भारतीय स्टीलच्या किंमती महागल्या

भारतीय स्टीलच्या किंमती महागल्या

भारतातील स्टीलच्या किंमती महागण्याची चिन्हे दिसत आहेत. केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चिंता व्यक्त केली होती.

भारतातील स्टीलच्या किंमती सतत वाढत्या असल्या तरीही, त्या गेल्या आयात होणाऱ्या स्टीलपेक्षा सुमारे ५ टक्क्यांनी कमीच आहेत. स्टीलच्या वाढत्या किंमतींमुळे बांधकाम क्षेत्रावर चिंतेचे सावट आहे. स्टीलच्या किंमती वाढल्याचा परिणाम म्हणून पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या एकूण खर्चात वाढ होऊन, ते अव्यवहार्य होण्याची शक्यता वाढते. नोव्हेंबर स्टीलच्या रोलच्या किंमतीत ४६ टक्क्यांची वाढ झाली होती. जुलै महिन्यात प्रतिटन ₹३७,४०० असलेली किंमत वाढून ₹५२,००० प्रतिटन झाली होती.

स्टील उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात कोळसा लागतो. जगाच्या एकूण कोळसा उत्पादनापैकी ६५टक्के उत्पादन ऑस्ट्रेलियामधून होते. चीन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तणावाचा थेट परिणाम ऑस्ट्रेलियातून आयात केल्या जाणाऱ्या कोळशावर झाला आहे. ऑस्ट्रेलिय ऐवजी इतर देशांतून कोळसा आयात करावा लागल्याने चीनमधील कोळसा महागला आहे. 

याच्या उलट ऑस्ट्रेलियातील कोळशाची मागणी अचानक कोसळल्याने त्याचे भाव गडगडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचा फायदा भारतीय स्टील उत्पादकांना होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. चीन आणि ऑस्ट्रेलियामधीन व्यापारी तणावाचा परिणाम म्हणून, कोळशाचा किंमतीत सुमारे २७ टक्क्यांची घट झाली आहे. 

Exit mobile version