बुडत्याला ५ कोटीच्या पुडीचा आधार…

काडीचा आधार घेऊन काही नेते मविआचे बुडते तारु वाचवण्याचा प्रयत्न करतायत

बुडत्याला ५ कोटीच्या पुडीचा आधार…

नालासोपाऱ्याच्या विवांता हॉटेलमध्ये भाजपा नेते विनोद तावडे यांनी पाच कोटी रुपये वाटल्याचा आरोप झाला. आरोप बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला. मतदानाच्या एक दिवस आधी हा प्रकार घडल्यामुळे ‘युरेका
युरेका’ म्हणत बाथ टबमधून विवस्त्र बाहेर आलेल्या आर्कीमिडीज सारखी विरोधकांची अवस्था झालेली आहे. संजय
राऊत यांनी खेळ खल्लास, अशी प्रतिक्रीया दिलेली आहे. मविआची सुपारी वाजवणारे विश्वंभर चौधरी यांनी तीच उचललेली आहे.

आरोप खरा की खोटा याची चौकशी करण्यासाठी निवडणूक आय़ोग सक्षम आहे. विनोद तावडे यांनी तर सीसीटीव्ही तपासा
असे बिनधास्त आव्हान दिलेले आहे. या प्रकरणात विनोद तावडे यांचे नाव आल्यामुळे मुळात मविआच्या नेत्यांचा गोंधळ
उडाला आहे, याला नेमका तावडे विरुद्ध फडणवीस, अर्थात बहुजन विरुद्ध बामण असा रंग द्यावा की निवडणुकीत
पैशाची उधळपट्टी असा रंग द्यावा. सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया पाहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. संजय राऊतांची
प्रतिक्रीया साधारण संमिश्र दिसते. त्यांचा गोंधळ उडाला आहे, की प्रतिक्रिया नेमकी कोणत्या दिशेने न्यायाची आहे.

 

मुळात ज्या पाच कोटीचा उल्लेख केला जातो आहे, त्याचे फूटेज एकाही चॅनलकडे नाही. आरोप करणारे हितेंद्र ठाकूर आणि ज्यांच्यावर आरोप झाले ते तावडे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. एकमेकांवर आरोप केले. आरोप करून हे तिघे एका कारमधून हॉटेलमधून निघाले. ही निवडणूक एकाच मुद्दावर होणार आहे. महाराष्ट्राला मविआचे मुस्लीम लांगुलचालन मान्य आहे की नाही. बाकी विरोधकांकडे मुद्दा नसल्यामुळे राहुल गांधी अदाणींच्या सेफचा मुद्दा काढतायत, विरोधक नालासोपाऱ्यातील पाच कोटीच्या पुडीचा. सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याविरोधात बहुजन विकास आघाडीसारख्या एका स्थानिक पक्षाचा नेता तक्रार करतो आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी त्या तक्रारीची दखल घेत तिथे पोहोचतात, हा मोदी सरकारचा पारदर्शी कारभार आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधींजी हा पोरकटपणा नाहीतर दुसरं काय?

वरळीतील लोकं ठाकरेंचे पैसे घेतील पण मतं देणार नाहीत

मूल्य आणि तत्त्वे कमी झाल्यामुळेच ‘आप’ला सोडचिठ्ठी!

बदली घ्या किंवा निवृत्ती घ्या…तिरुपती मंदिर ट्रस्टचा अहिंदू कर्मचाऱ्यांसाठी आदेश

काँग्रेसची सत्ता असती तर कधीच प्रकरण दाबून मोकळे झाले असते. पुरावेही नष्ट केले असते. पैशाच्या वाटपाची चर्चाच करायची आहे, तर ती न मिळालेल्या पाच कोटींची कशाला करताय ? मालेगावाती बेनामी बँक खात्यात सापडलेल्या १२५ कोटींची करा. हवालाच्या माध्यमातून आलेल्या २०० कोटींची करा. ही रक्कम दुबईतून आलेली आहे. मालेगावात आलेली आहे आणि एका सिराज मोहमदच्या माध्यमातून ती आलेली आहे. याप्रकरणी मालेगावात गुन्हाही दाखल झाला आहे. आणि १२५ कोटी अधिक २०० कोटी ही रक्कम न सापडलेल्या पाच कोटीपेक्षा नक्कीच जास्त आहे. हा पैसा नेमका मालेगावातल्या एका इसमाच्या खात्यात कसा आला. त्याला तिथून कसे पाय फुटले, याच्या तपशीलाबाबत राऊत, ठाकरे, सुळे कोणीही फार उत्सुकता दाखवली नाही. कारण उत्सुकता त्या विषयाबाबतदाखवली जाते ज्याबाबत आपल्याला काही माहीती नसते.

मालेगावात पैसा का आला ही बाब मविआच्या नेत्यांना ठाऊक असावी, त्यामुळे याबाबत कोणालाही प्रश्न पडला नाही.
कोणीही गदारोळ केला नाही, मीडियामध्ये खळबळ नाही. कारण याप्रकरणात भाजपाच्या किंवा महायुतीबाबत
बोलण्यासारखे काहीच नव्हते. विवांतामध्ये सापडलेली रक्कम ही आठ लाख असल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने ऑन कॅमेरा दिलेली आहे. या काडीचा आधार घेऊन काही नेते मविआचे बुडते तारु वाचवण्याचा प्रयत्न करतायत. जे या घडीला तरी कठीण दिसते आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version