इराणमधील शिराज शहरामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. शिराज शहरातील शिया तीर्थस्थळावर तीन दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला आहे तर ४० जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दहशतवाद्यांना पकडण्यात यश आले आहे तर एकाचा शोध अद्याप सुरू आहे.
इराणमधील शिराज शहरातील शिया तीर्थस्थळावर तीन बंदूकधारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. शिया तीर्थस्थळावर मोठ्या प्रमाणात भाविक जमले असताना तीन दहशतवादी बंदूक घेऊन घटनस्थळी आले आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. त्यानंतर भाविकांमध्ये गोंधळ उडाला होता. या हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४० जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ISIL (ISIS) गटाने या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून इराणच्या यंत्रणांकडून तिसऱ्या दहशतवाद्याचा शोध घेतला जात आहे.
हे ही वाचा:
शिवसेनेचे माजी आमदार विनायक निम्हण यांचं निधन
आता केजरीवाल म्हणतात नोटेवर गांधीजींसोबत लक्ष्मी-गणेशाचे चित्र छापा
ऋषी सुनक यांच्या घरी आली लक्ष्मी; पत्नी अक्षता मूर्ती यांना मिळाला १२६ कोटींचा लाभांश
इराणमध्ये सध्या हिजाब विरोधात आंदोलन सुरू आहे. महसा अमिनी या तरुणीच्या झालेल्या मृत्यूनंतर इराणमध्ये हिजाब विरोधातील आंदोलन अधिक आक्रमक झाले असून इराण मधील महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. काही ठिकाणी हिंसेचे प्रकारही घडले आहेत.