चीनमध्ये मॉलला लागलेल्या आगीत १६ जणांचा मृत्यू

इमारतीमधून ३० जणांना वाचवण्यात यश

चीनमध्ये मॉलला लागलेल्या आगीत १६ जणांचा मृत्यू

चीनमध्ये एक आगीची मोठी दुर्घटना घडली आहे. चीनच्या झिगोंगमधील एका शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग लागून यामध्ये १६ जणांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या सरकारी मीडियानुसार, सिचुआन प्रांतातील झिगोंग शहरात एका १४ मजली इमारतीला आग लागली. त्यामुळे अनेक जण इमारतीत अडकले. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये इमारतीतून धुराचे लोट निघताना दिसत आहेत.

चीनच्या झिगोंगमधील एका शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग लागली. १४ माजली इमारतीला लागलेल्या आगीची माहिती मिळताच ३०० इमर्जन्सी वर्कर्स आणि डझनभर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या. इमर्जन्सी वर्कर्सने तातडीने सूत्रे हातात घेत बचाव कार्य सुरू केलं. आगीतून ३० जणांना वाचवण्यात यश आले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने असं सांगण्यात आलं आहे की, एखादी ठिणगी पडून नंतर आग लागली. मात्र, अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये इमारतीतून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत असून धुराचे लोटही दिसून येत आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी फक्त पाईपची मदत न घेता ड्रोनच्या माध्यमातून आग विझवण्याचं काम ककेलं. शहरातील ज्या मॉलमध्ये आग लागली त्या मॉलमध्ये डिपार्टमेंट स्टोअर्स, रेस्टॉरंट्स आणि थिएटर्स तसेच अनेक कंपन्यांची कार्यालयं होती, अशी माहिती आहे.

हे ही वाचा:

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना ही ‘देवाची करणी’; मुख्य आरोपी भावेश भिंडेचा अजब दावा

दुबईच्या राजकुमारीने इंस्टाग्रामवर पतीस दिला ‘तीन तलाक’ !

समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट शेअर केल्यास होणार फौजदारी कारवाई होणार

हरियाणात अग्निवीरांसाठी १० टक्के आरक्षण, बिनव्याजी कर्जही मिळणार !

चीनच्या आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाने गुरुवारी एका निवेदनात रेस्क्यू वर्कर्स आणि प्रांतीय अधिकाऱ्यांना आगीचं कारण लवकरात लवकर शोधण्यास सांगितलं. तसेच या घटनेतून धडा घ्या, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत. चीनमध्ये अशा घटना अनेकदा घडत असतात ज्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. इमारती बांधताना नियमांचे पालन केले जात नसल्याचे सांगितले जात आहे.

Exit mobile version