इराणमधील स्फोटात १०३ जणांचा मृत्यू

इराणमधील स्फोटात १०३ जणांचा मृत्यू

इराणमधील केरमन शहरात बुधवारी झालेल्या दोन स्फोटांत १०३ जणांचा मृत्यू झाला. चार वर्षांपूर्वी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारले गेलेले इराणी लष्करी अधिकारी जनरल कासिम सुलेमानी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हे स्फोट झाले. हमासचा उपप्रमुख आणि इराणचा समर्थक सालेल अल आरुरी बैरूत येथे मारला गेला असतानाच हा दहशतवादी हल्ला झाल्यामुळे मध्य आशियाई भागात पुन्हा संघर्ष चिघळण्याची भीती व्यक्त होत आहे.

सन २०२०मध्ये बगदाद विमानतळाबाहेर अमेरिकेच्या ड्रोनहल्ल्यात सुलेमानी मारले गेले होते. केरमन येथील साहेब अल-झमन मशिदीजवळ सुलेमानी यांची कबर आहे. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त शेकडो नागरिक जमले असताना हे स्फोट झाले. केरमन येथील उपराज्यपालांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. या स्फोटांत सुमारे १७० जण जखमी झाले. घटनास्थळी स्फोटकांनी भरलेल्या दोन बॅगांचा स्फोट झाला. रिमोट कंट्रोलच्या साह्याने हे स्फोट घडवण्यात आले, अशी माहिती स्थानिक वृत्तसंस्थेने दिली. १० मिनिटांच्या फरकाने हे स्फोट झाले. स्फोटानंतर उपस्थितांमध्ये एकच घबराट पसरली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी हा परिसर तत्काळ रिकामा केला.

सुलेमानी हे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या एलिट कुडूस फोर्सचे तत्कालीन प्रमुख होते. तसेच, संपूर्ण मध्य पूर्वेकडील देशांमधील लष्करी कारवायांची जबाबदारी त्यांच्यावर होती. तसेच, इराणच्या प्रादेशिक लष्करी हालचालींचे रणनीतीकार होते. इराणी राजवटीच्या समर्थकांमध्ये ते राष्ट्रीय नेते म्हणून लोकप्रिय होते. त्यांच्या हत्येनंतर मोठ्या प्रमाणात निदर्शनेही झाली होती.

हे ही वाचा..

जम्बो कोविड सेंटर कथित घोटाळयाप्रकरणी आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयावर गुन्हा दाखल

“मुल्लांच्या दाढ्या कुरवाळण्यासाठी जितेंद्र आव्हाड कुठल्या थराला गेलेत पहा”

महालक्ष्मी रेसकोर्सवर डोळा नेमका कोणाचा?

“मुल्लांच्या दाढ्या कुरवाळण्यासाठी जितेंद्र आव्हाड कुठल्या थराला गेलेत पहा”

इराक आणि सिरियामधील दहशतवादी गट इस्लामिक स्टेटचा पराभव करण्याचे श्रेय त्यांना जाते. सन २०२०मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी हजारो जण आदरांजली वाहण्यासाठी आणि राष्ट्रीय एकता दाखवण्यासाठी उपस्थित होते. सन २०१८मध्ये इराणमध्येच घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात सुलेमानी यांची लोकप्रियता तब्बल ८३ टक्के होती. त्यांनी लोकप्रियतेत इराणचे तत्कालीन अध्यक्ष हसन रुहानी आणि परराष्ट्रमंत्री मोहम्मद जावेद झारिफ यांना मागे टाकले होते.

Exit mobile version