30 C
Mumbai
Wednesday, July 3, 2024
घरदेश दुनियाइटलीच्या किनारपट्टीनजीक स्थलांतरितांचे जहाज बुडून ११ जणांचा मृत्यू

इटलीच्या किनारपट्टीनजीक स्थलांतरितांचे जहाज बुडून ११ जणांचा मृत्यू

अपघातात ६६ जण बेपत्ता; शोध मोहीम सुरू

Google News Follow

Related

इटलीच्या किनारपट्टीनजीक सोमवारी जहाज बुडाल्याचे वृत्त आहे. या अपघातात ११ स्थलांतरितांचा मृत्यू झाला असून ६६ जण बेपत्ता झाले आहेत. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, समुद्रात बोटी बुडाल्याची माहिती मिळताच इटलीच्या तटरक्षकांनी सोमवारी उशिरा भूमध्य समुद्रात शोध आणि बचाव कार्य सुरू ठेवले आहे. दक्षिण इटलीमधील कॅलाब्रियाच्या किनाऱ्यापासून सुमारे १२० मैल (१९३ किमी) दूर एका व्यापारी जहाजाने आपत्कालीन परिस्थितीची माहिती दिली. या भागात बोट आपत्तीग्रस्त दिसताच या जहाजाने त्वरित किनारी भागात संपर्क साधून बचाव कार्य पाठवण्यास सांगितले.

दरम्यान, बचाव कार्याचे पथक घटनास्थळी पोहचेपर्यंत व्यापारी जहाजाने १२ लोकांना वाचवले. तटरक्षक दलाच्या म्हणण्यानुसार, जहाजातून उतरल्यानंतर एका महिलेचा मृत्यू झाला, ती खूप आजारी होती. बोट बुडाल्यानंतर अजूनही प्रवाशांचा शोध घेतला जात आहे, असे तटरक्षक दलाने एका निवेदनात म्हटले आहे. कोस्ट गार्डने सांगितले की, या बचावकार्यात दोन इटालियन गस्ती नौका आणि एक एटीआर ४२ विमान सहभागी होते. तसेच वैद्यकीय पथकांसह आणखी एक गस्ती जहाज लवकरच शोध मोहिमेत सामील होतील.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बेपत्ता असलेल्या ६६ लोकांपैकी २६ अल्पवयीन आहेत. वाचलेल्यांच्या म्हणण्यानुसार, इराक, सीरिया, इराण आणि अफगाणिस्तानमधील स्थलांतरित आणि निर्वासितांना घेऊन बोटीने गेल्या आठवड्यात तुर्की सोडले. इटालियन अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. ही बोट भूमध्य समुद्रातून युरोपात जाण्याचा प्रयत्न करत होती.

हे ही वाचा:

विश्वचषक स्पर्धेच्या सुपर आठमध्ये फिरकीपटू कमाल दाखवतील

‘जणू भूकंप झाल्यासारखे वाटले’

‘मैतेई-कुकी समाजाशी केंद्र सरकार चर्चा करणार’

राहुल गांधींकडून रायबरेलीची निवड; प्रियांका वायनाडमधून निवडणूक लढवणार

भूमध्य समुद्रातून बोटीतून प्रवास करणाऱ्या स्थलांतरितांना हवामान आणि खराब दर्जाच्या जहाजांमुळे अशा धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागतो. या वर्षी भूमध्यसागर पार करताना सुमारे एक हजार लोक मरण पावले आहेत किंवा बेपत्ता झाले आहेत, असे यूएनच्या आंतरराष्ट्रीय स्थलांतर संस्थेने म्हटले आहे की २०२३ मध्ये ३ हजार १५५ लोक बेपत्ता झाल्याची नोंद आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
163,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा