृदयविकार आणि मूत्रपिंड निकामी होणे असे प्रकार होऊ शकतात. एकूण सात जबाबदार कर्मचाऱ्यांना निष्काळजीपणा आणि कामात दक्षता न घेतल्याने बडतर्फ करण्यात आले आहे. अनेक तज्ज्ञांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

अनिल देशमुखांनी ‘मविआ’चीच क्रेडिबिलिटी दाखवली!

८० लाख रुपयांच्या बोगस नोटांसह एकाला अटक

हॉटेलला आग लागल्यावर लोकांनी पाचव्या मजल्यावरून मारली उडी

बॉम्बचा फुगा, अजितदादांची टाचणी

या घटनेनंतर सर्व मेडिकल स्टोअर्समधून डॉक-१ मॅक्स या औषधाच्या गोळ्या आणि सिरप मागे घेण्यात आले आहेत. मंत्रालयाने पालकांना त्यांच्या मुलांच्या आरोग्याबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे. यासोबतच औषध दुकानांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Exit mobile version