25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरसंपादकीयसावरकरवादी नाही, तेव्हा ठाकरे अजमेरावादी होते!

सावरकरवादी नाही, तेव्हा ठाकरे अजमेरावादी होते!

महाविकास आघाडीचे सरकार असताना कोविड महामारीचे कारण दाखवून कोणतेही काम करताना निधी नाही, अशी बोंब उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी सातत्याने करीत होते.

Google News Follow

Related

अनेकांना असा प्रश्न पडलाय की, मुख्यमंत्रीपदी असताना जेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी स्वा.सावरकरांचा वारंवार अपमान करीत होते तेव्हा उद्धव ठाकरे गप्प का होते? त्याचे कारण म्हणजे ठाकरे तेव्हा सावरकरवादी नसून अजमेरावादी होते. स्वा.सावरकर अपमानाच्या मुद्यावर ते तोंड आवळून बसले होते, सत्तेला घट्ट चिटकून बसले होते, त्याचे कारणही अजमेरावाद आहे.

कॅगने नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या काळातील महापालिकेच्या कारभाराची तपासणी केली. कॅगच्या अहवालात उद्धव ठाकरे यांच्या अजमेरावादावर शिक्कामोर्तबच झाले आहे. मुंबई महापालिकेला खड्ड्यात घालूनही उद्धव ठाकरे या अजमेरावादाला कसे घट्ट चिकटून बसले होते, त्याची कथा ऐका.

अल्पेश अजमेरा यांनी २०१० मध्ये दहीसरच्या एकसर गावातील सात एकर दोन कोटी ५५ लाख रुपयांना जमीन विकत घेतली होती. जमीनीवर अतिक्रमणे होती, अनेक झोपड्या होत्या. कोर्ट कज्जाची भुणभुणही होती. जमीनीचा सौदा करून अडकलो, अशी बहुधा त्यांची भावना झाली असावी, त्यामुळे त्यांनी अवघ्या तीन महीन्यात ही जमीन महापालिकेच्या गळ्यात मारता येईल का, याची चाचपणी केली.

वाटाघाटी सुरू होत्या परंतु जमीन मोकळी नसल्याने आणि कोर्ट कज्जात अडकली असल्यामुळे महापालिकेने ही जमीन विकत घेण्यास नकार दिला. परंतु शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेत काहीही शक्य होते, त्यामुळे अजमेरा यांनी प्रयत्न सुरू ठेवले.

२०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आणि अचानक जादूची कांडी फिरली.
अजमेरा यांनी जी जमीन सुमारे अडीच कोटी रुपयांना विकत घेतली होती. ती जमीन १३ वर्षांनंतर ९०० कोटी रुपयांना महापालिकेच्या गळ्यात मारण्यात त्यांना यश आले.

हे ही वाचा:

पगारदारांसाठी केंद्र सरकारची खुशखबर!!

क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील हरवले, मुंढव्यात सापडले

शरद पवार म्हणतात, सावरकरांना माफीवीर म्हणणे योग्य नाही!

बोरिवलीत राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन 

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी त्यावेळी लोकायुक्तांकडे तक्रारही केली होती. महापालिका आयक्तांसह सात वरीष्ठ अधिकाऱ्यांनी ज्या सौद्याला कडाडून विरोध केला होता, तो सौदा उद्धव ठाकरे सत्तेवर आल्यानंतर एका झटक्यात कसा झाला? याची चौकशी झाली पाहीजे, अशी मागणी सोमय्या यांनी केली होती. आता कॅग अहवालात सुद्धा या सौद्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

ज्या अल्पेश अजमेरा यांच्याशी हा व्यवहार झाला, त्यांच्याविरोधात जमीनीवर कब्जा, फसवणूक, दुसऱ्याच्या मालमत्तेत घुसखोरी, खंडणी असे गुन्हे दाखल आहेत. हीना कालबाग या महीलेने अंधेरी पश्चिम येथील एका मालमत्तेप्रकरणी केलेल्या तक्रारींनंतर अल्पेश अजमेरा आणि दाऊद टोळीचा गँगस्टर बच्ची सिंह याला अटक झाला होती. दाऊद टोळीच्या गँगस्टरसोबत अटक झालेल्या बिल्डरसोबत हा सौदा झाला होता हे विशेष. बच्ची सिंह हा छोटा शकीलचा शूटर होता. त्याच्यावर अनेक प्रकरणात गुन्हा दाखल आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात दहीसरमधील या जमीनीचा सौदा झाला, त्यानंतर अजमेरा यांना महापालिकेने ३४९ कोटी रुपये अदा सुद्धा केले. महाविकास आघाडीचे सरकार असताना कोविड महामारीचे कारण दाखवून कोणतेही काम करताना निधी नाही, अशी बोंब उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी सातत्याने करीत होते. तो निधी नेमका कशासाठी वापरला जात होता, त्याची ही छोटीशी झलक.

ही जमीन विकत घेतल्यानंतर महापालिकेला जमीनीवरील झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी काही कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. शेअर बाजारात ब्लू चीप शेअरमध्ये गुंतवणूक केल्यानंतरही एखाद्याला १३ वर्षांत ३५०० टक्के परतावा मिळत नाही. तो परतावा मिळवून देण्याचे काम ठाकरे सरकारने केले होते.

सरकार गमावल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून होणारा स्वा.सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा देणारे उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकारच्या काळात तोंड शिवून गप्प का होते. खुर्चीला चिकटून का बसले होते? राहुल गांधी यांच्याविरोधात तोंड का उघडत नव्हते? त्याचे कारण सत्ता असताना ते अजमेरावादी होते हेच आहे. अशा अनेक अजमेरांचे उखळ पांढरे करण्यासाठी उद्धव ठाकरे सत्ता राबवत होते. अडीच वर्षांच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे घरातून बाहेर का, पडत नसत? घरात बसून ते नेमके काय करायचे? या प्रश्नांची उत्तरे अजमेराप्रकरणातून आपल्याला मिळू शकतील.

आता प्रश्न येतो की, अजमेरा यांचे उखळ पांढरा करण्याचा निर्णय का घेण्यात आला. जनतेने कर रुपाने दिलेला पैसा जनतेच्या सोयी-सुविधांसाठी खर्च होण्याची गरज असताना तो अजमेरांच्या भल्यासाठी का उधळला जात होता? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी चौकशीची गरज आहे. बऱ्याच प्रश्नांची उत्तर उद्धव ठाकरे यांच्याकडे सापडू शकतील. त्यांच्या अजमेरावादाचे गुपितही उलगडू शकेल.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा