शिउबाठाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल खेडमध्ये सभा होती. आज शिमग्याच्या दिवशीही ते खेडमध्ये आहेत. खेडमध्ये लोकांचा आशीर्वाद मागत फिरणाऱ्या उद्धव ठाकरेंना पाहून कोकणवासिंयांना २०२१ चा दौरा आठवला. तौक्ते वादळानंतर झालेल्या या दौऱ्यासाठी उद्धव ठाकरे मुंबईतून चिपळूणमध्ये आले आणि दौरा आटपून तीनपर्यंत घरी सुद्धा परतले.
कधी काळी ठाकरे बोलले की ऐकणे हाच एक पर्याय होता. आता दिवस बदलले आहेत. उद्धव ठाकरे एक बोलले कि समोरचे चार बोलतात. खेडच्या सभेत एक दिवस आधीच उद्धव ठाकरे यांनी केलेल्या शिमग्याला शिवसेनेचे मंत्री दिपक केसरकर आणि रामदास कदम यांनी उत्तर दिले आहे. रामदास कदम तर उद्धव ठाकरे यांच्या चड्डीपर्यंत गेले. नारायण राणे पक्ष सोडून गेले तेव्हा उद्धव ठाकरे यांची चड्डी पिवळी झाली होती, अशी शेलकी टीका त्यांनी केली आहे.
कोरोनाच्या काळात दोन वर्षे घरी बसून होतात, तेव्हा बाहेर पडला असतात, तर आता बाहेर पडण्याची वेळ आली नसती, असे खडे बोल सुनावले आहेत. परंतु आता अस्तित्वाचा प्रश्न पडल्यामुळे ठाकरेंना कोकण आठवले आहे. कारण शिवसेनेला सुरूवातीच्या काळात या कोकणानेच बळ दिले आहे.
\कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहीलाय. नारायण राणे यांनी हा बालेकिल्ला निर्माण करण्यात मोठी भूमिका पार पाडली. मुंबईतही शिवसेनेची पाळेमुळे रुजवण्यात कोकणातील चाकरमान्यांचा मोठा हात होता. आज पक्षाचे नाव आणि चिन्ह गमावल्यानंतर उद्धव ठाकरे यांना पुन्हा कोकणाची आठवण झाली आहे. ते खेडमध्ये मुक्काम ठोकून आहेत. खेडमध्ये पंचतारांकीत हॉटेल नसले तरी शिउबाठाचे नेते रवींद्र वायकर यांना आलिशान बंगला मात्र आहे. ठाकरे यांचा मुक्काम याच बंगल्यात आहे.
मुख्यमंत्री असताना घरी मुक्काम ठोकून असलेले, लोकांना टाळणारे, त्यांना भेट नाकारणारे उद्धव ठाकरे अलिकडे लोकांना भेटतात. त्यांच्यासोबत गप्पा मारतात. लोकांना भरपूर वेळ देतात. देवळांना भेटी देतायत.
परंतु कोकणाला गरज होती तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून कोकणासाठी काय केले, या प्रश्नाचे उत्तर स्थानिक शिवसैनिकाकडेही नाही.
२०२० मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर २०२० मध्ये निसर्ग आणि नंतर २०२१ मध्ये आलेल्या तौक्ते वादळाने कोकणाचे प्रचंड नुकसान केले. सलग दोन वर्षे कोकणाने वादळाच्या थपडा खाल्ल्या. लोकांचे अतोनात नुकसान झाले.
तौक्ते वादळामुळे चिपळूणचा एसटी स्टॅंड पाण्याखाली गेला. टीव्ही चॅनलवरून दिसणारी ही दृश्य थरकाप उडवणारी होती. बाजारपेठामध्ये पाणी शिरले होते. दोन दिवस चिपळूण पाण्याखाली होते.
हे ही वाचा:
इम्तियाज जलील यांच्याविरोधात भाजप रस्त्यावर
दोन बिस्कीटांचे पूडे, तीन मेणबत्या…
तुम्हाला धनुष्यबाण मिळूच शकत नाही, तुमचे हात भ्रष्टचाराने बरबटलेले
विधवा शब्दाऐवजी ‘पूर्णांगी’ म्हणा…
लोकांचे अश्रू पुसण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस धावले, पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही पाहाणी दौरा केला. त्यानंतर लाजेखातर उद्धव ठाकरे यांनी कोकणचा दौरा करावा लागला. चिपळूणच्या बाजारपेठेत आलेले सर्वस्व गमावलेल्या एका महीलेने आकांत करत उद्धव ठाकरे यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली. प्रचंड नुकसान झाले आहे, ‘तुम्ही आमदार-खासदारांचे दोन महीन्याचे वेतन कोकणकडे वळवा’, अशी मागणी केली. त्यावेळे ठाकरेंचे सध्याचे एकनिष्ठ भास्कर जाधव त्या महीलेवर डाफरले होते. कोकणातल्या लोकांना दोन्ही वादळानंतर कोरड्या आश्वासनाशिवाय दुसरे काहीच मिळाले नाही.
रत्नागिरीतील केळशी गावात देवेंद्र फडणवीसांचा दौरा झाला तेव्हा मदत म्हणून सरकारने आम्हाला बिस्कीटांचे दोन पुडे आणि तीन मेणबत्या दिल्याची माहीती एका महीलेने आसवं गाळत दिली होती. तौक्ते वादळग्रस्तांना काही कमी पडू देणार नाही, अशी घोषणा ठाकरे सरकारने केली. परंतु वर्षभर आधी निसर्ग वादळाच्या वेळी झालेल्या नुकसानीची भरपाई अजून लोकांना मिळाली नव्हती.
तौक्ते वादळात रायगड जिल्ह्यातील तळीये या गावावर दरड कोसळली. त्यांना म्हाडामार्फत २६३ घरे देण्याची घोषणा झाली. हे कामही ठप्प होते. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात या कामाला गती आलेली आहे, एप्रिल महीन्यात हे काम पूर्ण होण्यीच शक्यता आहे.
वादळाने कोकणातील शाळांची छप्परे उडालेली असताना राज्य सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून राज्यात पाच ठिकाणी उर्दू घर बनवण्याची घोषणा केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जे कोकणाला विसरले. त्यांना कोकणाच्या नावाने उचक्या येतायत. त्यांना कोकणवासियांचे आशीर्वाद हवे आहेत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)