25 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरसंपादकीयशरद पवारांनी गेम फिरवलाय...

शरद पवारांनी गेम फिरवलाय…

शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नाना पटोले यांनी वोट जिहादची पालखी खांद्यावर घेतल्याचे नोमानी सांगतोय.

Google News Follow

Related

लोकसभा निवडणकीनंतर असे वातावरण निर्माण झाले होती की विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मविआचे सरकार येणार. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकींचा निकाल लागला. अवघ्या सहा महीन्यात राज्यातील वातावरण अभूतपूर्व बदलले. विधानसभा निवडणुकीचे निकाल काय लागतील हा प्रश्न बाजूला ठेवा परंतु एकूणच गेम फिरला आहे, असे चित्र निर्माण झाले आहे. याचे श्रेय जर कोणाला असेल तर ते केवळ आणि केवळ शरद पवार यांना. जर त्यांनी मुस्लीम मतांच्या ठेकेदारांचे टोकाचे लांगूलचालन केले नसते तर कदाचित हे घडले नसते.

 

मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानी हे मुस्लीमांच्या बाजूने सध्या मीडियाशी बोलतायत. ‘आमचे लक्ष महाराष्ट्र नसून दिल्लीत विराजमान झालेले मोदी सरकार आहे’, असे त्यांनी जाहीर केलेले आहे. मविआकडे त्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत, त्या मागण्यांमध्ये ‘भारताचा पाकिस्तान करा’, अशी एकच मागणी करण्यात आलेली नाही, जी त्यांची खरी मागणी आहे.

 

महाराष्ट्राच्या निवडणुकीत विकासाचा मुद्दा प्रचारातून गायब आहे. मविआच्या नेत्यांचा एकमेव मुद्दा आहे, त्यांना महायुती सरकार हटवायचे आहे. मुस्लीम मौलवींनाही महायुती सरकार नको आहे, या नकारघंटेचां संबंध सरकारच्या सक्षमतेशी, कारभाराशी आणि विकासाशी नाही. महाराष्ट्रातील सरकार गेले तर केंद्रातील मोदी सरकार डळमळीत होईल, म्हणून त्यांना महायुती सरकार सत्तेवर नको आहे. मोदी सरकार केंद्रात का नको आहे, ही बाब नोमानी आणि त्यांची कट्टरतावादी पिलावळ लपवून ठेवत नाही. त्यांना वक्फ सुधारणा विधेयक रोखायचे आहे, त्यांना समान नागरी कायदा रोखायचा आहे, सीएए रोखायचाय, त्यांना कलम ३७० पुन्हा काश्मीरमध्ये हवे आहे.

 

मुस्लीम तुष्टीकरणामुळे होणारे हिरवेकरण रोखणारी ही मोदी सरकारची पावले आहेत. भारताचा पाकिस्तान बनवण्यात हे कायदे अडसर बनले आहेत, म्हणून नोमानी आणि त्यांच्या गँगला हे कायदे नको आहेत. हे इतके माजले आहेत, की ‘जे मुस्लीम भाजपाला मतदान करतात, त्यांचा हुक्कापानी बंद करा’, असे म्हणण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. ही उघड उघड मुस्कटदाबी आहे, लोकशाहीची पायमल्ली आहे. संविधान वाचवण्याची पोपटपंची करणारे या मुस्कटदाबीकडे पाहण्याचे कष्टही घेत नाहीत, ना याच्या विरोधात एक शब्दाने बोलत. महाराष्ट्राच्या सत्तेसाठी हे देश विकायला तयार आहेत.

हे ही वाचा:

मोदी सरकारकडून राज्यात रेल्वेची १ लाख ६४ हजार कोटींची गुंतवणूक

ठाकरे गटाचे सर्व बालेकिल्ले, गड जनतेने उध्वस्त करून टाकलेत

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड लखवी पाकिस्तानातला ‘व्हीआयपी’

व्होट जिहादसाठी आवाहन करणाऱ्या सज्जाद नोमानी यांच्याविरोधात तक्रार

 

सज्जाद नोमानी छत्रपती संभाजी नगरमध्ये मनोज जरांगे पाटलांना भेटला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आपले राजकारण रेटणारे जरांगे या वोट जिहादीसमोर मान तुकवतायत. कारण हे दोघेही पवारांचे पोपट आहेत. फरक एवढाच जरांगेंच्या डोक्यात तुतारी आणि नोमानीच्या डोक्यात गज्वा ए हिंद, अर्थात भारताचा पाकिस्तान कऱण्याची उर्मी. शरद पवारांचे सत्ताकेंद्रीत राजकारण कोणत्या थराला गेले आहे आणि ते देशाला विनाशाच्या टकमक टोकावर कसे नेते आहे हे महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आले आहे. किंबहुना ते नोमानी यांनीच आणून दिलेले आहे. वोट जिहादचे सिपाहसालार कोण हे त्यांनी अगदी स्पष्टपणे महाराष्ट्राला सांगितले आहे.

शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नाना पटोले यांनी वोट जिहादची पालखी खांद्यावर घेतली असल्याचे नोमानी सांगतोय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पाकिस्तानकडे डोळे लावून बसलेल्यांचा उल्लेख कायम हिरवी बांडगुळे, पाकडे, लांडे असे करीत असत. त्याच हिरव्या बांडगुळांनी उद्धव ठाकरेंना सिपहसालार म्हणून नोकरीवर ठेवलेले आहे. बरे ठेवले ते ठेवले, आणि ते जाहीरपणे महाराष्ट्राच्या तमाम जनतेला सांगतायत सुद्धा.

 

वोट जिहादची हाळी देणाऱ्यांना प्रतिसाद देत लोकसभा निवडणुकीच्या काळात मुस्लीमांनी रांगा लावून मोदींच्या विरोधात एकगठ्ठा मतदान केले. तेच चित्र विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार या आशेने नोमानींचे सिपहसालार खूष आहेत. प्रश्न उरलेल्यांचा आहे. मतदान करताना ते जात पाहणार आहेत काय ? कांदा टोमॅटोचे भाव पाहणार आहेत का? की देशहित पाहणार आहेत? जर कांदा टोमॅटोचे भाव न पाहाता हिंदूंनी नोमानीचा वोट जिहाद उधळून लावला. रांगा लावून मतदान केले. देशासाठी मतदान केले, विकासासाठी मतदान केले. तर त्याचे श्रेय शरद पवारांनाच जाईल. नोमानीच्या हिरव्या एजेंड्याला शरण जाऊन त्यांना हिंदूंना जागे केले. हिंदुत्वाचा बुरखा पांघरून हिरवे झेंडे फडकावणाऱ्या ठाकरेंनाही जाईल. बाकी राहुल गांधी ते काँग्रेसला मुस्लीमांचा पक्ष म्हणतातच. त्यांचा एजेंडाच भारताची दुसरी फाळणी करण्याचा आहे. २० नोव्हेंबरला या एजेंडाचे उत्तर देण्याची संधी मतदारांना मिळणार आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा