टीटीपी दहशतवादी गटाकडून पाकिस्तानच्या १६ अणुशास्त्रज्ञांचे अपहरण

पाकिस्तान सरकारवर दबाव आणण्यासाठी अपहरण केल्याची माहिती

टीटीपी दहशतवादी गटाकडून पाकिस्तानच्या १६ अणुशास्त्रज्ञांचे अपहरण

तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) दहशतवादी गट आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यातील चिघळलेल्या संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. टीटीपी दहशतवाद्यांनी त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी आणि पाकिस्तान सरकारवर दबाव आणण्यासाठी १६ पाकिस्तानी अणुशास्त्रज्ञांचे अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे.

तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) पाकिस्तानमधील १६ शास्त्रज्ञांचे अपहरण केल्याचा आरोप आहे. अपहरण झालेले लोक पाकिस्तान अणुऊर्जा आयोगाचे (PAEC) कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे. अपहरणानंतर टीटीपीने या कर्मचाऱ्यांचा एक व्हिडिओही जारी केला आहे. व्हिडिओमध्ये हे कर्मचारी टीटीपीच्या मागण्या मान्य करताना आणि त्यांच्या सुटकेसाठी पाकिस्तान सरकारला आवाहन करताना दिसत आहेत.

लक्की मारवत येथील काबुल खेल अणुऊर्जा खाण प्रकल्पात काम करणाऱ्या १६ कर्मचाऱ्यांचे अपहरण झाल्याचा दावा केला जात आहे. यावेळी सशस्त्र लोकांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची वाहनेही पेटवून दिली. धक्कादायक बाब म्हणजे तहरिक-ए- तालिबान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधील सर्वात मोठ्या युरेनियमच्या खाणीमधून मोठ्या प्रमाणात युरेनियम लुटून नेल्याचा दावाही करण्यात येत आहे. हे युरेनियम अणुबॉम्ब तयार करण्यासाठी वापरण्यात येतं. हल्ले थांबवण्याच्या मागण्या आम्ही सरकारकडे केल्या आहेत. सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात, असं त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा..

उद्योगविषयक धोरणांमध्ये कालानुरूप बदल करावेत

गुन्हेगारांना फाशी देताना त्यांचा चेहरा बघायचाय!

महाकुंभमेळ्यापूर्वी प्रयागराजमध्ये घनदाट जंगल तयार करणार

‘बंद करा ती आघाडी!’ ओमर अब्दुल्लांचा इंडी आघाडीवर तोफगोळा

टीटीपीने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञांच्या अपहरणाची जबाबदारी स्वीकारली आहे. पाकिस्तान सरकार टीटीपीला दहशतवादी गट मानते. टीटीपीने गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानी लष्कर आणि सरकारला खूप त्रास दिला आहे. टीटीपी सातत्याने पाकिस्तानी सुरक्षा दलांवर हल्ले करत आहे. अफगाणिस्तानच्या भूमीत टीटीपीला आश्रय मिळत असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे.

Exit mobile version