भारतीय विमान वापरण्यास मुईझ्झुनी परवानगी नाकारली; मालदीवच्या मुलाचा मृत्यू

१४ वर्षीय मुलाला हृदयविकाराचा धक्का बसला होता

मालदीवमधील १४ वर्षांच्या आजारी मुलाला त्याच्या गावातून राजधानी शहरात आणण्यासाठी भारताने पुरवलेले विमान वापरण्यास राष्ट्रपती मोहम्मद मुइज्झु यांनी परवानगी नाकारल्याने शनिवारी या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे.

 

ब्रेन ट्युमरने त्रस्त असलेल्या या १४ वर्षीय मुलाला हृदयविकाराचा धक्काही बसला होता. त्याची प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याला त्याचे गाव गाफ आलिफ विलिंगिली येथून राजधानी शहर मालेमध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिका मागितली होती. मात्र मालदीवचे प्रशासन त्यांच्यासाठी तातडीने वैद्यकीय रुग्णवाहिका पुरवण्यास असमर्थ ठरले.

‘त्याला हृदयविकाराचा धक्का आल्याने आम्हाला त्याला तातडीने माले येथे न्यायचे होते. त्यासाठी आम्ही प्रशासनाला विनंती केली होती. मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यांनी गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता आमच्या फोनला प्रतिसाद दिला. अशा प्रकारच्या प्रकरणात एअर रुग्णवाहिका वापरली जाते,’ असे त्याच्या वडिलांनी मालदीवच्या स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितले. त्यानंतर त्याला विमानाने माले शहरात आणण्यासाठी व्यवस्था झाल्यानंतर १६ तासांनी तो येथे दाखल झाला.

हे ही वाचा:

राम मंदिरासाठी भेट म्हणून भाविकाने दिले १०१ किलो सोने!

दिल्ली एम्सचा यु-टर्न, २२ जानेवारीला अर्धा दिवस ओपीडी बंदचा निर्णय मागे!

अद्भूत! १५० वर्षांपूर्वीच राम मंदिर प्राणप्रतिष्ठेची तारीख ठरली होती!

तामिळनाडू सरकारने प्राण प्रतिष्ठाच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घातली?

तर, आसांधा कंपनी लिमिटेडने याबाबतचा खुलासा केला आहे. आम्हाला तातडीच्या एअरलिफ्टची विनंती मिळताच आम्ही त्यानुसार लगेचच कारवाईला सुरुवात केली होती. मात्र विमानात काही तांत्रिक बिघाड आल्यामुळे विमान ठरल्याप्रमाणे तिथे वळवण्या आले नाही, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मालदीवचे खासदार मीकाईल नसीम यांनी ‘राष्ट्रपतींचा भारताप्रति असलेला वैरभाव दाखण्यासाठी लोकांना त्यांच्या जीवाची किंमत मोजावी लागू नये, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Exit mobile version