23 C
Mumbai
Saturday, January 11, 2025
घरदेश दुनियासुशीलकुमारचा ठावठिकाणा सांगा आणि मिळवा १ लाख

सुशीलकुमारचा ठावठिकाणा सांगा आणि मिळवा १ लाख

Google News Follow

Related

फरार झालेल्या कुस्तीगीरासाठी पोलिसांकडून शोधमोहीम

भारताचा ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीगीर सुशीलकुमार सध्या फरार असून त्याला पकडण्यासाठी १ लाखाचे इनाम लावण्यात आले असून त्याचा सहकारी अजय याच्यावर ५० हजारांचे इनाम लावले गेले आहे. छत्रसाल स्टेडियममध्ये एका ज्युनियर कुस्तीगीराच्या मृत्यूप्रकरणी सुशील कुमार आणि सहा जणांचा शोध पोलिस घेत आहेत.

या सगळ्यांनी सागर धांकड नावाच्या कुस्तीगीराला केलेल्या कथित मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. ४ मे रोजी छत्रसाल स्टेडियममध्ये हाणामारीचा प्रकार झाला होता, त्यात धांकडचा मृत्यू झाला होता. धांकडला त्या हाणामारीत ज्या जखमा झाल्या होत्या त्यामुळेच त्याला प्राण गमवावे लागले. या प्रकरणात धांकडचे सहकारी सोनू आणि अमित कुमार यांनी सुशील कुमारचे नाव घेतले असून त्याआधारे सुशीलकुमारवर आरोप ठेवण्यात आले आहेत.

हे ही वाचा:
जगाला हिटलरची गरज म्हणणाऱ्या पाक पत्रकाराची हकालपट्टी

बंगालमधील अराजकता लोकशाही मूल्यांचा अस्त करणारी

जिल्हा जिंकला तर देश जिंकेल, मोदींचा जिल्हाधिकाऱ्यांना संदेश

टोकियो ऑलिम्पिक रद्द करा, स्थानिक डॉक्टरांची मागणी

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, हरयाणा, उत्तराखंड आणि दिल्ली येथे पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली असून सुशीलकुमारला अटक करण्यासाठी पोलिसांनी ही मोहीम तीव्र केली आहे.

दरम्यान, सुशील कुमारने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून मंगळवारी त्याची रोहिणी न्यायालयात सुनावणी होती. २३ वर्षी धांकडच्या मृत्यूप्रकरणी सुशील आणि इतरांवर अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडणारे वकील अतुल श्रीवास्तव यांनी म्हटले आहे की, सुशील कुमारचा पासपोर्ट ताब्यात घेण्यात आलेला नाही. दिल्ली न्यायालयाने अटकपूर्व जामिनासाठी केलेली याचिका राखून ठेवली असून दिवसभरात ते यासंदर्भात निर्णय देणार आहेत.

सुशीलकुमारने २००८चे बीजिंग आणि २०१२चे लंडन ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकली आहेत. रिओ ऑलिम्पिकमध्येही सहभागी होण्याची त्याची इच्छा होती, पण तो पात्र ठरला नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा