23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामापाकिस्तानमध्ये आणखी एका मोस्ट वाँटेड दहशतवाद्याची हत्या

पाकिस्तानमध्ये आणखी एका मोस्ट वाँटेड दहशतवाद्याची हत्या

Google News Follow

Related

पाकिस्तानमध्ये गेल्या दोन दिवसांत कुख्यात दहशतवाद्यांच्या मृत्यूचे वृत्त समोर आले आहे. शनिवारी पाकिस्तानस्थित मोस्ट वाँटेड दहशतवादी कमांडरपैकी एक असलेला शेख जमील-उर-रहमान हा खैबर पख्तूनख्वामधील एबोटाबादमध्ये गूढ परस्थितीत मृतावस्थेत आढळला आहे. रहमान हा युनायटेड जिहाद कौन्सिल (यूजेसी)चा सरचिटणीस आणि तहरिक-उल-मुजाहिदीन (टीयूएम)चा अमीर होता. तो काश्मीरच्या पुलवामा येथील निवासी होता.

ऑक्टोबर २०२२मध्ये भारताच्या गृह मंत्रालयाने त्याला दहशतवादी घोषित केले होते. त्याचा मृत्यू कसा झाला, हे अद्याप समजू शकले नाही. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तो जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांत सहभागी होता आणि पाकिस्तानची गुप्तचरसंस्था आयएसआयसोबत कामही करत असे. गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानमधील अनेक दहशतवाद्यांचा गूढरीत्या मृत्यू झाला आहे.

टीयूएमची स्थापना जम्मू काश्मीरला पाकिस्तानमध्ये विलीन करण्यासाठी आणि अखिल इस्लामवादी ओळखीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केली गेली होती. तर, जम्मू काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या सर्व दहशतवादी संघटनांना एका मंचावर आणण्याचा प्रयत्न करणारी यूजेसी ही एक कट्टरपंथींची संघटना आहे. या संघटनेत लश्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, अल बद्र, हिजबुल मुजाहिदीन आणि अन्य दहशतवादी संघटनांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

वातावरण बदलाचा परिणाम वेळास कासव महोत्सवावर

४ दिवसांत ४०० जेट, अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये जमले खास सेलिब्रिटी!

बारामतीमधील महा रोजगार मेळाव्याच्या मंचावर रंगला टाळाटाळीचा खेळ

केसीआरला धक्का! दोन दिवसात दोन खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यूजेसीचा सध्या इस्लामिक स्टेटने प्रेरित असेलल्या जेके-आयएस आणि अल-कायदाची शाखा अंसार गजवत-उल-हिंद सारख्या दहशतवादी संघटनांशी संघर्ष सुरू आहे. टीयूएमला पाकिस्तान, बांगलादेश, सौदी अरेबिया, ब्रिटन, अमेरिका आणि आखाती देशांमधून निधी प्राप्त झाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा