32 C
Mumbai
Friday, October 18, 2024
घरदेश दुनियाजपानमध्ये झालेल्या भूकंपात १२ जणांचा मृत्यू

जपानमध्ये झालेल्या भूकंपात १२ जणांचा मृत्यू

किनारपट्टी भागांतील सुमारे एक लाख नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर

Google News Follow

Related

नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानला शक्तिशाली भूकंपांचे धक्के बसले. याशिवाय त्सुनामीचा इशाराही देण्यात आला होता. सध्या भूकंपाच्या या हादऱ्यांनंतर देण्यात आलेला तीव्र त्सुनामीचा इशारा मागे घेण्यात आला असला तरी अद्याप किनारपट्टी भागांत असलेल्या घरांमध्ये न परतण्याची सूचना नागरिकांना करण्यात आली आहे. त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर किनारपट्टी भागांतील सुमारे एक लाख नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले. तर या भूकंपात १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

माहितीनुसार, सोमवारी झालेल्या भूकंपात १२ लोक ठार झाले आहेत. वाजिमा शहरात भूकंपाचे मुख्य केंद्र होतं. १९ जणांना कार्डिऍक अटॅक आल्याची माहिती अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी दिली आहे. आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

स्थानिक वेळेनुसार दुपारी चार वाजण्याच्या सुमारास इशिकावाच्या किनाऱ्याजवळ आणि आसपासच्या प्रांतांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याचे जपानच्या हवामान यंत्रणेने सांगितले. प्राथमिक अंदाजानुसार यापैकी सर्वात मोठा धक्का ७.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. त्यानंतर इशिकावासह अन्य किनारपट्टी भागांसाठी तीव्र त्सुनामी लाटांचा इशारा जारी करण्यात आला होता. लोकांना उंच भागात जाण्याच्याही सूचना देण्यात आल्या होत्या. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती वाजिमा सिटी, इशिकावा प्रीफेक्चरमध्ये १०० हून अधिक इमारतींना आग लागली होती.

हे ही वाचा:

‘अयोध्येला भेट द्या… तुम्हाला त्रेतायुगात गेल्यासारखे वाटेल’

संसद हल्ल्यातील आरोपी जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा खात्मा?

मोदीच येणार! द गार्डीयनचाही दावा

इस्रोकडून भारतीयांना नव्या वर्षाची भेट; XPoSAT चे यशस्वी प्रक्षेपण!

जपानमध्ये २०११ साली आलेल्या भूकंपानंतर पहिल्यांदाच त्सुनामीबाबत मोठा इशारा देण्यात आला होता. येत्या काही दिवसांत भूकंपाचे आणखी धक्के जाणवण्याची शक्यता जपानच्या हवामान विभागानं वर्तवली आहे. भूकंपानंतर इशिकावा आणि तोयामा प्रांतात वीज पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे ३६ हजार हून अधिक घरांची वीज गेली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
183,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा