आफ्रिकन देश मादागास्करमध्ये एका कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी होऊन काहींचा मृत्यू झाला असून लोक जखमी झाले आहेत. मादागास्करमध्ये इंडियन ओशन आयलँड गेम्सच्या (आयओआयजी) उद्घाटन समारंभात ही दुर्दैवी घटना घडली. यामध्ये १२ लोकांचा मृत्यू झाला असून ८० जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ११ जणांची प्रकृती गंभीर आहे.
शुक्रवार, २५ ऑगस्ट रोजी मादागास्करमधील बारिया स्टेडियमवर इंडियन ओशन आयलँड गेम्सचा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी सुमारे ५० हजार प्रेक्षक आले होते. यावेळी स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर चेंगराचेंगरी होऊन १२ जणांचा मृत्यू झाला. तर, ८० जण जखमी झाले आहेत. स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीचे खरे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
12 killed, 80 injured in Madagascar stadium stampede
Read @ANI Story | https://t.co/p01FGeZIbr #Madagascar #Stampede pic.twitter.com/ucce2Oyq74
— ANI Digital (@ani_digital) August 25, 2023
या घटनेनंतर मादागास्करचे पंतप्रधान ख्रिश्चन एनत्से हे जखमींची भेट घ्यायला रुग्णालयात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांना सांगितले की, “चेंगराचेंगरीत सुमारे ८० लोक जखमी झाले असून त्यापैकी ११ जणांची प्रकृती गंभीर आहे.” मादागास्करचे राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोएलिना यांनी मृतांबद्दल शोक व्यक्त केला आहे. राष्ट्राध्यक्षांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी शोक व्यक्त करताना शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
हे ही वाचा:
चाकरमान्यांना दिलासा; चिपी विमानतळावरून नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होणार
पृथ्वी ते चंद्रापर्यंतच्या अंतरापर्यंतचे रस्ते गावागावांत बनले
मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल बांधील
जगद्गुरू रामभद्राचार्य यांच्या अमृतमहोत्सवी जन्मोत्सवाची घोषणा
याआधीही २०१९ साली एका कॉन्सर्टदरम्यान या मैदानात चेंगराचेंगरी झाली होती. या चेंगराचेंगरीत १५ जणांचा मृत्यू झाला होता. या मैदानाची क्षमता सुमारे ४१ हजार लोकांची आहे.