32 C
Mumbai
Monday, December 16, 2024
घरसंपादकीयअमृतपाल सिंहचे काय झाले? न्यायालयालाही पडलाय प्रश्न...

अमृतपाल सिंहचे काय झाले? न्यायालयालाही पडलाय प्रश्न…

अमृतपालच्या या ट्रान्फॉर्मेशनमागे आयएसआय आहे असे मानले जाते.

Google News Follow

Related

‘वारीस पंजाब दे’, या फुटीरवादी संघटनेचा म्होरक्या अमृतपाल सिंह सध्या कुठे आहे, हे एक गुढ बनले आहे. चार दिवसांपूर्वी पंजाब आणि सीआरपीएफचे पोलिसांनी केलेला त्याचा थरारक पाठलाग, अवघ्या देशाने पाहिला, परंतु तिथून तो जो गायब झाला तो आजतायागत सापडलेला नाही. त्याच्या वकीलांनी पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पसयाचिका  दाखल करून त्याच्या एन्काऊंटरची भीती व्यक्त केली आहे.

शेतकरी आंदोलनातील सहभागामुळे चर्चेत आलेला अभिनेता दिप सिद्धू याच्या अपघाती निधनानंतर अमृतपाल सिंह याच्यावर ‘वारीस पंजाब दे’, या संघटनेचे नेतृत्व सोपवण्यात आले. व्यवस्थित दाढी ट्रीम करून जीन्स टी-शर्टमध्ये दुबईत वावरणारा अमृतपाल, जो कधी दिप सिद्धूला भेटलाही नव्हता, तो अचानक त्याच्या संघटनेचा नेता असा बनला हे मोठे गूढ आहे. १२ वी पास अमृतपाल त्याच्या काकाच्या ट्रान्स्पोर्ट कंपनीत काम करण्यासाठी २०१२ मध्येच दुबईत रवाना झाला होता. अलिकडे काही महिन्यांपूर्वी तो परतला. हा बदल कोणामुळे झाला हे गूढ फक्त अमृतपाल उलगडू शकतो.

दुबईतून भारतात परतल्यावर अमृतपालने पंजाबमध्ये नवा अवतार धारण केला. दिपसिद्धूनेच आपल्याला केस कापू नकोस असा सल्ला दिला होता, असे अमृतपालने सांगितले. दिपसिद्धू आता मेला असल्यामुळे अमृतपाल त्याच्या नावावर आता काहीही खपवू शकतो.

अमृतपालच्या या ट्रान्फॉर्मेशनमागे आयएसआय आहे असे मानले जाते. नाही तर डिसेंबर २०२२ मध्ये दुबईमधून भारतात दाखल झालेला अमृतपाल इतक्या लवकर भिंद्रनवाले-२ बनणे अशक्य होते. काही महिन्यात महागड्या आलिशान गाड्यांचे ताफे, संघटना बांधण्यासाठी पैसा, अचानक निर्माण झालेले त्याचे समर्थक हा सगळा डॅग्जच्या किंवा आयएसआय़च्या पैशाचा खेळ आहे, असा भारतीय गुप्तचर यंत्रणांचा कयास आहे. काही भक्कम पुरावे सुद्धा त्यांच्या हाती लागले आहेत. पंजाबमधील दहशतवादाशी घट्ट जोडलेला फुटीर नेता जर्नेलसिंह भिंद्रनवाले याच्या पावलावर पाऊल ठेवून त्याने खलिस्तानची मागणी रेटायला सुरूवात केली. भिंद्रानवाले याच्या रोडे या जन्मगावी त्याचा दस्तरबंदी (फेटा बांधणे) सोहळा पार पडला. त्याची वेशभूषा आणि भाषा भिंद्रानवाले यांचे थेट अनुकरण होते.

पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाचा बाजार उठल्यानंतर शिख नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. याचा फायदा उठवत अमृतपालने उत्पात करायला सुरूवात केली. आपली दावेदारी भक्कम करण्यासाठी त्याचे जोरदार प्रयत्न सुरू होते.
अंजाला पोलिस ठाण्यात घातलेल्या धुडगूसामुळे अमृतपालच्या कारवाया पंजाब बाहेरच्या लोकांपर्यंत पोहोचल्या. एका व्यक्तिच्या अपहरण आणि मारहाणी प्रकरणी अमृतपाल आणि त्याच्या सहा सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

लवप्रीत सिंह या त्याच्या सहकाऱ्याला अटक करून त्याला अंजाला पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले होते. त्याला सोडण्यासाठी अमृतपालने पोलिसांना सज्जड दम दिला होता. परंतु पोलिस बधले नाहीत. भिंद्रानवालेच्या दहशतवादासमोर न झुकलेले पोलिस याच्या समोर लाचारी पत्करतील अशी शक्यताच नव्हती. त्यामुळे चिडलेल्या अमृतपाल आणि त्याच्या समर्थकांनी अंजाला पोलिस ठाण्यावर मोर्चा नेला. बॅरीकेड्स तोडून पोलिसांना धक्काबुक्की केली. प्रचंड धुडघूस घातला. पोलिसांनी ही परिस्थिती मोठ्या संयमाने हाताळली. हे व्हीडीयो प्रचंड व्हायरल झाले होते. भिंद्रानवाले बनण्याच्या दिशेने अमृतपालने टाकलेले ते एक मोठे पाऊल होते. तेव्हा पासूनच याच्या अटकेची अटकळ बांधण्यात येत होती.

शनिवारी १८ मार्चला पंजाब पोलिसांनी अमृतपालच्या ताफ्याचा पाठलाग केला. हा पाठलाग अगदी फिल्मी पद्धतीने झाला. सुमारे २५ किमी अंतर पोलिस त्याच्या मागावर होते. त्याच्या काही समर्थकांना अटक झाली. अमृतपाललाही अटक झाल्याची ब्रेकींग न्यूज झळकली. परंतु तो निसटल्याचे पोलिसांनी मीडियाकडे स्पष्ट केले.

वारीस पंजाब दे या संघटनेचे वकील इमान सिंह खारा यांनी या प्रकरणी पंजाब-हरयाणा न्यायालयात हेबिअर्स कॉर्पस याचिका दाखल केली. आपल्या अशीलाला पोलिसांनी अटक केलेली असून त्याला अत्यंत गोपनिय स्थळी डांबून ठेवण्यात आले आहे, अशी शक्यता खारा यांनी या याचिकेत व्यक्त केली आहे. न्या. एन.एस. शेखावत यांच्यासमोर याचिकेची न्यायालयाने पोलिसांना आदेश देऊन त्याचा ताबा घ्यावा, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

माहीममध्ये उभी राहतेय ‘दुसरी हाजीअली’; समुद्रातील अनधिकृत मजारीचा राज ठाकरेंनी केला पर्दाफाश

अमृतपाल सिंहचे काय झाले? न्यायालयालाही पडलाय प्रश्न…

राज ठाकरेंनी दाखवलेल्या अनधिकृत ‘दुसरी हाजीअली’वर पडणार हातोडा

उद्धव ठाकरेंना कंटाळून ४० आमदार बाहेर पडले…

खारा यांनी काही चॅनलला बाईट देताना अमृतपालचे फेक एन्काऊंट केले जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. न्यायालयात सुनावणी दरम्यान, अमृतपालचे वडील तरसेम सिंह तार स्वरात ओरडले. चार दिवस पंजाब पोलिसांच्या अनेक तुकड्या माझ्या मुलाचा छडा लावण्याचा प्रयत्न करीत असताना माझा मुलगा त्यांना झुकांडी देणे अशक्यच असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. ८० हजार पोलिस शोधत असताना अमृतपाल पळालाच कसा? हा सवाल न्या.शेखावत यांनी सरकारला विचारला आहे. पोलिसांनी मात्र कानावर हात ठेवले आहेत.

अमृतपाल कुठे आहे, हे गूढ अद्यापि उगलडले नसले तरी त्याच्या अनेक सहकाऱ्यांच्या मुसक्या आवळून त्यांची चौकशी मात्र सुरू झाली आहे. या चौकशीत आय़एसआयच्या अनेक लिंक उघड होत आहेत. फोन कॉल, पैशाच्या लिंक. देशात भिंद्रानवाले कोणी निर्माण केला हा कोळसा आज उगाळण्याचे कारण नाही. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या हाती देशाची सूत्र असताना दुसरा भिंद्रानवाले निर्माण करण्याची कोणाची हिंमत होणार नाही.
देशद्रोह्याना संपवण्यासाठी ही जोडगोळी कोणत्याही थराला जाऊ शकते. अमृतपालचा एन्काऊंटरची शक्यता त्याचे समर्थक, वकील, नातेवाईक व्यक्त करतायत, त्याचे कारण हेच आहे.

मुंबईत गँगवार संपवण्यासाठी मुंबई पोलिसांनी असे बरेच प्रयोग केले होते. ड्रग्ज केसमध्ये पोलिस स्टेशन मध्ये हजर झालेल्या नगरसेवकाच्या माजाकडे दुर्लक्ष करून सरफरोश सिनेमाचा नायक एसीपी राठोड आधी त्याला फोडतो आणि नंतर कनिष्ठांना ऑर्डर देतो नेताजी को तीन रिमांड में रखो, अरेस्ट मत दिखाना. इथे मात्र अमृतपाल गायब होऊन चार दिवस झाले आहेत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा