ट्रम्प टीममधील AI साठी वरिष्ठ धोरण सल्लागारपदी नियुक्त झालेले भारतीय वंशाचे श्रीराम कृष्णन कोण आहेत?

कृत्रिम बुद्धिमत्तेवरील व्हाईट हाऊसचे वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून निवड

ट्रम्प टीममधील AI साठी वरिष्ठ धोरण सल्लागारपदी नियुक्त झालेले भारतीय वंशाचे श्रीराम कृष्णन कोण आहेत?

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आले असून अगदी काही दिवसांतचे ते राष्ट्राध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. अशातच, ट्रम्प यांनी निवडणून येताच आपल्या नव्या टीमच्या बांधणीला सुरुवात केली असून यात त्यांनी अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. विशेष म्हणजे यात अनेक भारतीय वंशाचे दिग्गज असून महत्त्वाच्या पदांचा पदभार ते ट्रम्प यांच्या सरकारमध्ये सांभाळणार आहेत. यानंतर आणखी एका भारतीय वंशाच्या दिग्गजाला ट्रम्प यांनी आपल्या टीममध्ये दाखल करून घेतले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अमेरिकन उद्योजक श्रीराम कृष्णन यांची कृत्रिम बुद्धिमत्तेवरील व्हाईट हाऊसचे वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून निवड केली आहे. एका अधिकृत निवेदनात जिथे त्यांनी इतर अनेक नियुक्त्यांची घोषणा केली. ट्रम्प म्हणाले की, श्रीराम कृष्णन व्हाईट हाऊस ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी पॉलिसी कार्यालयात कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून काम करतील. श्रीराम कृष्णन हे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती असून त्यांनी मायक्रोसॉफ्ट, द्विटर, याहू!, फेसबुक आणि स्नॅप यांसारख्या मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर काम केले आहे. श्रीराम कृष्णन आता व्हाईट हाऊसचे AI आणि क्रिप्टो झार डेव्हिड सॅक्स यांच्यासोबत काम करणार आहेत. ट्रम्प प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण तयार करणे आणि समन्वय साधणे ही त्यांची मुख्य जबाबदारी असेल.

हे ही वाचा: 

मालेगाव व्होट जिहाद: मुंबईतील सहा बँकांमधून सिराज मोहम्मदसह बेनामी खात्यांमध्ये आले कोटी कोटी

पोलिसांशी झालेल्या चकमकीत खलिस्तान कमांडो फोर्स संघटनेचे तीन दहशतवादी ठार

पुण्यात डंपरने नऊ जणांना चिरडले; मद्यधुंद चालकाला केली अटक

ठाकरेंच्या अटी-शर्थींवर शिक्कामोर्तब… मात्र, जिंकले अदाणी

कोण आहेत श्रीराम कृष्णन?

श्रीराम कृष्णन यांचा जन्म चेन्नई येथे झाला असून त्यांनी तमिळनाडूच्या कांचीपुरम येथील कट्टनकुलथुर येथील एसआरएम अभियांत्रिकी महाविद्यालयातून माहिती तंत्रज्ञानात बीटेक पूर्ण केले. ते २००५ मध्ये अमेरिकेत गेले. कृष्णन यांचा टेकविश्वातील प्रवास २००५ मध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये सुरू झाला. कृष्णन यांनी २०२२ मध्ये ट्विटरसाठी (आता एक्स) एलोन मस्क यांच्यासोबत काम केले होते. कृष्णन, एक गुंतवणूकदार, भारतीय फिनटेक कंपनी क्रेडमध्ये सल्लागार देखील आहेत. त्यांची पत्नी आरती राममूर्तीसह ‘द आरती आणि श्रीराम शो’ पॉडकास्ट सह- होस्ट करण्यासाठी ते ओळखले जातात.

Exit mobile version