23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामाइराणमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू

इराणमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू

इराणमधील शिराज शहरामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.

Google News Follow

Related

इराणमधील शिराज शहरामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. शिराज शहरातील शिया तीर्थस्थळावर तीन दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला आहे तर ४० जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दहशतवाद्यांना पकडण्यात यश आले आहे तर एकाचा शोध अद्याप सुरू आहे.

इराणमधील शिराज शहरातील शिया तीर्थस्थळावर तीन बंदूकधारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. शिया तीर्थस्थळावर मोठ्या प्रमाणात भाविक जमले असताना तीन दहशतवादी बंदूक घेऊन घटनस्थळी आले आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. त्यानंतर भाविकांमध्ये गोंधळ उडाला होता. या हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४० जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ISIL (ISIS) गटाने या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून इराणच्या यंत्रणांकडून तिसऱ्या दहशतवाद्याचा शोध घेतला जात आहे.

हे ही वाचा:

शिवसेनेचे माजी आमदार विनायक निम्हण यांचं निधन

कोणाचा दिवा विझतोय?

आता केजरीवाल म्हणतात नोटेवर गांधीजींसोबत लक्ष्मी-गणेशाचे चित्र छापा

ऋषी सुनक यांच्या घरी आली लक्ष्मी; पत्नी अक्षता मूर्ती यांना मिळाला १२६ कोटींचा लाभांश

इराणमध्ये सध्या हिजाब विरोधात आंदोलन सुरू आहे. महसा अमिनी या तरुणीच्या झालेल्या मृत्यूनंतर इराणमध्ये हिजाब विरोधातील आंदोलन अधिक आक्रमक झाले असून इराण मधील महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. काही ठिकाणी हिंसेचे प्रकारही घडले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा