थायलंडमध्ये नाईट क्लबला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू

थायलंडमधील चोनबुरी प्रांतात असलेल्या नाईट क्लबला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू तर ३५ हून अधिक जखमी

थायलंडमध्ये नाईट क्लबला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू

थायलंडमध्ये क्लबला मोठी आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. थायलंडमधील चोनबुरी प्रांतात एका नाईट क्लबला ही आग लागली असून या आगीत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

थायलंडमधील माउंटन बी नाईट क्लबला मध्यरात्री १ वाजता आग लागली. या आगीत दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३५ हून अधिक जण या आगीत भाजल्याची माहिती समोर आली आहे. या आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले काही थायलंडचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार शुक्रवारच्या मध्यरात्री हा अपघात घडला. आग लागली तेव्हा नाईट क्लबमध्ये अनेक लोक उपस्थित होते. आग लागल्याचे समजताच क्लबमध्ये चेंगराचेंगरी होऊन अनेक जण जखमी झाले आहेत. या अपघातातील मृत्यचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा:

पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताच्या सुधीरची ‘सुवर्ण’ कामगिरी

पुलवामामध्ये ग्रेनेड हल्ल्यात मजुराचा मृत्यू

टोलसंबंधी नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा

कर्माची फळं भोगणारे पार्थ चॅटर्जी खात असत अडीच लाखांची फळे

या नाईट क्लबमध्ये आग कशी लागली याचे ठोस कारण अजून समोर आलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणी तपास करायला सुरुवात केली आहे. मृतांमध्ये काही परदेशी नागरिक असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Exit mobile version