इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या गोंधळात तब्बल १२७ हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फुटबॉल संघ पराभूत होताच हताश चाहत्यांनी मैदानात गोंधळ घातला आणि ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत दोन पोलिस कर्माऱ्यांचा देखील समावेश आहे.
पूर्व जावा येथील एका स्टेडियममध्ये अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाया यांच्यात फुटबॉलचा सामना रंगला होता. या सामन्यात अरेमाचा संघ पराभूत झाला. निकाल समोर येताच त्याच्या हताश चाहत्यांनी मैदानावर गोंधळ घालायचा प्रयत्न केला. स्टेडियममधील चेंगराचेंगरी आणि गोंधळ रोखण्यासाठी पोलिस धावून आले. मात्र, चाहत्यांना थांबवण्यात पोलिसांना यश आले नाही.
या गोंधळात आणि हिंसाचारात स्टेडियममध्येच १० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं. उपचारादरम्यान रुग्णालयात अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
‘एएफपी’ या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व जावा येथील एका स्टेडियममधील सामन्यातील पराभवामुळं निराश झालेल्या प्रेक्षकांनी फुटबॉल मैदानावरच गोंधळ घातला. या चेंगराचेंगरी आणि हिंसाचारात दोन पोलिसांनाही आपला जीव गमवावा लागला.
#BREAKING At least 127 dead after violence at football match in Indonesia: police pic.twitter.com/WkDamZTtrz
— AFP News Agency (@AFP) October 1, 2022
हे ही वाचा:
ज्येष्ठ अभिनेते अनु कपूर यांची फसवणूक
आणि पंतप्रधान मोदींनी चालवली गाडी
काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खरगेंचे पारडे जड
स्टेडियममध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत १२७ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं आहे. या घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्टेडियममध्ये झालेल्या गोंधळानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर केला. त्यानंतर स्टेडियममधील गोंधळ नियंत्रणात आला, पण संतप्त लोक रस्त्यावर आले आहेत. हिंसाचाराच्या विविध घटनांमध्ये २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.