26 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरसंपादकीयकेजरीवालांबरोबर पक्षही जाणार?

केजरीवालांबरोबर पक्षही जाणार?

Google News Follow

Related

मराठीत एक म्हण आहे बुडत्याचा पाय खोलात. असाच प्रकार आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत झाल्याचं आपल्याला दिसून येईल. रोज कोणत्या ना कोणत्या प्रकरणात आपण अडचणीत येत असताना काल मात्र महाराष्ट्रात येऊन अरविंद केजरीवाल यांनी महाविकास आघाडीला भरभरून मतदान करण्याचा आवाहन केलं. दिल्लीत आपला पक्ष शिल्लक राहतो का नाही अशी अवस्था असताना दुसऱ्याचे पक्ष वाचवायची खुमखूमी या केजरीवालांना आलेली आपल्याला दिसून येईल. तिकडे अंमलबजावणी संचालनालयान दिल्लीच्या कथित दारू घोटाळा प्रकरणांमध्ये आम आदमी पक्षाला आरोपी केलेला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आता राहतो का जातो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ही पहिलीच घटना आहे. की अशा पद्धतीने एखाद्या राजकीय पक्षाला आरोपी म्हणून त्या पक्षाविरोधात आरोप पत्र दाखल करण्यात आलेल आहे. अंमलबजावणी संचालनालयाने आम आदमी पक्षाच्या विरोधामध्ये आरोपी म्हणून नवीन आरोप पत्र न्यायालयात दाखल केलेला आहे. १९५१ नंतर देशाच्या इतिहासामध्ये हा पहिलाच प्रकार आम आदमी पक्षाच्या बाबतीत घडलेला आहे. आता होणार काय तर अंमलबजावणी संचालनालयाच्या या भूमिकेमुळे अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष याची मान्यता जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये या आरोप पत्रावर सुनावणी होईल. तब्बल २०० पानांचे आरोप पत्र अंमलबजावणी संचालनालयाने कोर्टात दाखल केले आहे. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांच्याबरोबरच त्यांचा आम आदमी पक्ष हा सुद्धा गॅसवर आहे. कधी काही होईल म्हणजेच पक्षाची मान्यता रद्द होऊ शकते, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

एकीकडे हे चित्र असताना अरविंद केजरीवाल यांच्या डोक्यात जो भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वळवळणारा किडा आहे तो त्यांना गप्प बसू देत नाहीये. २ जून पर्यंत सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. २ जूनला त्यांना पुन्हा आत्मसर्पण करावं लागणार आहे. तरी मिळालेल्या या कालावधीचा उपयोग ते अशा पद्धतीने करत आहेत.

कालच महाविकास आघाडी म्हणजेच इंडी आघाडी जी तयार झालेली आहे तर इंडी आघाडीची सभा मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकुल मैदानामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. या सभेमध्ये उपस्थित राहून अरविंद केजरीवाल यांनी आपणच कसे देशभक्त आहोत हे सांगण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला. म्हणजे ज्या प्रकरणामध्ये आपण अडचणीत आलो आहोत ज्या प्रकरणांमध्ये आपल्याला अटक करण्यात आलेली आहे त्याचा कुठलेही सोयर सुतक न बाळगता केजारीवालांनी काल मुंबईत येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोंड सुख घेण्याचा प्रयत्न केला.

मध्यंतरी आपल्याला आठवत असेल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा एक मुलाखतीचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत होता. या मुलाखतीमध्ये अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल हे काय प्रकारचे गृहस्थ आहेत याचे उत्तम असे विश्लेषण केलेलं होतं. ज्यावेळी अण्णा हजारे यांनी देशभरामध्ये एक आंदोलन सुरू केलं त्यावेळेला अण्णा हजारे यांच्यासोबत जे लोक होते त्यापैकी एक अरविंद केजरीवाल होते. त्यावेळी ते बरे होते पण नंतर त्यांनी ज्या पद्धतीने या आंदोलनाच्या माध्यमातून किंवा अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी वापर करून स्वतःचा राजकीय पक्ष काढला आणि दिल्लीच्या निवडणुका लढवल्या. त्यानंतर मात्र अरविंद केजरीवाल हे कशा पद्धतीने वाहवत गेले, हे अण्णा हजारे यांनी त्या मुलाखतीमध्ये सांगितलेला आहे.

हे ही वाचा :

पुढील हंगामात हार्दिकचे ‘एका सामन्याच्या बंदी’ने स्वागत!

निवडणूक वॉर रूम राडा प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

किर्गिस्तानमधील हिंसाचारात भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थी लक्ष्य

गाझामधून तीन ओलिसांचे मृतदेह ताब्यात

पैसा कशात मिळतोय, पैशाची नशा म्हणजे काय आणि ती एकदा डोक्यात गेल्यानंतर काय होऊ हे अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांचे नाव घेऊन त्या मुलाखतीमध्ये सांगितलेल आहे. एकीकडे इन्कलाब जिंदाबाद च्या घोषणा देऊन स्वतःचा अस्तित्व निर्माण करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी दारू धोरणामध्ये हात मारावा याच्यासारखं दुर्दैव काय असू शकत. आज ते जामिनावर बाहेर असताना निवडणुकांच्या राजकारणामध्ये निवडणुकांच्या प्रचार सभांमध्ये भाग घेऊन आपण कसे निर्दोष आहोत आणि आपल्याला कशा पद्धतीने मुद्दाम अडकवण्यात आलेला आहे, हे सांगण्याचा ते केविलवाणा प्रयत्न करत आहेत. त्यांची बाजू जर का बरोबर असेल तर त्यांनी ती न्यायालयात मांडायला हवी कारण हा खटला न्यायालयात सुरू आहे. पण न्यायालयात न बोलता लोकांच्या पुढे जाऊन आपण कसे निर्दोष आहोत आणि धुतल्या तांदळासारखे आहोत हे सांगण्यामागचा उद्देश नेमका काय? हे या देशातल्या सर्वसामान्य जनतेला समजत नाही असं अजिबात नाही. लोकांना सगळ्या गोष्टी समजत असतात. कर नाही त्याला डर कशाला. खरंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा होता. पण सत्ता आणि पद हे सोडता सोडवत नसल्यामुळ त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही आणि उलट ते असं सांगतात की तुरुंगात राहून आम्ही सरकार चालवू. असं तुरुंगात राहून सरकार चालवता येऊ शकत का? अनेक निर्णय हे मुख्यमंत्र्यांना घ्यावे लागतात अनेक फायली मुख्यमंत्र्यांना वाचाव्या लागतात त्यावर सह्या कराव्या लागतात. प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना कराव्या लागतात. पण, या राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगात बसलाय तो मुख्यमंत्री ही सर्व कामे करू शकत नाही. याचा अर्थ तो मुख्यमंत्री त्या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देऊ शकत नाही.

अरविंद केजरीवाल यांना स्वतःचा मुख्यमंत्री पद प्रिय आहे, का दिल्लीमधील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवणं हे महत्त्वाचं वाटतं याचा खुलासा त्यांनी खरंतर करायला हवा होता. पण त्यांना शंभर टक्के राजकारण करायचं असल्यामुळे ते लोकशाही धोक्यात असल्याचा एक कांगावा करून आपण सरकार तुरुंगातून चालवत असल्याचा खूप मोठा काही आपण पराक्रम करतोय अशा अविर्भावामध्ये आज ते जनतेला सांगत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा