समुद्रात मासेमारीसाठी गेले असताना भरकटलेल्या दोन बोटींना पाकिस्तानने ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. या बोटींवरील एकूण १६ जण पाकिस्तानच्या ताब्यात असून त्यातील सात जण पालघरमधील असल्याची माहिती आहे. पाकिस्तान मेरिटाईम सिक्युरिटी एजन्सीने या मच्छिमारांना ताब्यात घेतल्याची माहिती पालघरमधील मच्छिमार संघटनेने दिली आहे.
पालघर जिल्ह्यातील खलाशी, मच्छिमार हे मोठ्या संख्येने रोजगारासाठी गुजरातमधील ओखा आणि पोरबंदर या भागात जात असतात. याच भागातील दोन बोटी भरकटून पाकिस्तान हद्दीत गेल्या. त्यामुळे या बोटींवरील एकूण १६ मच्छीमार खलाशी यांना पाकिस्तान सैन्याने ताब्यात घेतले आहे. यामधील सात खलाशी मच्छीमार हे पालघर जिल्ह्यातील आहेत.
हे ही वाचा:
युक्रेनचे चार प्रांत विलीन करण्याच्या करारावर पुतीन यांची स्वाक्षरी
काँग्रेसचा अध्यक्ष, अध्यक्ष खेळ सुरूच
गुजरातमध्ये सापडला खोट्या नोटांचा साठा
देशात शांतता संविधानामुळे नव्हे, तर हिंदूंमुळे
नवशा महाद्या भिमरा, उमजी पाडवी, विजय नागवंशी, कृष्णा बुजड, सरित उंबरसाडा, जयराम ठाकर आणि विनोद कोल अशी सात मच्छिमारांची नावे असून हे सात जण डहाणू आणि तलासरी तालुक्यातील बोर्डी जवळील एका गावातील रहिवासी आहेत. गुजरातमधील ओखा येथील मत्स्यगंधा आणि अन्य एक मच्छीमार बोट मासेमारीसाठी समुद्रात गेली होती. त्यावर हे मच्छीमार होते.