दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात १४ जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पोलिस तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोहान्सबर्गच्या सोवेटो टाऊनशिपमधील एका बारमध्ये हा गोळीबार झाला. ज्या बारमध्ये गोळीबार झाला तो परवानाधारक असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेच्या वेळी बारमध्ये अनेक लोक उपस्थित होते. ही घटना शनिवार, ९ जुलै रोजी रात्री उशिरा घडली. या घटनेत १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.
South Africa police say 14 killed in bar shooting in Johannesburg's Soweto township, reports AP
— Press Trust of India (@PTI_News) July 10, 2022
हे ही वाचा:
‘मुख्यमंत्री असलो तरी, जनतेचा सेवक’
आमदार प्रसाद लाड यांच्या घराबाहेर सापडली बॅग
आमदार प्रसाद लाड यांच्या घराबाहेर सापडली बॅग
एलन मस्क म्हणजे तिकीट नसलेले प्रवासी; ट्विटर करार रद्द केल्यानंतर महिद्रांनी लगावला टोला
बारमध्ये काही लोकांचा एक गट मिनिबस टॅक्सीतून आला आणि बारच्या रक्षकांवर गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी इतरत्र गोळीबार केला. घटनास्थळी सापडलेल्या काडतुसांच्या संख्येवरूनही गोळीबारात एकापेक्षा जास्त जणांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गौतेंग प्रांताचे पोलिस आयुक्त लेफ्टनंट जनरल इलियास मावेला यांनी ही माहिती दिली आहे. मात्र, आरोपींनी गोळीबार का केला याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.