हमासच्या सैनिकांचे कैद्यांसोबत दुष्कृत्य; मृतदेहांनाही सोडले नाही

हमासच्या सैनिकांचे कैद्यांसोबत दुष्कृत्य; मृतदेहांनाही सोडले नाही

इस्रायल आणि हमासदरम्यान ७ ऑक्टोबरपासून युद्धाला सुरुवात झाली अजूनही हे युद्ध संपलेले नाही. या दरम्यान संयुक्त राष्ट्रांचा एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. त्यात इस्रायलच्या पंतप्रधानांनी केलेले आरोप आणि दाव्यांना दुजोरा मिळाला आहे. ‘हमासच्या दहशतवाद्यांनी हल्ल्यादरम्यान अनेक इस्रायली महिलांसोबत दुष्कृत्य केले. त्यांनी मृतदेहांनाही सोडले नाही. तसेच, कैदेत असलेल्या इस्रायली नागरिकांसोबतही दुष्कृत्य केले,’ असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच, हे सर्व आरोप मान्य करण्यासाठी पुरेसे आणि ठोस पुरावे आहेत, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अनेकदा हमासचे सैनिक इस्रायली महिला आणि मुलांसोबत दुष्कृत्य करत असल्याचा दावा केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानंतर या दाव्याला बळ मिळाले आहे.

ओलिस ठेवलेल्या कैद्यांसोबत दुष्कृत्य केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या विशेष प्रतिनिधी प्रमिला पॅटन यांना मिळाली होती. तसेच, त्यांनी अजूनही असे सुरू असल्याची भीती व्यक्त केली होती. प्रमिला यांच्याकडे या सर्व आरोपासंबंधी स्पष्ट आणि ठोस पुरावे आहेत. पॅटन यांनी तज्ज्ञ पथकासह फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला इस्रायल आणि वेस्ट बँकेचा दौरा केला होता. तेव्हा चौकशीदरम्यान त्यांना अनेक ठिकाणी लैंगिक अत्याचार व सामूहिक बलात्कार झाल्याचे पुरावे आढळले. हा लैंगिक अत्याचार प्रामुख्याने तीन ठिकाणी झाला. ते म्हणजे नोवा संगीत सोहळ्याचे ठिकाण आणि त्याच्या आसपासचा परिसर, दुसरा रोड २३२ आणि तिसरे किबुत्ज, असे पॅटन यांनी सांगितले.

हे ही वाचा:

विभागीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत आलोक, दुर्वाला सुवर्ण

भाजपाने चंदीगड उपमहापौरपदाची निवडणूक जिंकली

बेंगळुरू कॅफे बॉम्बस्फोटाचा तपास एनआयएकडे!

नफे सिंग राठी हत्या प्रकरणी गोव्यातून दोन शूटर्सना अटक!

पीडितांसोबत दुष्कृत्य केल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली आणि किमान दोनदा दहशतवाद्यांनी प्रेतांसोबत दुष्कृत्य केले, असेही संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या पथकाने लैंगिक अत्याचार झालेल्या पीडितांना आवाहन केले की, त्यांनी पुढे येऊन आपल्यावर झालेल्या अत्याचारासंदर्भात साक्ष द्यावी, मात्र कोणीही पुढे आले नाही. या पथकाने दौऱ्यात पीडित आणि आरोग्य अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि पाच हजार छायाचित्रे आणि ५० तासांचे सीसीटीव्ही चित्रिकरण पाहिले. त्यानंतर त्यांनी हमासच्या तावडीतून सुटलेल्या ओलिसांशीही चर्चा केली.

Exit mobile version