रशिया युक्रेनवर युद्धाचे ढग गडद असताना आता रशियाच्या सैन्य तळावर मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे तर १५ जण जखमी झाले आहेत. एकीकडे रशिया आणि युक्रेनचा संघर्ष सुरु आहे. रशियाच्या सैन्य तळावर हा हल्ला झाला आहे.
दोन अज्ञात दहशतवाद्यांनी शनिवार, १५ ऑक्टोबर रोजी युक्रेनच्या सीमेजवळील रशियाच्या सैन्य तळावर गोळीबार केला. या दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ११ जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, रशियन सैन्यानेही दहशतवाद्यांवर प्रतिहल्ला चढवला. या गोळीबारात दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात रशियन सैन्याला यश आलं आहे, अशी माहिती रशियन संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.
रशियन संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या नैऋत्य रशियाच्या बेलगोरोड भागातील सैन्य तळावर हा हल्ला झाला. सरावादरम्यान दोन स्वयंसेवक बनून आलेल्या सैनिकांनी इतर सैनिकांवर गोळीबार केला. या गोळीबारात ११ सैनिकांचा मृत्यू झाला तर १५ सैनिक जखमी झाले आहेत. रशियन संरक्षण मंत्रालयाने या घटनेला दहशतवादी हल्ला म्हटलं आहे.
हे ही वाचा
रुद्रांक्ष पाटीलचा ‘ऑलिम्पिक वेध’
नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकताना उपस्थितांना भरून आले
‘एकता कपूर बिघडवत आहे तरुणाईला!’
रेल्वे गाड्यांनमधून पडून ४८७ प्रवाशांनी गमावले प्राण
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नाटोबाबत मोठं विधान करत इशारा दिला होता. रशिया आणि युक्रेनच्या संघर्षामध्ये नाटो उतरल्यास मोठा विध्वंस होईल, अशी धमकी पुतीन यांनी दिली होती.