22 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरदेश दुनियाजोशीमठमध्ये इमारती, रस्त्यांना गेलेले तडे हे वाढत्या पर्यटनाचे परिणाम?

जोशीमठमध्ये इमारती, रस्त्यांना गेलेले तडे हे वाढत्या पर्यटनाचे परिणाम?

जोशीमठ बुडतंय , पर्यटकांचा वाढता ओघ , घरांना तडे गेल्याने लोकांचा निषेध

Google News Follow

Related

उत्तराखंडमधील जोशीमठ या भागातील घरांना, रस्त्यांना, हॉटेलांना तडे गेल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. त्याची वेगवेगळी कारणे समोर येऊ लागली आहेत. पर्यटकांची वाढती संख्या आणि त्यामुळे पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ हीदेखील याला कारणीभूत आहे का असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. वर्षाला १० कोटी लोक पर्यटक म्हणून  उत्तराखंडला भेट देतात. २०२२ मध्ये पाच कोटी पर्यटक,३.८ कोटी कावड यात्री आणि ४५ लाख चारधाम यात्रा करणाऱ्या लोकांनी उत्तराखंडला भेट दिली. कोरोनानंतर २०२२ हे पर्यटनाच्या दृष्टीने सर्वात यशस्वी वर्ष ठरले. पायाभूत सुविधा,वैज्ञानिक अभ्यास आणि त्याचे मूल्यमापन यांच्याशी संबंधित अनेक घटकांवर अनेक प्रश्न  तज्ज्ञांनी  उपस्थित केले आहेत.

पर्वत रांगा आणि रहिवासी क्षेत्र जोशीमठ २०१९ मध्ये ४.९ लाख,२०१८ मध्ये ४.३ लाख २०१७ मध्ये २.४ लाख भक्त गण येऊन गेले तर २०२२ मध्ये चक्क् ही संख्या दुप्पट होऊन ४५ लाखांत गेली. मसुरी आणि नैनिताल या मुख्य हिल स्टेशनला २०२० आणि २०२१ हा कोविड महामारीचा काळ वगळता पर्यटकांमुळे खूप भार वाढत आहे.  मसुरीला २०१७ मध्ये २७ लाख,२०१८ आणि २०१९ मध्ये प्रत्येकी ३० लाख,२०२० मध्ये १० लाख,२०२१ मध्ये १२ लाख भाविक होते, तर नैनितालला, २०१७  मध्ये ९.१ लाख,२०१८,२०१९ मध्ये प्रत्येकी ९.३ लाख,२०२० मध्ये ३.३ लाख पर्यटकांनी भेट दिली.

डोंगरांवर वसलेल्या या शहरांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास होणे गरजेचे आहे. स्थानिकांच्या दृष्टिकोनातून एकूणच क्षमता जाणणे गरजेचे आहे. जोशीमठ मध्ये १९७६ साली काही हजार लोक होते आता ती संख्या २५ हजारच्या वर गेली आहे. प्रत्येक गावाला किंवा शहराला एक मर्यादा असते ती लक्षांत ठेवणे गरजेचे आहे.

हे ही वाचा:

सानिया मिर्झाचा टेनिसला अलविदा

आता आधार संजयबाबा बंगालींचा…

संजय राऊत तु जिथे बोलावशील तिथे यायला मी तयार

‘द रेझिस्टन्स फ्रंट’ दहशतवादी संघटनेवर बंदी

“संबंधित अधिकाऱ्यांनी सतत दुर्लक्ष केल्यामुळे जोशीमठ याची जी अवस्था आहे ती माझ्यासाठी धक्कादायक नाही. याआधी १९७६ मध्ये हा मुद्दा गाजला पण कोणीच त्याची दखल घेतली नाही, एक नदीसुद्धा वाहत आहे पण शहरीकरणामुळे कोणालाच लक्ष द्यायला वेळ नाही. पर्यावरण आणि पुढील पिढीसाठी याकडे गंभीर पणे बघणे आवश्यक आहे, असे  पद्मभूषण प्राप्त आणि HESCO या संस्थेचे संस्थापक अनिल जोशी म्हणाले.ते पुढे असेही म्हणतात, १००० मीटर च्या पलीकडे कोणतेही बांधकाम हे गांभीर्यानेच घेतले पाहिजे त्याचा सखोल अभ्यास करूनच परवानगी द्यावी.

कठोर कायदे आवश्यक

या भागाचे सर्वेक्षण करणारे सोशल डेव्हलपमेंट फॉर कॉम्युनिटीज चे संस्थापक अनुप नौटियाल म्हणाले जोशीमठ ही तर फक्त सुरुवात आहे, उत्तराखंड मध्ये अशा अनेक घटना घडण्याची वाट बघत आहेत. आणि अशा घटना घडू नये म्हणून परिस्थिती आटोक्यात आणावी लागेल. ते पुढे असेही म्हणाले की, धर्मशाळा, हॉटेल, घरगुती राहण्याची व्यवस्था करणारे हे व्यावसायिक आहेत यांच्याकडे येणारे भाविक आहेत त्यांच्यापासून इथल्या जागांना एक असुरक्षित धोका आहेच पण ठरवलेल्या उंचीपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींच्या विरोधात काही तरतुदी आणि कठोर कायदे आवश्यक आहेत .

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा