25 C
Mumbai
Sunday, January 5, 2025
घरसंपादकीयथयथयाट आणि थरथराट…

थयथयाट आणि थरथराट…

Google News Follow

Related

पालघरमध्ये काल शुक्रवारी झालेल्या सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा पातळी सोडून बोलले. नकली शिवसेना हा टोला ठाकरेंच्या वर्मी बसलेला दिसतो. पालघरच्या सभेत त्यांनी नेहमी प्रमाणे थयथयाट केला. सध्या मोदी नामामुळे भयग्रस्त झालेले आपल्या पाठीशी किती आहेत, याचा हिशोब मांडत असतात पालघरच्या ठाकरेंनी झेंड्यांचा हिशोब मांडला. ज्येष्ठ नेते शरद पवार पक्षात मोठी वजाबाकी झाल्यामुळे नव्या दमाने कट्टर विरोधकांची बेरीज करू लागलेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासाठी कालपर्यंत उद्धव ठाकरे जी भाषा वापरत होते. आज तीच भाषा ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वापरतायत.

पालघरच्या सभेत त्यांचा एकूण आवेश राखी सावंतपेक्षा कमी नव्हता. बेताल बडबडीबाबत दोघांची तुलना केली तर कोण अधिक बेताल हे सांगणे कठीण होऊन बसेल. वाढवण बंदराला विरोध करताना इथे मला इथे एअरपोर्ट आणायचे आहे, असा विनोदी दावा त्यांनी केला. घर बसल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात वाढवणमध्ये विमानतळ उभारण्यासाठी एखादा प्रस्ताव ठाकरेंनी केंद्र सरकारला पाठवला असता, तर ठाकरेंच्या या बतावणीवर विश्वासही ठेवता आला असता. परंतु, अचानक सुचले आणि बोलून गेले, असे झाले असण्याची शक्यता जास्त आहे. नवी मुंबई विमानतळाकडे सहा मार्गाने पोहचण्याचे नियोजन या विमानतळाच्या निर्मितीपासून करण्यात आले आहे. आता हा विमानतळ पूर्णत्वाच्या दिशेने जात असताना वाढवण बंदराची पूडी सोडून ठाकरे काय साधू इच्छितात?

थापा मारायलाही अक्कल लागते. आपण थापा मारतोय हे लोकांच्या लक्षात येणार नाही, याची खबरदारी तरी घ्यायला हवी होती. मुख्यमंत्री पदी असताना फक्त प्रकल्प बंद करण्याचे काम ज्यांनी केले, त्यांच्या डोक्यात एखादा विमानतळ उभारण्याची कल्पना यावी यावर लोकांनी विश्वास कसा ठेवावा? बहुधा पालघरमध्ये हवेत विमानतळ बांधण्याची ठाकरेंची योजना दिसते, ज्यामुळे इथे शेतकऱ्यांच्या, बागायती, शेत जमीनींना हात न लावता विमानतळ उभारता येईल. कारण मच्छीमारांचा विरोध असल्यामुळे जर वाढवण बंदर होणार नसेल तर शेतकऱ्यांच्या विरोधामुळे विमानतळही होणार नाही.
कारण जमीनीवर विमानतळ उभारायचे झाले तर विरोधात लाल बावटावाले डावे मोर्चा काढणारच. सध्या डावे ठाकरेंच्या सोबत असल्यामुळे हवेत विमानतळ उभारण्याची भन्नाट कल्पना ठाकरे यांच्या डोक्यात असणार. संजय राऊतांना एखादी कंपनी काढायला सांगून हे काम त्यांच्यावर सोपवण्याचा ठाकरेंचा विचार असावा. कोविडच्या काळात अनेक कोविड सेंटरचे काम, खिचडी बनवण्याचे काम त्यांनी राऊतांवर सोपवले होते तसेच.

हे ही वाचा:

बलुचिस्तानमध्ये बंदूकधाऱ्यांनी नऊ प्रवाशांना बसमधून उतरवून गोळ्या झाडल्या

महायुतीच्या संकल्प मेळाव्यास कांदिवली पूर्वमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात गोळीबार; चार जण ठार

बंगळूरू कॅफे ब्लास्टमागील आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी

ठाकरेंच्या कालच्या सभेच लाल बावटे मोठ्या संख्येने आले होते. त्यांच्या उपस्थित ठाकरेंनी वाढवण बंदरासाठी जनमत घेऊन टाकले. या सभेत कम्युनिष्टांच्या लाल बावट्यासह, काँग्रेसचा झेंडा आहे, अन्य मित्र पक्षांचे झेंडे आहेत, असे ठाकरे मोठ्या अभिमानाने म्हणाले. असा अभिमान बाळगण्या व्यतिरीक्त ठाकरेंकडे दुसरा पर्याय नाही. एकट्याच्या जीवावर सभेचे मैदान गाजवण्याची ताकद ठाकरेंमध्ये उरलेली नाही. त्यामुळे इतर पक्षांच्या झेंडा आणि दांडा दोघांची गरज सध्या त्यांना आहे. कधी काळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मुंबईतील डाव्यांचे पेव संपवण्यासाठी लढले याचा विसर ठाकरेंना पडलेला आहे. भारतीय कामगार सेनेने डाव्यांच्या कामगार संघटनांच्या विरोधात घेतलेले पंगेही ठाकरे विसरले असावेत. मोदी मॅजिकने गेल्या दहा वर्षात अनेक गोष्टी घडवल्या. ठाकरेंचे ऊतू जात असलेले लाल बावट्यावरील प्रेम हा त्यातलाच एक विषय.

मविआचे रिमोट कंट्रोल शरद पवार यांची परीस्थितीही वेगळी नाही. एकेकाळी शरद पवारांचे ज्या राजकीय घराण्यांशी हाडवैर होते त्यांच्या घरी पायधूळ झाडण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. आमच्याशी वाकडे त्याची स्मशानात लाकडे, असा काही जणांचा खाक्या असतो. पवारांचे ज्यांच्याशी जमले नाही, त्यांना राजकारणातून कायम बाद करण्याचे, त्यांचा बाजार उठवण्याचे धंदे शरद पवारांनी आयुष्यभर केले. अर्थात त्यांना ज्यांचा बाजार उठवायचा होता, ते संपले असेही नाही. आज थोरल्या पवारांना त्यांच्या घरी जाऊन मनधरणी करावी लागते आहे. बारामतीचे समीकरण मजबूत करण्यासाठी ते थोपटे आणि काकडेंना भेटले. तर माढात पाय मजबूत करण्यासाठी मोहितेंशी हात मिळवणी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विरोधकांच्या दाढ्या कुरवाळण्याची वेळ ठाकरे आणि पवारांवर आलेली आहे. जब समय आ गया बाका, तब गधे को बनाओ काका.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा