स्फोटकाच्या चाचणीकरता दहशतवाद्यांनी निवडली पुणे, सातारा, कोल्हापूरची जंगले!

एटीएसने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात निष्पन्न

स्फोटकाच्या चाचणीकरता दहशतवाद्यांनी निवडली पुणे, सातारा, कोल्हापूरची जंगले!

कोथरुड परिसरातून पुणे पोलिसांनी कारवाई करत दाेन परप्रांतीय तरुणांना ताब्यात घेतले होते.पोलिसांनी या घटनेची माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) दिल्यानंतर त्यांच्याकडून कारवाई करत तपास सुरु झाला.या प्रकरणी नाकाबंदीत पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याचे दहशतवाद विरोधी पथकाने न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून समोर आले आहे.

पुण्यातील कोथरूड परिसरात मंगळवारी रात्री नाकाबंदीत दाेन परप्रांतीयांना पकडण्यात आले होते. दोघांकडून काडतुसे आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. पोलिसांनी या घटनेची माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) दिली.या संदर्भांत एटीएसने नायायालयात एक अहवाल सादर केला.

 

अटक करण्यात आलेले दोन दहशतवाद्यांनी जंगलात बॉम्बस्फोटची चाचणी केल्याची माहिती एटीएसने न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून समोर आली आहे.   कोथरूड पोलिसांनी नाकाबंदीत पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याचे दहशतवाद विरोधी पथकाने न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून समोर आले.तसेच, आरोपींवर दाखल गुन्ह्यात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये कलम वाढ करण्यात आली आहे.

 

हे ही वाचा:

पंतप्रधानांचा घणाघात; इस्ट इंडिया कंपनी, इंडियन मुजाहिदीननेही ‘इंडिया’ शब्द वापरला!

ब्रदीनाथ महामार्ग वाहून गेल्याने १००० यात्री अडकले

मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून सूरज चव्हाण यांची ५ तास चौकशी

महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये राजस्थानचा क्रमांक पहिला

 

दहशतवाद विरोधी पथकाने तपासा दरम्यान दोन्ही आरोपींच्या घराची झडती घेतली त्यामध्ये विविध वस्तू आढळून आल्या. त्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह पांढरी पावडर सापडली होती. ती पावडर स्फोटकच असल्याचे एक्स्प्लोसिव्ह वेफर डिटेक्टर मध्ये स्पष्ट झाले आहे. तसेच पोलिसांच्या डॉग स्कॉडने देखील यासंबंधी पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला आहे. ही पावडर नेमके कोणते स्फोटके आहे, त्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविला असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे.अटक करण्यात आलेले दोन्ही दहशतवाद्यांची पोलिस कोठडी संपत असल्याने दहशतवाद विरोधी पथकाने दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. त्यावेळी सत्र न्यायाधीश एस. व्ही. कचरे यांच्या न्यायालयाने त्यांना पाच ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Exit mobile version