31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामादिवाळीला जाताना काळाची झडप, रिवामध्ये बस अपघातात १४ ठार

दिवाळीला जाताना काळाची झडप, रिवामध्ये बस अपघातात १४ ठार

Google News Follow

Related

मध्यप्रदेशातील रीवा नजीक असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर एका बसला गंभीर अपघात झाला आहे या अपघातामध्ये १४ जण ठार तर ४० जण जखमी झालेले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात भरती केले आले आहे.बसमध्ये सर्व कामगार प्रवासी होते. हे कामगार दिवाळी साजरी करण्यासाठी जात असताना ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशातील ही बस हैदराबाद येथून गोरखपूरच्या दिशेने जात होती. सर्व लोक उत्तर प्रदेशातील असल्याचे सांगितले जात आहे. बस हैदराबादहून गोरखपूरला जात होती. रेवा येथील सुहागी टेकडीजवळ हा अपघात झाला. ४० जखमींपैकी २० जणांना प्रयागराज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

उत्तर प्रदेशची ही बस रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास ही भरधाव बस समोरून येत असलेल्या एका ट्रकला जाऊन धडकली आणि पलटी झाली. या बसमध्ये सर्व कामगार होते, ते दिवाळी साजरी करण्यासाठी आपापल्या घरी जात होते. त्याचवेळी त्यांच्यावर काळाने झडप घातली. या अपघातात सुमारे ४० जण जखमी झाल्याची माहिती आहे. त्याच वेळी १४ जणांना आपला जीव गमवावा लागला. अपघातानंतर केबिनमध्ये काही लोक अडकले होते, ज्यांना बऱ्याच प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात यश आले.

हे ही वाचा:

रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?

ठाकरेंचे खोके, एकदम ओके; खोक्यांचा धुरळा आता कोर्टात

सरकारकडून १०० रुपयात ‘आनंदाचा शिधा’

अजित पवार यांनी का घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट?

बसमध्ये ८० पेक्षा जास्त प्रवासी
बसमध्ये ८० पेक्षा जास्त प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. प्रत्यक्षात बस सोहागी डोंगराजवळ येताच बसच्या पुढे जाणाऱ्या ट्रकला अज्ञात वाहनाने धडक दिली. यादरम्यान बस अनियंत्रित होऊन ट्रकच्या मागच्या बाजूला जाऊन पलटी झाली. ट्रकला धडकलेल्या वाहनाचा चालक वाहनासह घटनास्थळावरून बेपत्ता आहे. या घटनेपासून पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत..

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा