24.6 C
Mumbai
Sunday, January 5, 2025
घरसंपादकीयगंगू नाचतो म्हणून नंगू नाचतो, अंदाजापेक्षा मोदींचे आकडे मोठे असतील!

गंगू नाचतो म्हणून नंगू नाचतो, अंदाजापेक्षा मोदींचे आकडे मोठे असतील!

०२४ मध्ये हे आकडे तोकडे पडतील आणि अंदाजाच्या पलिकडेचे दणदणीत यश मोदींना मिळेल

Google News Follow

Related

लोकसभा निव़डणुकीचा आज अखेरचा सातवा टप्पा. आज ५७ जागांसाठी मतदान झाले. सायंकाळी ७ पासून एक्झिट पोलचे निकाल जाहीर होतील. हे आकडे मतदारांचा कल दाखवतात. वाऱ्याची दिशा दाखवतात. परंतु प्रत्यक्षात निकालाच्या आकड्यांच्या जवळपास जाताना दिसत नाहीत, हे २०१९ मध्ये सिद्ध झालेले आहे. इंडिया टूडे आणि न्यूज २४ चा एक्झिट पोल निकालाच्या जवळपास गेला होता. बाकी सगळे उताणे पडले होते. तज्ज्ञांना निकालाचे ठोस अंदाज बांधता येत नाहीत, असे चित्र वारंवार दिसते आहे. मग ते ओपिनिअन पोल असो किंवा एक्झिट पोल. गेल्या वेळी दहा-बारा एक्झिट पोल पैकी फक्त दोन एजन्सीजचे आकडे जवळपास गेले. याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे मोदी-शहा जोडगोळीने गेल्या दहा वर्षांच्या काळात राजकारणाचा बदललेला पॅटर्न आणि मतदारांच्या नव्या फुटपट्ट्या मीडिया लक्षात घेत नाहीये.

नेल्सन-एबीपी, इंडीया टूडे, टाईम्स नाऊ, सी व्होटर, एनडीटीव्ही, हिंदू, इंडीयन एक्सप्रेस, बिजनेस स्टॅडर्ड, रिपब्लिक, न्यूज१८, न्यूज एक्स, न्यूज-२४ यांचे एक्झिट पोल गेल्या वेळी प्रसिद्ध झाले. त्यातले बरेच फसले. एक्झिट पोलवाल्यांना मतदारांच्या मनाचा अंदाज घेता येत नाही, हे स्पष्ट झाले. याचे महत्वाचे कारण म्हणजे राजकारणाच्या बदललेल्या फुटपट्ट्या लक्षात न घेता जुन्या फुटपट्ट्या वापरण्याचा त्यांचा आग्रह.

केंद्राच्या राजकारणात नरेंद्र मोदी यांचा उदय झाल्यानंतर देशाचे राजकारण २०१४ नंतरचे आणि २०१४ च्या आधीचे अशा दोन टप्प्यात विभागले गेले आहे. २०१४ पूर्वीच्या राजकारणात फूटपट्ट्या वेगळ्या होत्या. जात-पात, भाषा, धर्म, हे मतदानाचे मुख्य निकष होते. त्यातूनच उत्तर प्रदेश आणि एमवाय अर्थात मुस्लीम यादव समीकरण अस्तित्वात आले. ते अनेक वर्ष टिकले. मुस्लीम मतपेढीला या देशात इतके महत्व प्राप्त झाले होते की, हिंदू मतदार हा देशाचा दुय्यम नागरीक झाला होता. त्यातूनच संसाधनांवर पहिला हक्क मुस्लिमांचा अशा प्रकारची विधाने होत असत. राजकीय पर्यटन करण्यासाठी अजमेरा दर्गा हेच एकमेव धार्मिक स्थळ होते. ताजमहाल हाच एकमेव सांस्कृतिक वारसा होता.

हिंदू मतांचा टक्का वाढवून मोदी-शहा या जोडगोळीने मुस्लीम व्होटबँकचा प्रभाव बऱ्यापैकी कमी केला. आज देशात हिंदू व्होटबँक निर्माण झालेली आहे. हा राजकारणाचा नवा मोदी पॅटर्न आहे. निवडणूक प्रचार संपल्यावर कन्याकुमारी येथील विवेकानंद शीलास्मारकावर ध्यानधारणेसाठी गेलेले मोदी, हे त्याच नव्या राजकीय रचनेचे ठळक उदाहरण आहे. हा नवा राजकीय पॅटर्न हिंदूंच्या धर्म श्रद्धांना आदर करणारा आहे. हे केवळ भारतीयांनाच नाही तर जगाला दाखवण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. हिंदू श्रद्धांची टवाळी करणाऱ्यांना, सनातनचा अपमान करणाऱ्यांना हे मोदी स्टाईलमध्ये उत्तर आहे. या नव्या राजकीय पॅटर्नला अध्यात्माची जोड आहे. ‘मी ज्या ऊर्जेने काम करतो ती ऊर्जा फक्त माझ्या बायोलॉजिकल शरीराची नाही’, हे मोदींचे वाक्य देशाच्या राजकारणाला लाभलेल्या आध्यात्मिकतेच्या नव्या पदराकडे अंगूली निर्देश करते. काँग्रेसच्या चाटुकार इकोसिस्टीमने मोदींच्या या विधानाची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या हसण्याला जनतेने दाद दिली नाही आणि प्रतिसादही दिला नाही.

मोदींनी घोषणांच्या राजकारणाचे युग संपवून परफॉरमन्सच्या राजकारणाचा काळ सुरू केला. एखाद्या प्रकल्पाची, योजनेची, उपक्रमाची घोषणा करायची आणि कालबद्ध काळात तो मार्गी लावायचा हा मोदी पॅटर्न आहे. पूर्वी फक्त लोक नारळ वाढवायचे आणि प्रकल्प दशकोनुदशके लटकून राहायचा. मोदी विरोधक आणि मीडियाला निवडणूक निकालांचे आकलन होत नाही, त्याचे कारण आजही ते जुन्या फूटपट्ट्या लावून निकालाचे मोजमाप करतायत. महाराष्ट्रात मराठी-गुजरातीच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर धिंगाणा केला, मनोज जरांगेने आरक्षणाच्या मुद्द्यावरून तमाशा केला तर राजकारणात उलथापालथ होऊन मोदींच्या विरोधात मतं जातील, असे महाराष्ट्रातील मीडियाला, उद्धव ठाकरेंच्या चेल्याचपाट्यांना वाटते. जातीगत जनगणनेचा विषय वारंवार उपस्थित केला की, मागासवर्गीयांची मतं आपल्या खिशात जातील, भाजपाला भाजपा घटना मोडीत काढणार असे म्हटले की, आरक्षणाचे सगळे लाभार्थी हादरतील आणि आपल्याला विजयी करतील असे राहुल गांधीना वाटते, त्यांची तळी उचलणाऱ्या चाय-बिस्कुट मीडियाला वाटते. त्याचे कारण आजही हे लोक त्याच त्याच जुन्या फुटपट्ट्या लावून निष्कर्ष काढतायत.

हे ही वाचा:

चक्क नाकाने कीबोर्डवर टाइप केली अक्षरे! मोडला स्वतःचाच विक्रम

पाकव्याप्त काश्मीर म्हणजे विदेशी भूमी; चक्क पाकिस्तान सरकारची न्यायालयात कबुली

अंबानींच्या क्रूझचे टायटॅनिक व्हावे… स्वयंघोषित इतिहासकार रुचिका शर्माची अभद्र भाषा

सलमान खानवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानवरून आणली जाणार होती शस्त्रे

आतापर्यंत सातही टप्प्यात जे काही मतदान झाले, त्यावर राममंदिराच्या मुद्द्याचा प्रभाव नाही, असे वारंवार सांगण्यात आले, मोदींची लाट जाणवत नाही, असेही तर्कट मांडण्यात आले. मतदारांनी ईव्हीएमवर कमळाचे बटण दाबल्यानंतर किंवा मतदार केंद्राबाहेर येऊन जय श्रीरामच्या घोषणा दिल्या तरच हा मुद्दा आहे, असे मीडियाला वाटलेले असते का? हर हर मोदी, घर घर मोदी ही घोषणा दिली असती तरच मोदी लाट आहे असे मीडियाला वाटले असते का? माझे तुझ्यावर प्रेम आहे, हे लग्नानंतर फार फार तर पहिल्या दुसऱ्या वर्षात वारंवार म्हटले जाते, दहा वर्षांनंतर ते नजरेच्या एका कटाक्षातून किंवा एखाद्या हळुवार स्पर्शातूनही व्यक्त केले जाते. हा हळुवारपणा टिपण्याइतका मीडिया संवेदनशील नसल्यामुळे एक्झिट पोलचे आकडे २०१९ मध्ये चुकले. २०२४ मध्ये हे आकडे तोकडे पडतील आणि अंदाजाच्या पलिकडेचे दणदणीत यश मोदींना मिळेल, महाराष्ट्र त्याला अपवाद नसेल. विरोधक सुद्धा छातीवर हात ठेवून ३०० पारचा आकडा सांगत असले तरी त्यात वाफा जास्त आहेत. गंगू नाचतो म्हणून नंगू नाचतो, असा हा प्रकार आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा