मिर्चीचा ठेचा आणि भाकरी ठाकरेंना पचेल काय ?

ठेचा-भाकरी हे खाणं कष्टकरी रांगड्या माणसांचे. ठाकरेंना ते पचेल काय?

मिर्चीचा ठेचा आणि भाकरी ठाकरेंना पचेल काय ?

सत्तेवर असताना ज्यांना मंत्रालयापर्यंत जाणे झेपले नाही त्या उद्धव ठाकरे यांना आता पुन्हा बांध आठवला आहे. शेतकऱ्याचे प्रश्न आठवले आहेत. नगर जिल्ह्याच्या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. तिथे एका गरीब मुलांने दिलेली भाकरी आणि मिर्चीच्या ठेच्याची शिदोरी त्यांनी स्वीकारली. ही शिदोरी घेताना ते भारावले म्हणे! ठेचा-भाकरी हे खाणं कष्टकरी रांगड्या माणसांचे. ठाकरेंना ते पचेल काय?

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांचा बांधावरचा ऐतिहासिक दौरा झाला होता. बांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. परंतु, स्वतः सत्तेवर आल्यानंतर ते ही मागणी विसरले. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतात जाऊन शेत मजूरांसोबत लावणीचे काम केले. फोटो काढून घेतले. ठाकरेंनी तिथून प्रेरणा घेतलेली दिसते. सत्तेवर नसताना शेताच्या बांधावर जायचा नवा ट्रेंड उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात सुरू केला आहे. त्यांच्या कारकीर्दीत अतिवृष्टी आणि वादळे होत होती, तेव्हा नुकसानग्रस्तांना सरकारी मदत म्हणून ते बिस्कीटाचे पुडे आणि मेणबत्या देत असत. १ वाजता घरून निघायचे, हेलिकॉप्टरने धावता दौरा करायचा. सातच्या आत घरी पोहोचायचे असे त्यांचे काटेकोर वेळा पत्रक असे. घरी बसण्यात ते इतके बिझी असत की त्यांना बाकी काही करण्यासाठी वेळच नसे.

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मात्र शेताच्या बांधावर जाण्याचा छंद त्यांना जडला होता. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यात खंड पडला. खुर्ची गेल्यानंतर पुन्हा त्यांना बांधाची ओढ लागलेली आहे. नगर दौऱ्यात म्हणे किर्तिक नावाच्या शाळकरी मुलाने उद्धव ठाकरे यांना शिदोरी दिली. मिर्चीचा ठेचा आणि भाकरी. उद्धव ठाकरे यांनी त्या मुलाला विचारले. तु जेवलास का? त्याने उत्तर दिले नाही. ठाकरे भारावले आणि म्हणाले हीच माझी शिदोरी. सामनाने पहिल्या पानावर ही भावकथा लिहिलेली आहे. इथेही उद्धव ठाकरे घेते झाले, देते नाही. त्यांना फक्त घेण्याची सवय, देण्याची नाही. दुसऱ्यासाठी खिशात हात घालण्यासाठी दानत लागते. ठाकरेंकडे त्याचा प्रचंड अभाव आहे. एअर इंडीया असो वा सहारा ते फक्त घेत असतात. कधी बोलण्यासाठी घेतात, तर कधी गप्प बसण्यासाठी. पण फक्त घेतात.

ठाकरे या आडनावामुळे लोकांचे अफाट प्रेम उद्धव ठाकरेंना मिळालेले आहे. परंतु, ही त्यांची पुण्याई नाही. ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची पुण्याई. या पुण्याईमुळे मुंबई महापालिकेत २५ वर्षे सत्ता, राज्यात अडीच वर्षे सत्ता त्यांना उपभोगता आली. प्रेम करणाऱ्या जनतेचे पांग फेडण्याची संधी त्यांना होती. प्रत्यक्षात या काळात घरी बसून ठाकरेंनी फक्त घेण्याचे काम केले. कधी कोरोनाचे कारण सांगून तर कधी आजारपणाचे कारण सांगून कायम घरी बसून राहीले. नगरच्या दौऱ्यात ज्या मुलाने स्वतः न खाता त्यांना शिदोरी दिली त्याला बहुधा माहित नाही. मिर्चीचा ठेचा आणि भाकरी उद्धव ठाकरे खात नाही. हे रांगड्या मेहनती लोकांचे भोजन आहे, रांगडी माणसंच खाऊ शकतात. घरी बसणाऱ्यांचे काम नाही ते.

हे ही वाचा:

भारत- मॉरीशस राजकीय संबंधांना ७५ वर्षे पूर्ण; जी- २० साठी ‘अतिथी देश’ म्हणून विशेष आमंत्रण

शिक्षक आणि पालकांनी चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्यासाठी योगदान द्यावे

पोटनिवडणुकांत भाजपने दाखवली ताकद

ईरशाळवाडी दुर्घटनेत शोध न लागलेल्या ५७ व्यक्तींच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदान देणार

उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी कामगारांची खिचडी खाऊ शकतात. कोरोनाच्या काळातली खिचडी त्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी ओरपली हे आता बँक खात्याच्या आकडेवारीसह सिद्ध झालेले आहे. कोणा कोणाच्या खात्यात खिचडी गेली हे किरीट सोमय्यांनी तपशीलवार सांगितले आहे. मिर्चीचा ठेचा आणि भाकरीचे कोट्यवधीचे कंत्राट काढण्याची आयडिया कोरोनाच्या काळात सुचली असती तर उद्धव ठाकरेंच्या खात्यात मिर्चीचा ठेचा आणि गरीबाची भाकरीही गेली असती.

उद्धव ठाकरे असे कुणी दिलेले खात नाहीत. पोहरा देवीचे महंत सुनील महाराज मातोश्रीवर शिवबंधन बांधायला आलेले असताना त्यांनी दिलेला पोहरा देवीचा प्रसादही भक्तीभावाने तोंडात न टाकता बाजूला उभ्या असलेल्या सहकाऱ्याच्या हाती दिला होता. हा प्रसादाचा, पोहरा देवीचा किंवा पोहरा देवीचे महंत सुनील महाराज यांचा अवमान नाही. ठाकरेंची खाण्याची पद्धत वेगळी आहे. प्रसादाचे कंत्राट काढले असते तर कंत्राटदाराने दिलेला प्रसाद ठाकरेंनी भक्तीभावाने ग्रहण केला असता. ठाकरेंना खाण्यासाठी कंत्राटदारांची मध्यस्थी लागतेच. हे त्या लहानग्या कार्तिकला ठाऊक असण्याचे कारणच नाही. कोरोनाच्या काळात खाल्लेली कंत्राटदारांची खिचडी

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version