१० लाख आशाताईंचा WHO कडून सन्मान

१० लाख आशाताईंचा WHO कडून सन्मान

कोविड महामारीच्या काळात आरोग्य सेवेत आपलं अमुल्य योगदान देणाऱ्या आशाताईंचा गौरव करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आशाताईंच्या कार्याची दखल घेत त्यांच्या कामाचा गौरव केला आहे. भारतातील १० लाख आशाताईंचा जागतीक आरोग्य संघटनेकडून गौरव करण्यात आला आहे.

आशाताई या भारतातील मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्त्या आहेत. ज्या ग्रामीण भागात मानधन तत्वावर आरोग्य स्वयंसेवक म्हणून काम करतात. या आशाताईंनी कोविड महामारीच्या काळात ग्रामीण भागातील जनतेला प्राथमिक आरोग्य सेवा मिळू शकतील याची काळजी घेतली. त्यांच्या या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल त्यांना जागतीक आरोग्य संघटनेकडून सन्मानित करण्यात आले आहे. जागतीक आरोग्य सेवेत उत्कृष्ट योगदान, नेतृत्व आणि वचनबद्धता या आशाताईंमधील गुणांची जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेतली आहे.

आशाताई लस-प्रतिबंधित रोगांपासून लहान मुलांची आणि त्यांच्या मातांची काळजी घेणं तसेच त्यांचं लसीकरण करण्याचं काम या आशाताई करतात. समुदायिक आरोग्य सेवा, उच्च रक्तदाब आणि क्षयरोग उपचार तसेच पोषण, स्वच्छता आणि निरोगी जीवनासाठी आरोग्य संवर्धनाच्या मुख्य क्षेत्रांमध्ये त्या काम करतात असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदी जपान दौऱ्यावर

‘१.५, २ रुपये इंधन दर कमी करणे ही सामान्य माणसाची क्रूर थट्टा’

फोटो काढला दुसऱ्याने; बळी मात्र लिलावतीचे सुरक्षा अधिकारी पराग जोशींचा

पश्चिम बंगालच्या तृणमूल उमेदवार निघाल्या बांगलादेशी नागरिक

७५ व्या जागतिक आरोग्य संमेलनामध्ये या पुरस्कारांचे वाटप झाले. २०१९ मध्ये हा विशेष पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. या सोहळ्यात जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस एधानोम घेब्रेयसस यांनी सहा ग्लोबल हेल्थ लीडर्सचे पुरस्कारही जाहीर केले.

Exit mobile version