गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अमेरिकेत १० हजार जणांचं सामूहिक भगवद्गीता पठण

टेक्सास येथे गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने गीता पठणाचा कार्यक्रम आयोजित

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अमेरिकेत १० हजार जणांचं सामूहिक भगवद्गीता पठण

गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जगभराती अनेक देशांमध्ये भारतीय नागरिकांकडून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून सोमवारी अमेरिकेतही भगवद्गीता पारायण यज्ञ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात तब्बल १० हजार लोकांनी भगवद्गीता पठण केले.

गुरूपौर्णिमेच्या दिवशी अमेरिकेच्या टेक्सास येथे तब्बल १० हजार लोकांनी सामूहिक भगवद्गीता पठण केले. गेल्या अनेक वर्षांपासून टेक्सास येथे गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने गीता पठणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमासाठी सर्व वयोगटातील लोक टेक्सासमधील अलेन ईस्ट सेंटर येथे जमतात आणि सामूहिक भगवद्गीता पठण करतात. भगवद्गीता पारायण यज्ञ हा कार्यक्रम योगा संगीता आणि एसजीएस गीता फाऊंडेशन यांनी आयोजित केला होता.

यावेळी जगप्रसिद्ध धार्मिक गुरू पुज्य गणपती सच्चिदानंद यांच्या उपस्थितीत या सामूहिक भगवद्गीतेचे पठण करण्यात आले. अवधुता दत्ता पिठम ही एक आंतरराष्ट्रीय धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था आहे. श्री गणपती सच्चिदानंद स्वामींनी १९६६ मध्ये या संस्थेची स्थापना केली होती.

हे ही वाचा:

७ जुलैपासून ९९९ रुपयांत जीओ भारत फोन

अमेरिकन गायिका मिलबेन राहुल गांधींवर उखडल्या

फ्रान्समध्ये हिंसाचार प्रकरणी ३ हजार अटकेत; बहुसंख्य मुस्लिमांचा समावेश

उद्धव ठाकरेंचे आता काय होणार?

अमेरिकेत १० हजार लोकांनी एकत्र येऊन गीतेचे पठण करण्याची ही पहिलीच वेळ नसून गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम येथे आयोजित केला जातो. हिंदू सनातन धर्माची जनजागृती आणि प्रसार व्हावा याकरता या कार्यक्रमाचे अमेरिकेत आयोजन केले जात असल्याची माहिती आहे.

Exit mobile version