केनियामध्ये शाळेच्या वसतिगृहाला लागलेल्या आगीत १७ विद्यार्थ्यांचा मृत्यू

पोलिसांकडून मृतांचा आकडा वाढण्याची चिंता

केनियामध्ये शाळेच्या वसतिगृहाला लागलेल्या आगीत १७ विद्यार्थ्यांचा मृत्यू

केनियामधील एका शाळेच्या वसतिगृहाला आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. या आगीत १७ विद्यार्थी ठार झाले असून १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. शिवाय मृतांचा आकडा वाढण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सध्या केला जात आहे.

केनियाचे राजधानीचे शहर असलेल्या नैरोबीमधील न्येरी काउंटी शहरातील हिलसाइड एंडराशा प्राइमरी येथे गुरुवारी उशिरा मोठी आग लागली. आगीने काही वेळातच संपूर्ण इमारतीला वेढले. काही विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या बाहेर पडण्याची धडपड केली मात्र आगीच्या प्रचंड लोटामुळे त्यांना योग्य संधीच मिळाली नाही. यावेळी जीव वाचवण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या भिंतींवरून उड्या मारण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. दरम्यान, परिसरातील स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. नेमकी आग कशामुळे लागली याचा तपास करण्यात येत आहे. पोलीस अधिकारी रेसिला ओन्यांगो म्हणाले की, “गुरुवारी रात्री न्यारी काउंटीमधील हिलसाइड एंडराशा प्राइमरी येथे आग लागली. ही आग कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे. या प्रकरणासाठी जो कोणी जबाबदार असेल त्यांच्यावर आम्ही कारवाई करू.”

हे ही वाचा :

चाकरमानी निघाले गावाला; वाहतूक कोंडीचा ताप डोक्याला

तीन दिवसांत भाजपाशी जोडले १ कोटी लोक

कपिल परमारने ज्युदोमध्ये कांस्यपदक जिंकून रचला इतिहास,अशा कामगिरीने ठरला पहिला भारतीय !

लोअर परळच्या कमला मिल परिसरात पुन्हा आगीचे लोट !

अलीकडच्या काळात केनियामध्ये शाळांना आग लागण्याच्या घटना वाढल्याची माहिती आहे. आगीमुळे अनेक शाळांच्या इमारतींचे मोठे नुकसान झाले असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही त्याचा परिणाम होत आहे. अनेक शाळा तात्पुरत्या बंद कराव्या लागल्या आहेत. अनेक शाळांमध्ये आग विझवण्यासाठी लागणारी यंत्रणा नसल्याचेही समोर आले आहे.

Exit mobile version