23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरदेश दुनियाअमेरिकेत राम मंदिराचा उत्साह; राम भक्तांनी काढली शोभायात्रा

अमेरिकेत राम मंदिराचा उत्साह; राम भक्तांनी काढली शोभायात्रा

Google News Follow

Related

उत्तरप्रदेशमधील अयोध्येत श्री रामांचे भव्य उभारले जात आहे. याचा उत्साह देशभरात आहेचं पण इतर देशांमध्येही या सोहळ्यासाठी उत्सुकता लोकांमध्ये आहे. २२ जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. याची अमेरिकेतील राम भक्तांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ह्यूस्टनमधून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. कारमधून निघालेल्या या शोभायात्रेमुळे अमेरिकेतील वातावरण राममय झाले होते.

अमेरिकेतील ह्यूस्टनमधील ११ मंदिरांचे दर्शन आणि जय श्रीरामचा जयघोष करत राम नामाचे भजन म्हटले गेले. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विश्व हिंदू परिषद ऑफ अमेरिकेलाही (VHPA) आमंत्रण दिले गेले होते. ह्यूस्टनमध्ये निघालेल्या शोभायात्रेत २१६ गाड्या सहभागी झाल्या होत्या. या शोभायात्रेला आठ बाईकवर पोलीस स्क्वॉड करत होत्या.

श्री मीनाक्षी मंदिरापासून ही शोभायात्रा सुरु झाली आणि श्री शरद अंबा मंदिराजवळ संपली. या शोभायात्रेच्या मार्गावर आलेल्या ११ मंदिरांचे दर्शन करण्यात आले. यावेळी जय श्रीराम आणि रामनामाचे भजन म्हटले गेले. मंदिरांमध्ये आणि रस्त्यात हिंदू समुदायाकडून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले.

लिव्हिंग प्लानेट फाउंडेशनचे संस्थापक कुसुम व्यास ह्यूस्टन यांनी म्हटले की, “ह्यूस्टनमध्ये प्रथमच शोभायात्रा निघाली. अंचलेश अमर, उमंग मेहता आणि अरुण मुंद्रा यासाठी पुढाकार घेतला होता. अंचलेश अमर विश्व हिंदू परिषदेचे सदस्य आहेत. अयोध्यात श्रीराम परत विराजमान होत आहे आणि मंदिर निर्माण झाले आहे, यामुळे अमेरिकेत सर्व जण आनंदीत झाले आहे.” अरुण मुंद्रा यांनी सांगितले की, सर्व मंदिरांमध्ये एक बास्केट दिली आहे. त्यात विश्व हिंदू परिषदेला आलेल्या निमंत्रणाचा प्रत, अयोध्यावरुन आलेले तांदूळ, गंगाजल, सुंदरकांडची प्रती आहेत.”

हे ही वाचा:

लाइटहाऊस’ प्रकल्प करेल दीपस्तंभाप्रमाणे काम

राज्यात १० लाख हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड होणार

अयोध्येत एकाचवेळी १२००चपात्या बनवणारी मशीन पोहोचली!

मालदीवची भारतविरोधी ज्योत मालवली! घेतली नरमाईची भूमिका

विश्व हिंदू परिषद या सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग करणार आहे. अमेरिकेतील मंदिरांमध्ये प्रसाद वाटप केला जाणार आहे. विश्व हिंदू परिषदेने अमेरिकेत असलेल्या हिंदू बांधवांना घरात पाच दिवे लावण्याचे आवाहनही केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा