नामिबियाहून गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात विशेष बोईंग ७४७-४०० या विमानाने मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेर येथे चित्ते दाखल झाले होते, त्यातील ‘शाशा’ नावाची मादी चित्ता सध्या किडनीच्या आजाराने त्रस्त झाली असताना आणखी एक डझन चित्ते पुढील महिन्यांत आपल्याकडे येत आहेत. गेल्यावर्षी भारतात आपल्याकडे चित्त्यांचे आगमन झाले होते. आता आणखी काही तब्बल बारा चित्यांची प्रारंभिक तुकडी पुढील महिन्यात भारतात एन्ट्री होणार आहे.
यासाठी भारताने दक्षिण आफ्रीकेशी एक करार केला असून पुढील काही दिवसातच भारतातील विविध संरक्षित जंगलात तुम्हाला हे शानदार आणि रुबाबदार चित्त्यांना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण आफ्रिकन चित्त्यांची डझनभर ऑर्डरच आता भारत देशाने दक्षिण आफ्रिकेला दिली आहे. गेल्याच वर्षी दक्षिण आफ्रीकेच्या शेजारील देश नामिबियातून ते चित्ते आणण्यात आले होते. एकेकाळी भारत देश हा आशियाई चित्त्यांचे घर होते पण १९५२ पासून हा प्राणी नामशेष झाल्यामुळे आपल्याकडे चित्त्याचं प्रमाण असून नसल्यासारखेच होते.
हे ही वाचा:
दिल्लीतील कर्तव्यपथावरील संचलनात ‘नारीशक्ती’चं अद्भुत दर्शन
१०६ जणांना पद्म पुरस्कार.. जाणून घ्या कोण मानकरी
लव्ह जिहादचे नेमके चित्रण करणाऱ्या ‘आवरण’ कादंबरीचे लेखक भैरप्पांना पद्मभूषण
पंतप्रधान मोदींनी वाहिली हुतात्म्यांना आदरांजली
नामिबियाहून गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात आपल्याकडे विशेष बोईंग ७४७-४०० या विमानाने मध्यप्रदेशच्या ‘ग्वाल्हेर’ येथे चित्ते दाखल झाले होते. नामिबियाची राजधानी विंडहॉक येथून आठ चित्ते आणण्यात आले होते या आठ चित्त्यांमध्ये पाच मादी आणि तीन नर चित्ते आहेत. २०२० मध्ये सुप्रीम कोर्टाने नामिबियातून चित्ता आणण्यास ग्रीन सिग्नल दिल्यानंतर सध्या या चित्ता प्रोजेक्टसाठी सरकारने ९१ कोटींचे बजेट राखून ठेवले आहे.
भारतातून चित्ता हा प्राणी सुमारे सत्तर वर्षांपूर्वीच नष्ट झाला आहे. पहिल्यांदाच जंगली चित्त्यांनी अशाप्रकारे एका खंडातून दुसऱ्या खंडात प्रवेश केला आहे. रेडीओ कॉलर लावलेल्या या आठ चित्त्यांनी कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होते. बारा चित्त्यांची पहीली तुकडी फेब्रुवारी २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात पाठवण्यात येणार असल्याचे दक्षिण आफ्रिकेच्या पर्यावरण विभा गाने एका निवेदनात म्हटले आहे. पुढील आठ ते दहा वर्षांसाठी दरवर्षी आणखी बारा चित्त्यांची भारतात पाठवणूक करण्याची योजना हि आखली असल्याचे ,”असेही त्यांनी म्हटले आहे.