आगीत होरपळून दहा बालकांचा मृत्यू

आगीत होरपळून दहा बालकांचा मृत्यू

भंडाऱ्यातील हॉस्पिटलमधील करूणामय प्रसंग

भंडारा येथे लागलेल्या आगीत होरपळून १० नुकत्याच जन्मलेल्या अर्भकांचा होरपळून मृत्यू झाला. शनिवार दिनांक ९ जानेवारी २०२१ रोजी दुपारी २ वाजता भंडारा येथील हॉस्पिटलला लागलेल्या आगीमध्ये १० बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सात बालकांना वाचवण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. सिवील सर्जन डॉ. प्रमोद खंदाटे यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार तीन ते चार बालकांचा मृत्यू आगीत जळून झाला, तर इतर बालकांचा मृत्यू प्राणवायू पुरवठा करणारी यंत्रणा बंद पडल्याने झाला.

प्रथम दर्शनी माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी. त्यावेळी एक डॉक्टर आणि नर्म कर्तव्यावर होती.

त्यानंतर अग्निशमन कर्मचाऱ्यांनी तातडीने या स्थळी धाव घेऊन, आग आटोक्यात आणली. वाचवलेल्या बालकांना दुसऱ्या विभागात हलवण्यात आले.

हे ही वाचा: भंडाऱ्याच्या दुर्घटनेचं राजकारण…

बालकांना वाचवण्याचा कर्मचाऱ्यांनी कसोशीने प्रयत्न केला. सर्व उच्चाधिकारी जातीने अपघातस्थळी उपस्थित होते.

या बालकांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन केल्यानंतर लक्षात येईल.

या प्रसंगानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी ट्विटर वरून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला.

त्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विटरवरून शोक व्यक्त केला आहे.

Exit mobile version