24 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरसंपादकीयपवारांच्या भाकितांचे रहस्य काय?

पवारांच्या भाकितांचे रहस्य काय?

सर्व्हे मविआच्या बाजूचा असल्यामुळे तो पवारांना मान्य आहे, परंतु केंद्रात भाजपाची सत्ता त्यांना मान्य नाही

Google News Follow

Related

देशाच्या सर्वात बुजुर्ग राजकारण्यांपैकी एक असलेल्या शरदा पवारांनी गेल्या दोन निवडणुकांबाबत केलेली भाकिते साफ फसली आहेत. सी-व्होटर्सचा सर्वे जाहीर झाल्यानंतर त्यांनी २०२४ निवडणुकांबाबत पुन्हा एकदा नवे भाकीत केले आहे. पवारांच्या भाकिताचा आधार काय असतो? त्यांचा माहितीचा स्त्रोत काय? अंदाज वारंवार का चुकीचे ठरतायत?

देशात दर पाच वर्षांनी निवडणुका होत असल्या तरी दर दोन वर्षांनी राजकीय हवा कोणत्या दिशेने वाहते आहे, याची चाचपणी करण्यासाठी विविध संस्थांचे सर्वेक्षण सुरू असते. २०२४ च्या लोकसभा निवडणूक अवघे दीड वर्ष शिल्लक असताना आलेल्या सी-व्होटर्सच्या सर्वेक्षणात भाजपाची देशात तिसऱ्यांदा सत्ता येत असल्याचा अंदाज व्यक्त केला असला तरी शरद पवारांनी मात्र हे फारसे पटलेले दिसत नाही. जनमत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाते आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या हाती सत्ता राहील असे वाटत नाही, असे मत पवारांनी व्यक्त केले आहे.

सी-व्होटर्सचा सर्वे सत्ताधारी आणि विरोधकांनी सोयी पुरता स्वीकारलेला आहे. म्हणजे कुणालाच हा सर्वे पूर्णपणे मान्य नाही. महाराष्ट्रात मविआला ३४ जागा मिळणार असे या सर्वेमध्ये सांगण्यात आल्यामुळे उद्धव ठाकरे यांना ४० जागांची स्वप्न पडू लागली आहेत. परंतु केंद्रात मोदी येणार याबाबत मात्र ते मौन आहेत. भाजपाला महाराष्ट्राचा आकडा मान्य होण्याचे कारणच नाही. मांतील जाणकार यांच्याशी सतत संपर्कात असल्यामुळे त्यांना राजकारणाची हवा कोणत्या दिशेने वाहतेय याचा अंदाज निश्चितपणे असतो. देशात सर्व्हे करणाऱ्या भरपूर संस्था आहेत. यापैकी सी-व्होटर ही मान्यता प्राप्त संस्था असली तरी यांचे सर्व्हेही अनेकदा चुकीचे ठरले आहेत. पवारांच्या भाकितांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. परंतु त्यांचा स्ट्राईक रेट सी-व्होटर इतकाही नाही. एखाद्या संस्थेचा सर्व्हे फसतो आणि राजकीय क्षेत्रातील जाणकाराचा अंदाज फसतो यात मुलभूत फरक आहे.

२००४ ते २०१४ या काळात शरद पवार केंद्र सरकारमध्ये मंत्री होते. यूपीएच्या काळात झालेल भ्रष्टाचार कांडं लक्षात घेता २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा कडेलोट होणार हे उघडच होते. भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील असे चित्र असले तरी भाजपाची सत्ता येईल असे ठामपणे सांगता येत नव्हते. भाजपाची सत्ता येत असल्याचे चित्र दिसले तर सर्व पक्ष एकत्र येऊन पुन्हा एकदा भाजपाला सत्तेपासून दूर ठेवतील, अशी शक्यता होती. त्या काळात पवारांनी भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असेल असे भाकीत केले होते. भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल असे त्यांनाही वाटत नव्हते. परंतु भाजपाला २८२ जागा मिळाल्या. रालोआतील मित्र पक्षांना ५४ जागा मिळाल्या.

२०१९ च्या आधी पवारांनी भाकीत केले की भाजपा सत्तेवर येईल, परंतु काठावरचे बहुमत किंवा त्यापेक्षा कमी जागा मिळाल्यामुळे मोदी पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. प्रत्यक्षात भाजपाच्या जागा २८२ वरून ३०३ झाल्या. मित्रपक्षांना ५० जागा मिळाल्या. मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. दुसऱ्यांदा पवारांच्या भाकिताची माती झाली.

हे ही वाचा:

भारतात ८० टक्के हिंदू त्यामुळेच पठाणही हिट होऊ शकतो!

पद्म पुरस्कारांचा दाखला देत मोदींनी केले आदिवासी समाजाचे कौतुक

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणतात, मी हिंदूच!

जीव वाचवण्यासाठी हरणांनी मारल्या पुलावरून उड्या आणि…

आता २०२४ साठी पवारांनी भाजपाबाबत पुन्हा एकदा भविष्यवाणी केली आहे. देश पातळीवर भाजपाच्या जागा घटनात दिसत आहेत. जनमत भाजपाच्या विरोधात जातेय. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या हाती सत्ता राहील असे वाटत नाही, हे पवारांचे विधान आहे. ही सत्ता केंद्रातील की राज्यातील हे पवार स्पष्ट करत नाहीत. त्यांच्या इशारा केंद्र आणि राज्य असा दोन्हीकडे असू शकतो कारण त्यांनी देशपातळीवर भाजपाच्या जागा कमी होतायत, असे स्पष्टपणे म्हटले आहे.

राज्यात महाविकास आघाडीला ४८ पैकी ३४ जागा मिळतील असे सी-व्होटर्सच्या सर्व्हेत म्हटले आहे. तो सर्व्हे मविआच्या बाजूचा असल्यामुळे तो पवारांना मान्य आहे, परंतु केंद्रात भाजपाची सत्ता येणार हे मात्र त्यांना पटलेले दिसत नाही. पवारांची भाकीत चुकतात कारण ते राजकीय अंदाज नसतात. अनेकांची भाकीतं हे त्यांच्या मनाचे मांडे असतात, इंग्रजीत याला विश फूल थिंकीग म्हणतात.

लोकसभा निवडणुकीला अजून दीड वर्षांचा काळ आहे. विधानसभेच्या निवडणुका लोकसभेसोबत घेतल्या जातील अशी शक्यता आहे. या काळात बऱ्याच घडामोडी घडतील. केंद्र सरकारची कोंडी करण्यासाठी देशांतर्गत गट आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रयत्न केले जातील. अनेक खळबळजनक प्रकरणे काढून मोदी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होईल हे उघड आहे. बीबीसीची डॉक्युमेंटरी, हिंडेंनबर्ग शॉर्ट सेल एण्ड रिसर्चचा अहवाल ही तर कुठे सुरूवात आहे. हा तर ट्रेलरपण नाही. पुन्हा एकदा शाहीनबाग, शेतकरी आंदोलन, पुरस्कार वापसी घडवण्याचा प्रय़त्न होईल. आंतरराष्ट्रीय मीडियाला हाताशी धरून मोठा धमाका करण्याचा प्रय़त्न होईल. तुमच्या आमच्या कल्पनाशक्तीत बसणार नाही, असाही एखादा प्रकार होऊ शकतो.

मोदी सरकारची कार्यपद्धती पाहाता हे सरकार टिकले तर भारत पुढील १० वर्षात ५० वर्ष पुढे जाईल असे जाणकारांचे मत आहे. परंतु राजकारण हे कायम अनप्रेडीक्टेबल असते. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ४०३ खासदारांच्या विक्रमी बहुमतासह १९८४ मध्ये आलेले सरकार आणखी किमान १०-१५ वर्षे टिकेल असे वाटत होते. प्रत्यक्षात हे सरकार १९८९ मध्ये गडगडले. परंतु तिथे अनअनुभवी राजीव गांधी होते आणि इथे खमके नरेंद्र मोदी आहेत हा फरक आहे. त्यामुळेच मोदी भारताचे पंतप्रधान राहू नयेत अशी अनेक जागतिक शक्तींची मनोमन इच्छा आहे. हे पवारांसह भारतातील अनेक बड्या नेत्यांना माहिती आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीच्या आधी भाजपा जाणार अशी भाकिते केली जातात. या भाकितांचा आधार काँग्रेस किंवा अन्य विरोधकांची वाढलेली शक्ती अजिबातच नाही. भारतातील मोदी विरोधकांचा परकीय शक्तींवर जास्त विश्वास आहे. काही भारतीय गटांची तर परकीय शक्तींसोबत हातमिळवणी सुद्धा आहे. त्यातूनच यावेळी मोदी येणार नाहीत, भाजपाची ताकद घटणार अशी भविष्यवाणी केली जाते.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा