24 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरसंपादकीयफ्रान्समध्येही टॅक्टिकल वोटींगचा बोलबाला... फ्रेंच खिचडी शिजणार का?

फ्रान्समध्येही टॅक्टिकल वोटींगचा बोलबाला… फ्रेंच खिचडी शिजणार का?

युरोपियन युनियनच्या निवडणुकीत पेन यांच्या पक्षाचा प्रभाव अवघ्या युरोपने पाहिलेला आहे

Google News Follow

Related

फ्रान्समध्ये नुसत्याच झालेल्या मतदानात उजव्या विचारसरणीचा नॅशनल रॅली हा पक्ष सर्वाधिक मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर गेला. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झालेले टॅक्टिकल मतदानामुळे सत्तेवर येण्याची शक्यता असलेला हा पक्ष मागे पडला. आता फ्रान्समध्ये डाव्यांचे संकरीत खिचडी सरकार येण्याची शक्यता आहे. ‘लाट उसळली. ती अपेक्षे इतकी उंच नसली, तरी ती उंचावते आहे. आमचा विजय फक्त काही काळ लांबला आहे’, असे उद्गार नॅशनल रॅलीच्या प्रमुख मरीन ल पेन यांनी काढले आहेत. भारतीयांना या निवडणुकीत शिकण्यासारखे बरचे काही आहे.

या निव़डणुकीत एका पक्षाच्या लोकप्रियतेपेक्षा, आक्रमक महिला नेत्या मरीन ल पेन यांच्या आश्वासक प्रतिमेपेक्षा डाव्यांची आघाडी, त्यांची रणनीती आणि टॅक्टिकल मतदान प्रभावी ठरले. हे टॅक्टिकल वोटींग ल पेन यांना सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी करण्यात आले. तोच प्रयत्न भारतातही झाला होता. भारतातील राष्ट्रवाद्यांनी ही बाब लक्षात घेण्याची गरज आहे. आफ्रिका, सिरीया आणि येमनमधून आलेल्या मुस्लिम स्थलांतरीतांमुळे फ्रान्स समोर अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. इथली सामाजिक वीण उसवते आहे. गुन्हेगारीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झालेली आहे. दंगे-धोपे, पॅलेस्टाईन-गाझाशी संबंधित निदर्शने, महिलांवर अत्याचार, भुरटे गुन्हे वाढलेले आहेत. फ्रेंच तुरुंगातील कैद्यांपैकी ४० टक्के संख्या मुस्लिमांची आहे, यावरून तिथे नेमके काय चित्र आहे, याची आपण कल्पना करू शकता.

त्यामुळे फ्रेंचाचे मोठे जनमत स्थलांतरित मुस्लीमांच्या विरोधात आहे. मरीन ल पेन यांचा पक्ष या मुद्द्याच्या विरोधात सतत आवाज उठवत राहिला. फ्रान्स हा फ्रेंचांसाठी आहे. सत्तेवर आलो तर स्थलांतरण रोखण्यासाठी कठोर कायदा करणार असे पेन यांनी जाहीर केले होते. स्थलांतरितांच्या बाबतीत अन्य पक्ष मिठाची गुळणी करून बसले असताना ल पेन यांच्या रोखठोक भूमिकेमुळे त्यांची आणि त्यांच्या पक्षाची लोकप्रियता प्रचंड वाढली.

एकूण मतदानापैकी त्यांच्या पक्षाला ३७.३ टक्के मतं पडली, न्यू पॉप्युलर फ्रंट या डाव्या आघाडीला २६.९ टक्के मत पडली. आश्चर्य म्हणजे या आघाडीने कामगारांना वाढीव वेतन, रोजगार, महागाई या विषयांवरून रान उठवले होते. महागाई आणि रोजगार हे फ्रान्समधील अत्यंत ज्वलंत विषय आहेत. तरीही स्थलांतरितांच्या मुद्द्यावर नॅशनल रॅली या पक्षाला फ्रेंचाचा सर्वाधिक पाठिंबा मिळाला. सर्वाधिक मतं मिळाली. परंतु दहा टक्के मतं कमी असून या डाव्या आघाडीला जागा मात्र जास्त मिळाल्या. मतांचे जागांमध्ये परिवर्तन करण्यात त्यांना अपयश आले. एकूण ५७७ जागा असलेल्या फ्रान्सच्या नॅशनल असेंब्लित ल पेन यांच्या पक्षाचा रथ फक्त १४३ जागांवर रोखला गेला असताना डाव्या आघाडीला १८२ आणि राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्राँ यांच्या मध्यममार्गी समर्थक पक्षाला सुमारे २३ टक्के मतांसह १६८ जागा मिळाल्या. स्थलांतरीत मुस्लीमांची मते कोणाला मिळाली हे सांगण्याची गरज नाही.

निवडणुकीच्या दोन टप्प्यांतील पहिल्या टप्प्यात पेन यांचा पक्ष आघाडीवर होता. सत्ता त्यांच्या हाती जाणार असे चित्र दिसल्यानंतर दुसऱ्या फेरीत टॅक्टीकल मतदान झाले. नॅशनल रॅली पक्षाचे नेते जॉर्डन बर्डेला यांनी निकालानंतर समर्थकांना संबोधित करताना सांगितले की, उर्वरीत दोन पक्षांनी ऐनवेळी खतरनाक राजकीय समझौते केले. ज्या ठिकाणी आमचे उमेदवार जिंकून येण्याची शक्यता होती तिथे उमेदवार मागे घेतले आणि एकमेकांना पाठिंबा दिला किंवा घेतला.
फ्रान्समध्ये जे काही घडले त्याचे भारतातील निवडणुकीशी साधर्म्य आहे. तिथे घुसखोरीच्या मुद्द्यावर नॅशनल रॅली हा पक्ष आवाज उठवत होता. फान्स फ्रेन्चांसाठी अशी भूमिका मांडत होता.

भविष्यात स्थलांतरितांना रोखण्यासाठी कठोर कायदे करणार अशा घोषणा करत होता. इथे भाजपाने समान नागरी कायदा करण्याची घोषणा केली होती. राष्ट्र प्रथमची भूमिका मांडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक शब्दात महिलांना बजावत होते की तुमचे मंगळसूत्रही सुरक्षित राहणार नाही. फरक एवढाच की तिथे फ्रेंचाना बाजूला ठेवून स्थलांतरितांना कुरवाळणारी डावी आघाडी आणि मध्यमार्गीय एकत्र आले तर सत्तेचे सोपान त्यांना प्राप्त होऊ शकते. मोदींच्या उत्कृष्ट रणनीती मुळे इथे मात्र इंडी आघाडीला ते शक्य झाले नाही.

हे ही वाचा:

हाथरस एसआयटी अहवालानंतर सहा अधिकारी निलंबित

मंत्रालयात जेष्ठ नागरिकाचा आत्महत्येचा प्रयत्न !

हिंदू धार्मिक स्थळ परिसरातील मुस्लीम समाजाची दुकाने हटवा

हाथरसची घटना घडली तेव्हा भोले बाबाचे सेवक पळून गेले!

तिथे मुस्लिमांची एकगठ्ठा मतं नॅशनल रॅलीच्या विरोधात पडली इथे भाजपाच्या विरोधात पडली. परंतु पक्षाच्या नेत्या मरीन ल पेन यांनी जे काही सांगितले ते महत्वाचे आहे. आम्हाला अपेक्षित असलेल्या उंची पर्यंत लाट उसळली नाही, परंतु ती उंच उसळत राहणार आहे. विजय फक्त काही काळ लांबला आहे, दुरावला आहे.

ल पेन यांचा आत्मविश्वास पोकळ नाही. २०२२ च्या निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाला ८९ जागा मिळाल्या होत्या आज १४३ जागा मिळाल्या आहेत. युरोपियन युनियनच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा प्रभाव अवघ्या युरोपने पाहिलेला आहे.
फाजील उदारमतवाद त्यांनी साफ नाकारलेला आहे. अमेरिका धार्जिणी भूमिका घेत युक्रेनच्या पाठीशी उभे राहण्याच्या पेक्षा आपण भले आपला देश भला ही त्यांची भूमिका आहे. त्यामुळेच कदाचित रशियाबाबत बोटचेपी भूमिका घेत असल्याची टीका त्यांच्यावर होते. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच नॅशनल रॅली हा उजव्या विचारसरणीचा पक्ष सत्तेवर येण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे युरोपातील अनेक नेत्यांची झोप उडाली होती.

ही बाई फ्रान्सचे राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण पूर्ण बदलून टाकेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत होते. परंतु ल पेन जे काही म्हणतायत ते बहुसंख्य फ्रेंचाना मनापासून पटते आहे ही बाब या निवडणुकीत उघड झालेली आहे. आज ना उद्या सत्ता त्यांच्याकडे जाणे अटळ आहे. त्यांची तुलना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केली जाते तेही योग्य ठरले आहे. ट्रम्प यांनाही गेल्या निवडणुकीत सत्तेच्या सोपानापासून वंचित राहावे लागले. कदाचित पुढच्या निवडणुकीत ल पेन यांची लाट अधिक उंच उसळेल. तोपर्यंत डाव्या माकडांच्या मर्कटलीला आणि उपऱ्या स्थलांतरितांचा नंगा नाच पाहणे फ्रेंचाच्या नशीबी आहे. डाव्यांनी मध्यममार्गी पक्षाला दम दिला आहे. आमच्या सगळ्या मागण्या मान्य असतील तर सोबत येतो. हा तर ट्रेलर आहे, पिक्चर तर अजून सुरू झालेलाच नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा