जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत होत असताना अमेरिकेतील न्यू ऑरलियन्स येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जमलेल्या लोकांना भरधाव ट्रकने चिरडले असून त्यानंतर हल्लेखोरांनी ट्रकमधून उतरून जमावावर बेछूट गोळीबार केला. या घटनेत किमान १० लोक ठार झाले तर ३५ हून अधिक जखमी झाले आहेत. हा घातपात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
बुधवारी सकाळी (स्थानिक वेळेनुसार) सेंट्रल न्यू ऑरलियन्समध्ये लोक नववर्षाच्या स्वागतासाठी जमले होते. यावेळी लोकांच्या गर्दीत ट्रक घुसल्याने किमान १० लोक ठार आणि ३५ हून अधिक जखमी झाले आहेत. पहाटे ३.१५ च्या सुमारास बोरबॉन स्ट्रीट आणि इबरव्हिलच्या भागात ही घटना घडली. हा परिसर त्याच्या गजबजलेल्या नाइटलाइफसाठी ओळखला जातो.
हे ही वाचा :
७५ वर्षांनंतर पहिल्यांदा ‘या’ गावातील गावकरी अनुभवणार बस सेवा!
मातोश्रीवर संजय राऊत यांना बुकलले? सोशल मीडियावर गरमागरम चर्चा
संरक्षण मंत्रालयाकडून २०२५ हे ‘सुधारणेचे वर्ष’ म्हणून घोषित
२६/११ चा आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा!
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, एक ट्रक वेगाने गर्दीत घुसला होता. यानंतर चालकाने गर्दीत लोकांवर गोळीबाराचाही प्रयत्न केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अनेक लोकांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार न्यू ऑरलियन्स पोलिसांनी संशयितावर गोळीबार केला. मात्र, त्याच्याबाबत अद्याप अधिक माहिती समोर आलेली नाही. या घटनेनंतर पीडितांना स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.