24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरदेश दुनियाआयुष्मान भारत आधारित स्कॅन-शेअर सेवेचा दहा लाख रुग्णांना लाभ

आयुष्मान भारत आधारित स्कॅन-शेअर सेवेचा दहा लाख रुग्णांना लाभ

रुग्णालयाच्या रांगेत उभे राहण्यासाठी लागणाऱ्या वेळेची बचत होण्यास झाली मदत

Google News Follow

Related

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण अर्थात एनएचए आयुषमान भारत डिजिटल मिशन या एबीडीएम योजनेअंतर्गत आरोग्य सेवांच्या वितरणात कार्यक्षमता आणण्यासाठी डिजिटल पध्दतीचा वापर करत आहे.  यापैकी एक ‘स्कॅन आणि शेअर’ ही सेवा आहे, जी सहभागी रुग्णालयांतील बाह्य रुग्ण विभागात ओपीडी रुग्णांची त्वरित नोंदणी करून घेते. या सेवेचा वापर सुरू झाल्यापासून सहा महिन्यांत यात दहा लाख रुग्णांची नोंदणी झाली आहे. गेल्या महिन्यात २३ फेब्रुवारी २०२३ या सेवेद्वारे पाच लाख रुग्णांची नोंदणी केली गेली,  हे  प्रमाण लक्षणीय आहे.

ही संख्या वाढल्याने स्कॅन आणि शेअर सेवेचा प्रभाव आणि स्वीकृती स्पष्ट होते.  स्कॅन आणि शेअर सेवेबद्दल बोलताना, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी  एनएचएच, सीईओ म्हणाले “ आभाचे  एबीडीएम  उद्दिष्ट डिजिटल पध्दतीने सुरळीत आरोग्य सेवा वितरण परीसंस्था तयार करणे हे आहे. स्कॅन आणि शेअर वैशिष्ट्यासह, रुग्णालये त्यांच्या रुग्णांना त्यांच्या आभा नोंदणीच्या आधारे थेट सामायिक करून डिजिटल नोंदणी सेवा देत आहेत. यामुळे रुग्णांना रांगेत उभे न राहता अथवा अनेक तपशील न टाकता त्वरित नोंदणी टोकन मिळण्यास मदत होत आहे. सध्या, दररोज सरासरी सुमारे २५,००० रुग्ण ओपीडी टोकन घेत आहेत. लवकरच प्रतिदिन एक लाख टोकन्सचा आकडा पार करण्याचा आमचा मानस आहे.यानंतर, आम्ही रुग्ण आणि आरोग्य सेवादाते यांच्यातील परस्परसंवादाची वैशिष्ट्ये वाढवण्याची योजना आखत आहोत.

हे ही वाचा:

गुगल, मायक्रोसॉफ्टला टक्कर .. लवकरच येतोय भारतीय बनावटीचा चॅटजीपीटी

भाजपचे लढवय्ये आणि अजातशत्रू खासदार गिरीश बापट यांचे निधन

करमुसे प्रकरणातील आरोपी आणि जितेंद्र आव्हाडांचे माजी अंगरक्षक वैभव कदम यांची आत्महत्या

भाजपा शिवसेना युतीचे नेते म्हणत आहेत ‘मी सावरकर, आम्ही सावरकर’

स्कॅन आणि शेअर सेवा क्यूआर कोड आधारित थेट माहिती सामायिक करत कार्य करते. सहभागी रुग्णालये त्यांच्या रुग्ण नोंदणी काउंटरवर त्यांचे विशिष्ट क्यू आरकोड प्रदर्शित करतात. रुग्ण, या सेवेसाठी मोबाइल ॲप वापरून क्यू आरकोड स्कॅन करण्यासाठी त्यांच्या स्मार्टफोनचा वापर करून आपली नोंदणी करतात सध्या एबीएच ॲप, आरोग्य सेतू, ड्रायफकेस, पेटीएम, बजाज हेल्थ आणि ई केअर यांच्याशी संलग्न केले आहे. त्यानंतर रुग्ण त्यांचे आभा खाते एबीएचए, आयुष्मान भारत आरोग्य खाते तयार करतो किंवा त्यांच्या विद्यमान आभा खात्यात लॉग इन करतो. डिजिटल आरोग्य प्रोत्साहन योजनेविषयी सविस्तर माहिती https://abdm.gov.in/DHIS या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा