गेल्या काही दिवसातील काही घटनांकडे बारकाईने पाहिले तर लक्षात येईल की अत्यंत महत्त्वाच्या सरकारी पदावर किंवा पोलिस दलात राहूनही मुस्लीम समाजातील काही व्यक्ती धार्मिक कट्टरतेला घट्ट चिटकून बसले आहेत. ही मंडळी तोंडी लावण्या इतपतही सुद्धा सर्वधर्म समभावाचे पालन करीत नाहीत. वेळप्रसंगी कर्तव्य धाब्यावर बसवून हे लोक, देशद्रोही तत्त्वांच्या बाजूने ठामपणे उभे राहताना दिसतात.
उपराष्ट्रपती पदी अनेक वर्षे कार्यरत असलेल्या हमीद अन्सारी यांचे नाव अलिकडे हेरगिरी प्रकरणात चर्चेत आले. अन्सारी यांनी दहशतवाद विरोधी सेमिनारसाठी पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा याला निमंत्रण दिले. या मिर्झाने २००५ ते २०११ दरम्यान, भारतात पाच वेळा भेट दिली. अशा अभ्यागंतांसाठी केवळ दोन शहरांचा व्हीसा मिळतो, पण हा इसम सात शहरात बिनबोभाट फिरला. या काळात त्याने अत्यंत संवेदनशील माहीती मिळवून आयएसआयला दिली. हा गौप्यस्फोट स्वत: मिर्झा यानेच केला आहे.
यूपीएच्या काळात हे कांड घडले. हमीद अन्सारी पुन्हा एकदा नव्या वादात अडकलेले दिसतात. या मुद्यावरून गदारोळ माजलेला असताना अन्सारी यांनी काखा वर केल्या असून ‘आपण मिर्झाला ओळखत नाही, त्याला कधी भेटलो नाही, त्यामुळे बोलावण्याचा प्रश्नच नाही,’ असा दावा केला आहे. अन्सारी यांचा पूर्व इतिहास काळवंडलेला असल्यामुळे त्यांच्या खुलाशावर विश्वास ठेवणे कठीण आहे. अनेक वर्षे देशातील महत्वाचे पद भूषविल्यानंतरही अन्सारी हे कायम मुस्लीम धार्जिणे राहीले. मुस्लीम डरा हुवा है… ही थिअरी मांडत राहिले.
सार्वजनिक पदांवर राहूनही ज्यांच्यावर मुस्लीम कट्टरतावादाचा कायम पगडा राहिला, असे अन्सारी एकमेव नाहीत.
काही दिवसांपूर्वी विशेष एटीएस कोर्टाने अशाच एका प्रकरणात राज्याचे माजी पोलिस महानिरीक्षक एम.एम.मुश्रीफ यांना फटकारले. देशात शरद पवार, पी. चिदंबरम, दिग्विजय सिंह, सुशीलकुमार शिंदे ही मंडळी हिंदू दहशतवादाची थिअरी देशवासियांच्या गळी उतरवत होती. त्याच वेळी हिंदू दहशतवादाच्या मुद्याला बळ देण्यासाठी हू किल्ड करकरे, २६/११ Probe, Why Judiciary also failed?, ब्राह्मिनिस्ट बॉम्ब्ड एण्ड मुस्लीम हॅंग्ड, या पुस्तकातून मुश्रीफ ही थिअरी मजबूत करत होते.
या पुस्तकात जे म्हटलंय ते भयंकर आहे. २६/११ चा दहशतवादी हल्ला हा पाकिस्तान पुरस्कृत नसून रा. स्व. संघ पुरस्कृत होता. या हल्ल्यात सामील असलेले सर्व दहशतवादी हिंदू होते. एटीएसचे प्रमुख यांची हत्या अजमल कसाब गॅंगने केली नसून त्यामागे आरएसएस आहे, असा दावा या पुस्तकातून केलेला आहे. रॉ आणि आयबी या सर्व संस्थांचे प्रमुख हे पूर्वीपासून ब्राह्मण समाजाचे होते. त्यांनीच संघातील वरिष्ठ नेतृत्वाला हाताशी धरून हा हल्ला घडवला. विनाकारण याचे खापर मुस्लीम आणि पर्यायाने पाकिस्तानवर फोडण्यात आलं, अशी उफराटी थिअरी या पुस्तकातून मांडण्यात आली आहे. एकप्रकारे मुश्रीफ यांनी या पुस्तकातून पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआय, देशातील जिहादी, स्लीपर सेल, इंडीयन मुजाहीदीनसारख्या फुटीर आणि देशद्रोही संघटनांची वकीली केली आहे. शहीद तुकाराम ओंबळे यांनी प्राणांची बाजी लावून कसाबला जिवंत पकडले नसते तर हिंदू दहशतवाद या थिअरीवर शिक्कामोर्तब करण्याची पूर्ण तयारी झाली होती. मुश्रीफ त्या कटातील एक महत्वाचे मोहरे होते.
एकेकाळी पोलिस खात्यात महत्वाच्या पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याने हे कर्म केले असल्यामुळे खरं तर त्यांनी सखोल चौकशी करून त्यांना गजाआड टाकण्याची गरज होती. परंतु यूपीएच्या काळात दिग्विजय सिंह यांच्यासारखे काँग्रेस नेते मुश्रीफ यांच्यासोबत या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मिरवत होते. मग कारवाई व्हावी तरी कशी? हिंदूंना दहशतवादी ठरवणारी मंडळी यूपीएच्या काळात काँग्रेसचे जावई असल्यासारखी वावरत होती. आणि काँग्रेस नेते झाकीर नाईक सारख्या दहशतवाद्यांना पोलिस अधिकाऱ्याचे प्रबोधन करण्यासाठी आमंत्रित करीत होते.
याच मियॉं मुश्रीफ यांनी जर्मन बेकरी प्रकरणात विशेष दहशतवादविरोधी न्यायालयात याचिका केली होती. याप्रकरणातील आरोपी यासीन भटकळ आणि हिमायत बेग यांना विनाकारण गुंतवण्यात आले आहे. एटीएसने या प्रकरणाचा तपास करताना अनेक महत्वपूर्ण पुरावे दडपले आहेत, असा मुश्रीफ यांच्या याचिकेचा आशय होता. इक्बाल भटकळ आणि रीयाज भटकळ यांनी सुरक्षा यंत्रणांना चकवा देऊन पाकिस्तानात पळ काढल्यानंतर ज्या यासिन भटकळने इंडीयन मुजाहीदीनचा इंडीया कमांडर पदाची जबाबदारी स्वीकारली. जो यासिन देशातील अनेक बॉम्बब्लास्टला जबाबदार होता. ज्याने जिहादच्या नावावर शेकडो बळी घेतले, अशा दहशतवाद्याची तळी मुश्रीफ उचलत होते. विशेष कोर्टाने या प्रकरणात मुश्रीफ यांचे कान उपटले. मुश्रीफ यांची याचिका म्हणजे ‘न्यायालयाचा दृष्टीकोन पूर्वग्रह दूषित करण्याचा प्रयत्न असून कायदेशीर प्रक्रीयेतील हा अनावश्यक हस्तक्षेप गंभीर आहे,’ असे ताशेरे विशेष न्यायालयाने मुश्रीफ यांच्यावर ओढले आहेत.
सरकारी पदावरील किंवा वर्दीतील कट्टरवाद्यांची वंशावळ इथे संपत नाही. ११ ऑगस्ट २०१२ मध्ये रझा अकादमीने मुंबईतील आझाद मैदानावर काढलेल्या मोर्चात निवृत्त पोलिस अधिकारी शमशेर खान पठाण हा सुद्धा सामील झाला होता. आसाममध्ये झालेले दंगे आणि म्यानमारमध्ये मुस्लीमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या या मोर्चात सामील झालेल्या गुंडांनी आझाद मैदान परीसरात हैदोस घातला होता. अमर जवान ज्योतीसह बऱ्याच मालमत्तेची तोडफोड केली. अनेक महिला पोलिसांचा या मोर्चात विनयभंग करण्यात आला होता. पत्रकारांना मारहाण करण्यात आली होती. हा समशेर खान पठाण डोंगरीमध्ये अनेक वर्षे कार्यरत होता. डोंगरी हा त्या काळी दाऊदचा अड्डा होता हे उघड गुपित आहे. मोर्चाचा एक प्रमुख आयोजक म्हणून त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे ही वाचा:
पाकिस्तानात हिंदू मुलीचे बळजबरीने धर्मांतर करून मुस्लिम मुलाशी लग्न
असंसदीय शब्दांची यादी जाहीर; वाचा सविस्तर
अतिवृष्टीमुळे ‘या’ जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
अध्यक्ष राजपक्षे यांच्या पलायनानंतर श्रीलंकेत आणीबाणी लागू
पाटणा पोलिसांनी जिहादी कट्टरवाद्यांसाठी मार्शल आर्ट्स प्रशिक्षण शिबीर चालवणाऱ्या दोनजणांना अटक केली आहे. यातील मोहम्मद जलालुद्दील हा इसम झारखंडचा निवृत्त पोलिस अधिकारी आहे. तो पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडीया या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता. देशात २०४७ पर्यंत इस्लामिक राजवट आणण्याचे लक्ष्य ठेवून हे लोक काम करत होते. त्यांच्याकडून बरेच संवेदनशील दस्तेवज सुद्धा जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पाटण्याचे सहायक पोलिस अधिक्षक मनिष कुमार यांनी दिलेली आहे.
एकेकाळी माफिया दाऊद इब्राहिमची निरंकुश सत्ता असलेल्या बॉलिवूडमध्ये मनाने पाकिस्तानी असलेल्या कलाकारांचे पिक आले होते, ही पिलावळ काही प्रमाणात आजही अस्तित्वात आहे. परंतु पोलिस दलात किंवा घटनात्मक पदावर जिहादी मानसिकता असलेल्या लोकांचा भरणा देशाच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे.