24 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरसंपादकीयदरड बळींमुळे धोकादायक वाटू लागलाय पाऊस

दरड बळींमुळे धोकादायक वाटू लागलाय पाऊस

पावसाळा भीतीदायक वाटू लागला आहे.

Google News Follow

Related

पावसाळ्याच्या काळात अलिकडे लोकांवर इतक्या नैसर्गिक अरिष्ट कोसळतायत की संतत धारा सुरू झाल्या की जीवाची घालमेल सुरू होते. पावसाळा भीतीदायक वाटू लागला आहे. इर्शाळवाडी ही वस्ती काल अशाच पावसात दरडीखाली आली. पहाटेच्या साखर झोपेत अनेक जीवांची अखेर झाली. अनेकजण जखमी झाले. ठीक दोन वर्षांपूर्वी ज्या रायगड जिल्ह्यात तळीयेची दुर्घटना घडली होती, त्याच तालुक्यात याची पुनरावृत्ती झाली.

चौक-मानवली ग्राम पंचायतीच्या हद्दीतील इर्शाळवाडी ही आदीवासी वस्ती. हा भाग दुर्गम असल्यामुळे इथे मदतकार्य पोहोचवणे सुद्धा कठीण होते. परंतु, दुर्घटना घडल्यानंतर स्थानिक यंत्रणा तातडीने कार्यरत झाल्या. आजूबाजूच्या स्वयंसेवी संस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. एनडीआरएफची पथके तिथे दाखल झाली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी, मजूर, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर करतायत. सरकारची मदत कधी येईल याची वाट न पाहाता लोक एकमेकांसाठी धावतायत, वाचवतायत, मदत करतायत ही दृश्य माणुसकी जिवंत असल्याची साक्ष पटवणारी आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा परीस्थिती उंटावरून शेळ्या न हाकता स्वत: धावतात. दुर्घटनास्थळी जातीने हजर राहण्याचा प्रयत्न करतात. पावसाची मुसळधार सुरू असताना इर्शाळवाडीतही ते सकाळीच दाखल झाले. त्यांनी मदत कार्याची पाहाणी केली. जखमींना उपचार मिळतील, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले जाईल, त्यांच्यासाठी अन्न,पाणी, औषधांची व्यवस्था होईल, या दृष्टीने सरकारी यंत्रणा कामाला लागल्या आहेत. गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसे, अदिती तटकरे हे मंत्रीही तिथे उपस्थित आहेत.

हे ही वाचा:

अमेरिकेत वीज कोसळून भारतीय वंशाची विद्यार्थिनी कोमात

वकार यूनुसची दर्पोक्ती; पाक म्हणे भारताला जगात कुठेही हरवू शकतो

भारतीयांना आता ५७ देशांत व्हिसाशिवाय परवानगी; सिंगापूर अव्वल

जैन साधूंच्या निघृण हत्याकांडा विरोधात विशाल मौन रॅलीचे आयोजन !

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा कहर सुरू आहे. महाडमध्ये रस्ता खचला आहे, चिपळूणमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे. राज्याच्या अनेक भागात रस्ते पाण्याखाली आले आहेत. मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. भाईंदरमध्ये इमारत खचली आहे. संकटं जेव्हा चोहो बाजूंनी येतात तेव्हा माणूसकीची परीक्षा होत असते. अशा काळात सुरक्षित राहणे महत्वाचे, आजूबाजूचे, शेजार पाजारचे लोक सुरक्षित राहतील याची काळजी घेणे महत्वाचे. ज्यांना पाऊस झोडपतोय त्यांना मायेची ऊब मिळेल, असे पाहणे महत्वाचे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा