32 C
Mumbai
Sunday, November 17, 2024
घरसंपादकीयपवारांचा गणपत वाणी झालाय का?

पवारांचा गणपत वाणी झालाय का?

भाजपाला मिळालेल्या यशाबाबत शरद पवारांच्या मनात प्रचंड असूया आहे

Google News Follow

Related

गुजरातमध्ये भाजपाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रतिक्रिया अत्यंत जळजळीत आहेत. विजयाचे नवनवे उच्चांक निर्माण करणाऱ्या भाजपाबाबत पवारांना प्रचंड असूया वाटणे स्वाभाविक आहे. कारण कारकीर्दीच्या उतरंडीवर आपला गणपत वाणी झालाय ही भावना त्यांच्या मनात घर करून बसली आहे.

राजकारणाचा अनेक दशकांचा अनुभव गाठीशी असून सुद्धा देशाचे नेतृत्व करण्याची महत्वाकांक्षा बाळगणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार केवळ साडे तीन जिल्ह्यांपुरते मर्यादीत राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळपास जाणारं यशही त्यांना लाभलं नाही. महाराष्ट्रात स्बबळावर सरकार ही खूपच दूरची गोष्ट आहे. तीन आकडी आमदार संख्या हे आजही त्यांना झेपणारे लक्ष्य आहे. जातीपातीचे राजकारण करून, निवडक एचएमव्ही पत्रकारांना हाताशी धरून राजकारण रेटण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे.

मित्र नापास झाला तर वाईट वाटते, परंतु आपल्याला यथा तथा गुण मिळालेले असताना मित्र पहिला आला तर जास्त त्रास होतो. हा थ्री इडीयटचा गाजलेला डायलॉग. पवार कधी मोदींचे मित्र होते की नाही याबाबत ठामपणे सांगता येत नाही. परंतु मोदींच्या यशाचा त्यांना त्रास होतोय हे नक्की. गुजरातमध्ये सलग सात वेळा स्वबळावर सत्तेवर येण्याचा चमत्कार भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे वारंवार करून दाखवला. या चमत्कारामागे राष्ट्रप्रथम ही विचारधारा आहे, रणनीतीही आहे आणि कष्टही आहेत. निवडणुका असो वा नसो भाजपाचे संपूर्ण संघटन अविश्रांत खपत असते.

पक्षासाठी नवे सदस्य जोडणे, त्यांना प्रशिक्षित करणे ही प्रक्रिया सातत्याने सुरू असते. एके काळी बूथस्तरापर्यंत संघटना पोहचवणाऱ्या भाजपाने पन्ना प्रमुख ही आखणी सुक्ष्म संकल्पना आणली आणि यशस्वी करून दाखवली. मतदार यादीच्या एका पानावर जेवढे मतदार असतात त्यांना प्रमुख म्हणजे पन्ना प्रमुख. पक्षाध्यक्ष पदी असताना अमित शहा यांनी ही पन्ना प्रमुख मोहीम तळागाळापर्यंत नेली.

निवडणुका जाहीर होण्याच्या एक दीड वर्ष आधी भाजपाचे संपूर्ण संघटन कामाला लागते. पंक्षाचे केंद्रीय पदाधिकारी, मंत्री त्या राज्याचे दौरे करतात. कार्यकर्त्यांना सातत्याने नवनवे कार्यक्रम दिले जातात. राज्यातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जातात. एखाद्या राज्यात जिंकण्याची शक्यता कमी असेल तर मोदी तिथे जास्त ताकद लावतात. गुजरातमध्ये पराभव पक्का आहे याची खात्री झाल्यानंतर राहुल गांधी तिथे फिरकले नाही. हिमाचल मध्ये कांटे की टक्कर आहे हे माहीत असून मोदींनी तिथे प्रचार सभा घेतल्या.

हे ही वाचा:

इशान किशनने पाडला बांगलादेशमध्ये पाऊस, १२६ चेंडूंत २०० धावांचा विश्वविक्रम

रेल्वेचा कुली; पण गरिबांचा शिक्षक

मंदी गायब.. कारच्या विक्रीने केला विक्रम

नवी मुंबईला मिळाले २० लाखांचे बजेट

जय-पराजयाचा फार विचार न करता मोदी आणि भाजपाचे संपूर्ण संघटन घाम गाळत असते. काँग्रेसने स्वातंत्र्य चळवळीच्या पुण्याईच्या जोरावर कित्येक दशके देशावर राज्य केले. त्यातुलनेत भाजपाची वाट बिकट आणि खडतर होते. परंतु ही वाटचाल करत भाजपाने संघटनेचे जाळे देशपातळीवर विणले आणि घराघरात आपली विचारधारा पोहोचवली. त्यामुळे भाजपाचे यश जास्त ठसठशीत आहे.

पवारांचे राजकारण कधी संघटनेच्या जोरावर नव्हतेच. किरकोळ प्रादेशिक पक्षाचा नेता पंतप्रधान पदावर पोहोचू शकत नाही, त्यामुळे जुगाड हा त्यांच्यासाठी एकमेव पर्याय होता. मीडियाच्या माध्यमातून हा जुगाड जमवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट ही काव्य पंक्ती प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु मीडियाने बनवलेल्या प्रतिमेच्या बळावर पंतप्रधान पद मिळाले नाहीच, परंतु राज्यात सत्ता मिळवण्यासाठी कित्येक वर्षे न सुटलेले भावनिक मुद्दे तापवून राजकारण करण्याची वेळ आली. पवारांनी पंतप्रधान पदाची लालसा, राज्यातील सत्ता हा विषय आता दृष्टीपथातच नाही. परंतु प्रश्न आता अस्तित्व टीकवण्याचा आहे.

गुजरात निवडणूक निकालानंतर देशाची सत्ता एका राज्यासाठी वापरली गेली, अशी टीका शरद पवारांनी केलेली आहे. ज्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या कार्यकाळात अवघे जलसिंचन मंत्रालय लवासा उभारण्यासाठी वापरले, त्यांनी केलेली ही टीका मनोरंजक आहे. पवारांच्या राजकारणाचा सारांश असा आहे की गणपत वाण्याची माडी तर झालेली नाही, त्यामुळे नशीबी फक्त काडी चावत विडीचा धूर सोडणे आलेले आहे. हा धूर भंगलेल्या स्वप्नांचा आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा