अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील एका सुपरमार्केटमध्ये भीषण गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक जखमी झाले आहेत. दरम्यान हल्लेखोर पकडला गेला असून पोलिस सध्या कारवाई करत आहेत.
न्यूयॉर्कमधील बफेलो येथील जेफरसन अव्हेन्यूजवळ एका हल्लेखोराने शनिवार, १४ मे रोजी अचानक लोकांवर गोळीबार केला. या घटनेत दुर्दैवाने १० जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. दुकानात मारल्या गेलेल्यांमध्ये एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश असल्याची माहिती आहे. घटनास्थळी पोलिस अधिकारी सशस्त्र सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते.
At least eight people have been killed in a shooting at a supermarket in Buffalo, New York, said law enforcement officials: The Associated Press
— ANI (@ANI) May 14, 2022
हे ही वाचा:
‘तुम्ही वैयक्तिक टीका करता, आम्ही म्याव म्याव केलं तर चालत नाही?’
‘शिवसेना औरंगजेब सेना झाली आहे का?’
केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलिस कोठडी
‘शिवसेना औरंगजेब सेना झाली आहे का?’
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर हा लष्करी वेशभूषेत होता. त्याच्या अंगावर ‘संरक्षण कवच’ ही होते. तसेच जेव्हा तो त्याच्या वाहनातून बाहेर पडला तेव्हा तो सशस्त्र होता. त्याच्याकडे हेल्मेटही होते आणि त्याच्याकडे एक कॅमेराही होता ज्याद्वारे ही घटना लाईव्ह स्ट्रीम केली जात होती.