जय गाझा- जय पॅलेस्टाईनवाल्या आव्हाडांवर वेदमंत्रांचा शिडकावा कशासाठी?

जय गाझा- जय पॅलेस्टाईनवाल्या आव्हाडांवर वेदमंत्रांचा शिडकावा कशासाठी?

‘दोघांनाच मानतो माझा बाप शरद पवार आणि अल्ला’, राष्ट्रवादी शपचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे हे ताजे विधान. लोकांना आता अशा विधानांचे आश्चर्य वाटायचे बंद झालेले आहे. हिंदू रामकृष्णाला मानतात, अल्ला मानणारा मुस्लीम असतो. आव्हाड हे नमाजी मुस्लीम आहेत, देशात जुलूमाच्या बळावर इस्लामचा प्रचार प्रसार करणारे राज्यकर्ते आव्हाडांचे हिरो आहेत, असे लोक धरून चालले आहेत. परंतु मग, अल्लाच्या बंद्यांना निवडणूक काळात वेदमंत्रांचा शिडकावा, ब्राह्मणांचे आशीर्वाद का लागतात? अनेकांच्या मनात हा प्रश्न असू शकतो, परंतु हे काही कोडे नाही. हिंदूंच्या विरोधात कितीही राजकारण केले, जातवादाचे राजकारण केले, मुस्लीम हिताचे राजकारण केले, तरी फक्त मुस्लीम मतांच्या आधारावर जिंकता येत नाही, निवडणूक जिंकण्यासाठी, सत्तेवर येण्यासाठी हिंदूंची मते लागतात, हे माहीत असल्यामुळे ही सगळी सोंग करावी लागतात. राम कृष्ण हरी वाजवा तुतारीच्या घोषणा द्याव्या लागतात.

इफ्तारचा एक व्हिडीओ प्रचंड व्हारयल होतो आहे. त्यात एका मौलानाचे विखारी भाषण आहे. खरे तर मौलानाचे भाषण म्हणणे पुरेसे आहे. कारण कोणताही मौलाना बोलायला उभा राहीला तर तो विखारीच बोलतो. हा मौलाना म्हणतोय, ‘इलेक्शन को दिन से अलग मत समजना. गलती से फिर इनकी सरकार आयी तो जुल्म की इन्तेहा होगी, कत्ले आम होगा, खून की नदीया बहेंगी, जेल छोटे पड जायेंगे, औऱ अल्ला जाने क्या क्या होगा. लेकीन इन्शाअल्ला ऐसा नही होगा.’ हे भाषण देताना मंचावर होते, अजीम ओ शान शरद पवार, जयंत पाटील, संजय दिना पाटील, सचिन अहिर, अरविंद सावंत ही नेते मंडळी. सगळे हिंदू नेते. ज्यांच्यासमोर अत्यंत विखारी असे भाषण दिले जात होते. ही मंडळी भाषण सुरू असताना मंचावर खजूर खात होती. अशी भाषणे ऐकताना, ‘संविधान खतरे में’ असल्याचे या नेत्यांना वाटत नाही. इफ्तार पार्ट्यांमध्ये ज्यांना फरची टोपी घालून मिरवायचे असते, धर्मांधांची मते घ्यायची असतात, वोट जिहादला बळ द्यायचे असते. ही हक्काची मते ताब्यात घेतली की मग हिंदू मतांकडे यांचा मोर्चा वळतो. कारण जिंकण्यासाठी हिंदूंची मतेही हवी असतात.

राम मंदीर बांधून कोरोना जाणार आहे का… असे सवाल याच वोट बँकला खूष करण्यासाठी करायचे असतात. संकष्टीच्या दिवशी मटण यांनाच खूष करण्यासाठी खायचे असते. हिंदू धर्म विसरून जातीत कसे विभागले जातील याची काळजीही घ्यायची असते. हिंदूंनी हे सगळे विसरावे म्हणून त्यांना निवडणुकीपूर्वी काही जादूचे प्रयोग करणे त्यांना गरजेचे वाटते. त्यावेळी शरद पवार मंदिरात जातात. आव्हाड ब्राह्मण पुरोहीतांकडून वेदमंत्र म्हणून घेतात. रामायण- महाभारत काल्पनिक असल्याचा दावा करणारे शरद पावर, वेदमंत्र शांतपणे ऐकून घेत होते. या देशात वेदमंत्र म्हणणारे हिंदू कायम स्वरुपी नष्ट व्हावेत आणि इथे इस्लामचा चांदतारा फडकावा म्हणून आय़ुष्यभर झटणारे औरंगजेब आणि अफजल खान ज्यांचे आदर्श आहेत. ज्यांच्या क्रौर्यावर बुरखा घालणे हे ज्या आव्हाडांना आपले जीवीत कर्तव्य वाटते, त्या आव्हाडांनी खरे तर पादरी आणि मौलानांचे आशीर्वाद घेतले पाहीजे होते फॉर्म भरताना. फक्त अल्ला आणि पवारांना मानणाऱ्या आव्हाडांचा हिंदू धर्माशी काय संबंध? राहुल गांधी यांचा आहे, तेवढाच. म्हणजे शून्य.

सगळी नौटंकी हिंदूंच्या मतांसाठी. एकदा मते मिळाली की जय गाझा आणि जय पॅलेस्टाईनच्या घोषणा द्यायला, हे मोकळे. आव्हाडांना या नौटंकीची सवयच आहे, परंतु जे ब्राह्मण तिथे गेले होते त्यांना तरी लाजा वाटल्या पाहिजे, अशा हिंदू विरोधी मानसिकतेच्या नेत्याच्या घरी जाऊन पवित्र वेदमंत्र म्हणायला. त्यापेक्षा स्मशानात जाऊन एखाद्या मढ्याचे अंत्यसंस्कार करून पैसे मिळवले असते तरी पुण्य पदरात पडले असते. पोट भरण्यासाठी हे धर्मद्रोह्यांना आशीर्वाद देण्याची गरज काय. पोट रस्त्यावर भीक मागणारा भिकारीही भरतो.

एखाद्याला सदगती मिळवून देण्यासाठी मंत्रोच्चारण करून जीभ शिणवल्याबद्दल. हे पुरोहीत म्हणजे उदरभरण करण्यासाठी अफजलखानाची चाकरी करणाऱ्या कुष्णाजी भास्कराचे आधुनिक रूप. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची एक मोठी ताकद आहे. या संप्रदायातील माळकऱ्यांना मांस- मदीरा दोन्ही वर्ज्य. संकष्टीला मटण खाणाऱ्या, मांसाहार करून मंदीरात दर्शनाला जाणाऱ्या आणि राम मांसाहारी होता असे म्हणणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना निवडणुकीच्या काळात घोषणा सुचली आहे. राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी. ज्यांच्या श्रद्धा फक्त कुराण, शरीया आणि गाझावर आहेत, अशा लोकांनी राम कृष्ण हरीचा उच्चार करावा तरी कशाला?

हे ही वाचा : 

जेएनयूमध्ये होणारी इराण, पॅलेस्टाईन, लेबेनॉनच्या भारतातील राजदूतांची व्याख्याने रद्द

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईच्या भावावर १० लाखांचे बक्षीस!

भारत- चीनमध्ये झालेल्या करारानंतर दोन्ही बाजूंकडील सैन्य माघारी घेण्यास सुरुवात

झिशान सिद्दिकींनी काँग्रेसची साथ सोडली; वांद्रे पूर्वला वरूण सरदेसाईंविरुद्ध झुंज

हिंदुत्वाशी कायम उभा दावा करणाऱ्या या हिंदू विरोधकांना मतदारांनी ओळखले पाहिजे. धडा शिकवला पाहिजे. हिंदू दहशतवाद हा शब्द वापरणे ही चूक होती. त्या वेळी राजकारणासाठी याचा वापर करण्यात आला होता, अशी कबूली माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी दिली होती. त्या पापात शरद पवारही वाटेकरी होते. सुशीलकुमार यांनी किमान पापाची कबूली दिली. शरद पवार कधी कबूली देणार? मालेगाव बॉम्बस्फोटाचे कुभांड रचून हिंदुत्ववाद्यांवर अनन्वित अत्याचार त्यांच्याच सत्ताकाळात झाले होते. साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहीत यांना अडकवून त्यांना थर्ड डीग्री कोणाच्या आदेशामुळे लावण्यात आली हे गुपित राहिलेले नाही. १९९३ चे साखळी बॉम्बस्फोट फक्त हिंदूबहुल भागात झालेले नसून मुस्लीम भागातही झाले हे दाखवण्यासाठी १३ व्या बॉम्बस्फोटाची थाप मारणारे शरद पवार हे केवळ आणि केवळ मुस्लीम धार्जिणे राजकारण करीत राहिले. त्यांच्या हिंदूविरोधी कारनाम्यांचा हिशोब चुकता करण्याची संधी या निवडणुकीने जनतेला दिलेली आहे. त्यामुळे या वेदमंत्रांच्या देखाव्याला हिंदूंनी बळी पडण्याचे काहीच कारण नाही.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
Exit mobile version