25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरदेश दुनियामदतीच्या प्रतीक्षेत जमलेल्या १०४ पॅलिस्टिनींचा चेंगराचेंगरीत मृत्यू

मदतीच्या प्रतीक्षेत जमलेल्या १०४ पॅलिस्टिनींचा चेंगराचेंगरीत मृत्यू

Google News Follow

Related

मदतीसाठी जमलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांवर इस्रायलने गोळीबार केल्याने १०४ पॅलिस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप गाझातील अधिकाऱ्यांनी केला असताना इस्रायलच्या संरक्षण दलाने मात्र त्यांचा मृत्यू गर्दीमुळे आणि ट्रकने चिरडल्याने झाल्याचा दावा केला आहे. उत्तर गाझा पट्टीत मानवी मदत आणणाऱ्या ट्रकभोवती पॅलिस्टिनींनी कशी गर्दी केली होती, त्याचे वरून घेतलेले चित्रिकरणही इस्रायलच्या संरक्षण दलाने ‘एक्स’वर जाहीर केले आहे. तसेच, अनेकांचा मृत्यू ट्रकच्या चाकाखाली चिरडून झाल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

‘मदतीच्या ट्रकभोवती लोकांचा गराडा पडला होता. ते ट्रकमधील माल लुटण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना रोखण्याच्या प्रयत्नात चालकाने ट्रक जमावामध्ये रेटल्यामुळे अनेकजण ठार झाले,’ असे प्रवक्ते अवी हायमन यांनी सांगितले.
रॉयटरने दिलेल्या वृत्तांनुसार, गाझाजवळ मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पॅलिस्टिनी नागरिकांवर इस्रायलच्या लष्कराने गोळीबार केल्याने १०४ पॅलिस्टिनींचा मृत्यू तर २८० जखमी झाल्याचा दावा गाझामधील आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे.

हे ही वाचा:

कर्नाटकात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या; फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट

हिमाचलच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह भाजपावर खुश

मुंबईत पोलीस निरीक्षकाविरोधात बलात्काराचा गुन्हा

स्वामी समर्थतर्फे व्यावसायिक कबड्डी ५ मार्चपासून

तर, एका रुग्णालयाने त्यांना १० मृतदेह आढळले असल्याचे म्हटले आहे. पॅलिस्टिनचे अध्यक्ष मोहम्मद अब्बास यांनीही या घटनेबद्दल खेद व्यक्त करून इस्रायलच्या लष्कराने हे अतिशय भयानक हत्याकांड घडवल्याचे म्हटले आहे. हमासने गाझा पट्टीतून घुसखोरी करून इस्रायलवर ७ ऑक्टोबर, २०२३ रोजी हल्ला केला होता. त्यात १२०० जण ठार झाले होते. तर, २५३ जणांना ओलिस ठेवण्यात आले होते. त्यानंतर इस्रायलने पुकारलेल्या युद्धात ३० हजार पॅलिस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. अनेकांचे मृतदेह अजूनही तेथील ढिगाऱ्याच्या खाली असतील, असे म्हटले जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा