कास्टींग काऊच मानसिकतेचे गुलाम असे वक्तव्य करणार ना! सावंतांना फक्त इटालियन माल चालतो का?

इटालियन सोनिया चालतात आणि हाकेच्या अंतरावर राहणाऱ्या शायना एन.सी इंपोर्टेड वाटतात

कास्टींग काऊच मानसिकतेचे गुलाम असे वक्तव्य करणार ना! सावंतांना फक्त इटालियन माल चालतो का?

उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेनेच्या उमेदवार शायना एन.सी. यांच्या विरोधात केलेल्या एका विधानामुळे सध्या गदारोळ माजला आहे. निवडणुका या युद्धासारख्याच लढल्या जातात. समोरच्याला नामोहरम करणे आणि विजयी होणे, एवढाच प्रत्येक उमेदवाराचा मर्यादित हेतू असतो. त्यात तारतम्य दाखवणारे जेवणातल्या मीठा एवढेही नाहीत. इथे इंपोर्टेड चालत नाही, ओरीजिनल माल लागतो, हे सावंतांचे विधान आहे. सावंतांना इंपोर्टेड चालत नाही, हे वाक्यच मुळी दिशाभूल करणारे आहे. जिथे त्यांच्या मालकाला इटालियन मालकीण चालते तिथे बाजूच्या मतदार संघातून आलेल्या शायना एन.सी. यांचे त्यांना वावडे असण्याचे कारण नाही.

काँग्रेसचे मुंबादेवीतले उमेदवार अमिन पटेल यांच्या एका प्रचार सभेत सावंतांनी हे विधान केले. त्यांची जीभ घसरली… असे आम्ही काही मानत नाही. कारण जीभ अनावधानाने घसरते, अशा विधानाचे समर्थन केले जात नाही. सावंतांनी विधान मागे घेतले नाहीच, शिवाय आपल्या विधानाचे जोरदार समर्थनही केले. राजकीय क्षेत्रातील महिलांच्या वाट्याला येणारे वाईट अनुभव चंदेरी पडद्यावर किंवा मालिकांमध्ये, मॉडेलिंगच्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या तुलनेत कमी तापदायक नसतात. पुरुष सहकारी अदबीने वागतील, मर्यादा पाळतील अशी शक्यता कमी असते. इंडी आघाडीतील सगळ्यात मोठा पक्ष असेलल्या काँग्रेस पक्षाचे तरी चारित्र्य सर्वश्रुत आहे. केरळ काँग्रेसमध्ये महिलांचे लैंगिक शोषण होते, पक्षाच्या काही नेत्यांचा व्यवहार बॉलिवुडमधल्या कास्टींग काऊच सारखा आहे, असा दावा करणाऱ्या काँग्रेसच्या महिला नेत्या सिमी रोसबेला जॉन यांना पक्षाने तात्काळ नारळ दिला. दिल्लीत अशोक वानखेडे नावाचे वरीष्ठ पत्रकार आहेत.

त्यांची पत्रकारिता कायम काँग्रेस शरण राहिली. हरीयाणातील काँग्रेसचा पराभव किंवा भाजपाचा विजय त्यांच्या इतका वर्मी लागला की, त्यांनी काँग्रसचे सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांच्या विरोधात तोच आरोप केला जो रोसबेला बाईंनी केला होता. या आरोपाची चौकशी करण्याचे सोडून काँग्रेसने वानखेडे यांच्याविरोधात एफआयआऱ दाखल केला. या विषयावर ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी त्यांच्या प्रतिवाद या हिंदी युट्यूबवर एक अत्यंत उपहासगर्भ मार्मिक व्हीडीयो केला आहे. काँग्रेसची परिस्थिती ही अशी आहे. पीडिता सोडून कास्टींग काऊचला बळ देणारे पक्षाचे धोरण आहे. अशा पक्षाच्या चरणी सध्या उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लीन झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या नेत्याने महिलांबाबत बेताल विधान करावे यात आश्चर्य काहीच नाही.

हे ही वाचा:

१८ हिंदुंवर देशद्रोहाचा गुन्हा !

कर्नाटकच्या शक्ती योजनेवर खर्गे नाराज

छत्रपती संभाजी नगरमध्ये कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त

“भारत आपल्या सीमेच्या एक इंच भागाचीही तडजोड करू शकत नाही”

सावंत यांचे विधान बेताल आहे, शिवाय तर्कात बसणारेही नाही. तुम्ही बोचरे बोल बोलू शकता, एखाद्याबाबत अपमानास्पद विधानही करू शकता. त्यात थोडे तथ्य किंवा तर्क असेल तर तुम्हाला माफ करता येऊ शकते. सावंतांच्या बोलण्यात साधा तर्कही नाही. ज्या पक्षाच्या नेत्यांनी जन्माने इटालियन असलेल्या सोनिया गांधी यांचे जोडे उचललेले आहेत, त्यांना खरे तर कोण इंपोर्टेड आहे किंवा नाही, याची उठाठेव करण्याचा नैतिक अधिकार नाही. तुम्हाला इटालियन सोनिया चालतात आणि मतदार संघापासून हाकेच्या अंतरावर राहणाऱ्या शायना एन.सी इंपोर्टेड वाटतात? अमिन पटेल यांचा प्रचार करण्याची वेळ एकेकाळी हिंदुत्ववादी असलेल्या पक्षाच्या खासदारावर आलेली आहे. त्यांना अमिन पटेल ओरिजिनल वाटतात आणि शायना एन.सी. इंपोर्टेड. बरं इथेही तुलना चुकीची. शायना एन.सी यांना इंपोर्टेड म्हणायचे असेल तर अमिन पटेल यांना लोकल म्हटले पाहिजे. त्यांना प्रमोट करण्यासाठी वोकल फ़ॉर लोकल अशी घोषणा दिली पाहिजे. परंतु सावंत यांनी अमिन पटेल यांना लोकल किंवा स्थानिक न म्हणता ओरीजिनल म्हटले आहे.

जर यांना ओरीजिनल म्हणायचे तर शायना यांना डुप्लिकेट म्हटले पाहिजे. म्हणजे इथे लोचा फक्त तर्काचा नाही, इंग्रजीचाही आहे. उबाठा शिवसेनेत त्यातल्या त्यात जे नेते इंग्रजीत संवाद साधू शकतात, सावंत त्यातलेच आहेत. तरीही त्यांनी असा भाषिक लोचा करावा हे पटत नाही. त्यांची गोची अशी आहे की ते लोकल किंवा स्थानिक या मुद्द्यावर बॅटींग करू शकत नाहीत. केली तर थेट आदित्य ठाकरे अडचणीत येतात. कारण मातोश्रीवरून उठून कलानगरचे आदित्य ठाकरे जर वरळी लढवू शकतात, तिथे केम छो वरळी असे कॅंपेन राबवू शकतात, अशा पक्षाच्या नेत्यांच्या तोंडी इंपोर्टेड वगैरे हे शब्द बरे वाटत नाही. ठाकरेंचे दिशादर्शक आणि तारणहार राहुल गांधी नाही का अमेठीतून रायबरेलीत आणि तिथून थेट वायनाडमध्ये निवडणुका लढवातात. सोनिया, त्यांचे चिरंजीव आणि कन्या यांना विशेष अधिकार आहेत, असे काँग्रेसजन मानतात, त्यांना कायदे, नियम लागू होत नाहीत, अशी त्या परिवाराचीही धारणा आहे.

समस्या अशी आहे की, त्यांच्या तैनाती फौजेतल्या प्याद्यांनाही तसे वाटू लागले आहे. जर सोनिया चालतात मग शायना एन.सी यांनी काय घोडं मारले आहे. अरविंद सावंत यांना कुणी तरी सांगायला हवे, कि कांच के घर मे रहनेवाले, दुसरो पर पत्थर नही फेकते.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version