या हिंदू द्वेष्ट्याचे उद्धव ठाकरे कान उपटणार का?

या हिंदू द्वेष्ट्याचे उद्धव ठाकरे कान उपटणार का?

तामिळनाडूच्या डीएमके पक्षाला हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्मातील देव देवतांची किती ऍलर्जी झाली आहे, हे त्यांच्या मंत्रिमंडळातील एकेका मंत्र्याच्या विधानावरून स्पष्ट होतं. काल तामिळनाडूचे परिवहन मंत्री एस एस शिवशंकर यांनी आता प्रभू श्री रामाचे अस्तित्वच नव्हते हा जावईशोध लावला आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या अस्तित्वाचा कोणताही इतिहास नाही आणि तसे काही पुरावे पण नाहीत असा दावा या नावात शिवशंकर असलेल्या मंत्र्याने केला आहे. आता हा डीएमकें पक्ष देशात तयार झालेल्या इंडी आघाडीत सहभागी आहे, त्यामुळे यानिमित्ताने आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा त्यांचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे आघाडीतल्या आपल्या सहकारी पक्षाचे कान उपटणार का? असा प्रश्न आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष तसा प्रादेशिक असला तरी आज त्यांच्या पक्षाचे खासदार संसदेत निवडून गेले आहेत. देशात अन्य राज्यात घडणाऱ्या घडामोडींवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील किंवा संजय राउत असतील हे आपले मत व्यक्त करत असतात. चांगली गोष्ट आहे, त्यांनी मत व्यक्त करायला सुद्धा पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे. परंतु राजकीय सोय पाहून देशातील अन्य राज्यात घडणाऱ्या घडामोडींवर त्यांनी आपली मत व्यक्त करू नयेत. आज खर तर सकाळच्या संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेची सुरुवातच डीएमके पक्षाच्या त्या मंत्र्याच्या विधानाचा आणि डीएमके पक्षाचा निषेध करून त्यांनी करायला हवी होती. आपल्याच एका आघाडीतील घटक पक्ष जर या देशातील आणि जगातील सुद्धा लाखो कोट्यावधी लोकांच्या जिव्हाळ्याचा, भावनेचा, श्रद्धेचा विषय असलेल्या प्रभू श्री राम चंद्राच्या अस्तित्वाबद्दल बोलतो, त्याचे पुरावे नसल्याचे सांगतो हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला योग्य वाटते का ? डीएमकेच्या मंत्र्याचे हे विधान उद्धव ठाकरे यांना पटत का ? याबद्द्द्ल त्यांनी तत्काळ आपले मत मांडण्याची गरज आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी जेव्हापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबर युती केली तेव्हापासून ते म्हणतायत की आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. भले आज त्यांच्या मांडीला मांडीला लावून हिंदू द्वेष करणारे बसत असतील तरी ते मात्र कायम म्हणतात की आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. आमच हिंदुत्व हे वेगळ आहे. आता कसल वेगळ हिंदुत्व आहे हे आजपर्यंत समजल नाही. बर ते असो हिंदू धर्मातील आराध्य असणार्या प्रभू श्री राम चंद्राबद्दल हे शिवकुमार बोलले तर त्याचा निषेध करायला काय हरकत आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी अगदी सहकुटुंब सहपरिवार आयोध्येला जाऊन प्रभू राम चंद्राचे दर्शन घेतले होते. शरयू नदीची आरती केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची प्रभू श्री रामावर प्रचंड श्रद्धा आहे. आपली रामावर श्रद्धा असल्याचे त्यांनी याआधी अनेक वेगवेगळ्या भाषणामधून सांगितले आहे. त्यामुळे आता त्यांच्या श्रद्धेला कुठेतरी ठेच पोहोचली असेल, त्यामुळे त्यांनी ताबडतोब यावर आपले मत मांडायला हवे.

बर हा डीएमके पक्षाचा आताच चावटपणा नाही तर याआधी सुद्धा असे अकलेचे तारे तोडून झाले आहेत. मुख्यमंत्री एम के स्टालिन यांचे चिरंजीव उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्माला नाव ठेवली होती. सनातन धर्म म्हणजे कोरोना, डेंग्यू असल्याचे विधान त्यांनी केले होते. हा प्रकार लोकसभा निवडणुकीच्या आधीचा आहे. त्यावेळी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी त्यांना फार काय ठणकावले वगैरे असे नाही. त्यानंतर तर लोकसभा निवडणुका इंडी आघाडीमधून त्यांनी लढल्या. इंडी आघाडीच्या बैठकांना ते स्टालिन यांच्या मांडीला मंडी लावून बसतच होते. त्यामुळे आता ते काय करणार हे पाहणे महत्वाचे आहे.

हे ही वाचा..

मुस्लिम मुलांची ट्युशन घेणाऱ्या मुलीलाच केले मुस्लिम; उल्हासनगरात धक्कादायक प्रकार

श्रावणात एसटीसंगे तीर्थाटन उपक्रमाची उद्यापासून सुरुवात

आगामी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार दिल्लीत !

मध्य प्रदेशात मंदिरालगतची भिंत कोसळून नऊ मुलांचा मृत्यू

एका बाजूला ५००-५५० वर्षांची प्रतीक्षा असणारे रामजन्मभूमी आयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचे भव्य मंदिर उभे राहिले आहे. आज देश आणि जगभरातून लाखो रामभक्त आयोध्येमध्ये येत आहेत. विलक्षण आनंद आज राम भक्तांमध्ये असताना डीएमकेच्या या मंत्र्याचे हे खुळचट विधान अक्षरशः चीड निर्माण करणारे आहे. मताच्या राजकारणासाठी हिंदू धर्माचा द्वेष हिंदुस्थानमध्येच राहून करण्याची जणू अशा लोकांच्यात आता स्पर्धाच लागली आहे. ज्या धर्मात आपण जन्म घेतला त्या धर्माबद्दल, देव देवतांबद्दल असली विधाने आता राजरोसपणे केली जात आहेत, याला आता लगाम लावण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण लोकसभा निवडणुकीत कोणी कोणाला मतदान केले आहे हे आता उघड झाले आहे. यामागे केवळ मतांचे लांगुंचालन आहे दुसरे तिसरे काही नाही. त्याच्यामुळे आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणे गरजेचे आहे.

Exit mobile version